करणी केल्याच्या संशयातून कोपरा येथे विवाहितेचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2018 01:09 AM2018-07-04T01:09:32+5:302018-07-04T01:10:09+5:30

मुलगा होण्यासाठी सासरची मंडळी करीत असलेल्या छळाला कंटाळून विवाहिता भोंदूबाबाच्या नादी लागली. यातूनच तिने सासरच्या मंडळींना करणी केल्याच्या संशयावरुन विवाहितेला गळफास लावून जिवे मारल्याची घटना कोपरा (ता.हदगाव)येथे २९ जून रोजी घडली. ३ जुलै रोजी याप्रकरणी तामसा पोलिसांत आठ जणांविरुद्ध गुन्हा नोंदवून पतीस अटक केली.

Married murderer in Kopra, suspected of doing an act | करणी केल्याच्या संशयातून कोपरा येथे विवाहितेचा खून

करणी केल्याच्या संशयातून कोपरा येथे विवाहितेचा खून

Next
ठळक मुद्देपती अटकेत : आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क
हदगाव : मुलगा होण्यासाठी सासरची मंडळी करीत असलेल्या छळाला कंटाळून विवाहिता भोंदूबाबाच्या नादी लागली. यातूनच तिने सासरच्या मंडळींना करणी केल्याच्या संशयावरुन विवाहितेला गळफास लावून जिवे मारल्याची घटना कोपरा (ता.हदगाव)येथे २९ जून रोजी घडली. ३ जुलै रोजी याप्रकरणी तामसा पोलिसांत आठ जणांविरुद्ध गुन्हा नोंदवून पतीस अटक केली.
कोपरा येथील विवाहिता फरहानबी नजिरखान पठाण (वय २६) हिचे माहेर ढाणकी (ता. उमरखेड) येथील आहे. सात वर्षांपूर्वी तिचा विवाह नजीरखानसोबत झाला होता. त्यांना एक मुलगीही आहे. पती व सासरच्या मंडळींना मुलगा हवा होता, मात्र मुलगा होत नसल्याने फरहानबीचा सासरी छळ सुरु झाला. याशिवाय रिक्षा व सेट्रींगच्या कामाचे साहित्य घेण्यासाठी माहेराहून पैसे आणावेत, अशी मागणीही होवू लागली. पीडितेने या घटनेची माहिती माहेरीही दिली. दरम्यान, सासरी होत असलेल्या छळाला कंटाळून विवाहितेने कोपरा येथील दर्गा येथे असणाऱ्या भोंदूबाबा म. अलिबाबा शेख वजीर पठाण यांच्याकडे जावून ती मुलगा होण्यासाठी काय करावे लागेल, याचा सल्ला घेवू लागली. भोंदूबाबाकडे जाण्यास सासरच्या मंडळींचा विरोध होता. मात्र तिने जाणे थांबविले नाही. याच दरम्यान सासरच्या एका महिलेला कथित भानामतीची बाधा झाली. ही भानामती सून व भोंदूबाबाने केल्याचा संशय सासरच्या मंडळींचा होता. यावरुनही पीडिता व सासरच्या मंडळींमध्ये वादविवाद वाढले. २९ जूनला विवाहिता घरी गळफास लावलेल्या अवस्थेत आढळली. त्याच दिवशी रात्री तामसा पोलिसांनी या घटनेची आकस्मिक मृत्यू म्हणून नोंदही घेतली.
---
सात जणांचा पोलिसांकडून शोध सुरू
शासकीय रुग्णालयात शव विच्छेदन करण्यात आले. २ जुलै रोजी मयताचा भाऊ सय्यद लतीफ सय्यद पीर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, तामसा पोलिसांनी आठ जणांविरुद्ध खून, शारीरिक व मानसिक छळ करणे आदी आरोपांखाली गुन्हे नोंदविण्यात आले. याशिवाय जादुटोणाविरोधी कायद्याच्या कलम ३ व ४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींमध्ये पती नजिरखान, त्याचा भाऊ मुस्ताकखान, महेमूदखान, शरीफखान, दोन महिला व इतर अशा ८ जणांचा समावेश आहे. पोलिसांनी पतीला अटक केली असून न्यायालयाने त्याला ५ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. उर्वरित ७ जणांचा शोध सुरु असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील माने यांनी दिली.

Web Title: Married murderer in Kopra, suspected of doing an act

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.