लिंबोटीचे पाणी आता पालम तालुक्यासह ६५ गावांना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2019 01:14 AM2019-01-10T01:14:46+5:302019-01-10T01:16:46+5:30

लिंबोटीचे पाणी लातूर जिल्हा पाठोपाठ आता परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यासह ६५ गावांना दिले जात आहे.त्यामुळे लोहा-कंधार मतदारसंघातील हिरव्या शेतीला उजाड, ओसाड करण्याचे षडयंत्र आहे.

Limbo water to 65 villages now, with talam taluka | लिंबोटीचे पाणी आता पालम तालुक्यासह ६५ गावांना

लिंबोटीचे पाणी आता पालम तालुक्यासह ६५ गावांना

Next
ठळक मुद्देधोंडगेंचे चिखलीकरांवर टीकास्त्र लोहा-कंधार मतदारसंघ कोरडे ठेवण्याचे षडयंत्र

कंधार : लिंबोटीचे पाणी लातूर जिल्हा पाठोपाठ आता परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यासह ६५ गावांना दिले जात आहे.त्यामुळे लोहा-कंधार मतदारसंघातील हिरव्या शेतीला उजाड, ओसाड करण्याचे षडयंत्र आहे. असे टीकास्त्र माजी आ.शंकर धोंडगे यांनी आ.प्रताप पा.चिखलीकर यांच्यावर सोडले़
लोहा तालुक्यातील अप्पर मानार प्रकल्प (लिंबोटी) हे लोहा-कंधार तालुक्यातील शेती सिंचनाखाली यावी.आणि शेतकऱ्यांचे अर्थकारण बळकट व्हावे.यासाठी प्रकल्पाची निर्मिती झाली.परंतु या प्रकल्पातील पाणी उचलण्याची स्पर्धा सुरु झाली.लातूर जिल्ह्यातील अहमदपूरला सेना-भाजपाच्या १९९५ च्या शासन काळात ३०टक्के पाणी देण्यात आले. आता भाजपा-सेनेच्या कार्यकाळात २० टक्के (१०द.ल.घ.मी.) पाणी उदगीरला देण्याचे पातक आ.चिखलीकर यांनी केले. असा आरोप धोंडगे यांनी केला.
एवढे कमी आहे म्हणून की काय आता शासनाच्या पाणी पुरवठा विभागाचे मंत्री व आ.चिखलीकर यांनी संगनमताने लिंबोटी प्रकल्प कोरडा करण्याचा घाट घातला आहे. मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेतंर्गत पालम तालुक्यासह ६५ गावच्या संयुक्त पाणी पुरवठ्यासाठी ५७ कोटीच्या कामासाठी प्रशासकीय मान्यता जून २०१८ मध्ये देण्यात आली. तसेच ६ डिसेंबर २०१८ ला या योजनेचा कायार्रंभ दिला.असे धोंडगे यांनी सांगितले.
लिंबोटीचे पाणी देण्यापेक्षा दिग्रस बंधा-यातील विष्णूपूरीचे आरक्षण वगळता ३७ द.ल.घ.मी.पाणी व मुळी बंधाºयातील १२ द.ल.घ.मी.असे एकूण ५० द.ल.घ.मी.शिल्लक पाणी आहे. तसेच पाथरी तालुक्यात मुदगल,तासगव्हाण,ढालेगाव हे उच्च पातळीचे बंधारे आहेत.मग मानार खोºयातील उरलेले पाणी या योजनेला देण्याचे विश्वासघात आ.चिखलीकर करत असल्याचा आरोप धोंडगे यांनी केला.मोठ्या संघर्षाने शेती सिंचनासाठी उभारलेला सुमारे ४०० कोटी खर्च केलेला प्रकल्प आता इतरत्र पाणी दिले जात असल्याने या भागाचे वाळवंट होण्याचा धोका आहे.
यावेळी दत्ता पवार,बाबूराव केंद्रे ,दिलीप धोंडगे, शिवदास धमार्पूरीकर, राजकुमार केकाटे आदीची उपस्थिती होती.
दरम्यान, काही दिवसापूर्वीच आ़प्रताप पाटील चिखलीकर यांनी मुख्यमंत्र्यांना भेटून किवळा साठवण तलावासाठी निधी आणल्याचे सांगितले होते़ तसेच आपल्याच प्रयत्नातून या साठवण तलावाच्या कामाचे निकष बदलण्यात आल्याचे ते म्हणाले होते़ त्यावर माजी आ़शंकर धोंडगे यांनीही पत्रपरिषद घेवून किवळ साठवण तलावाला काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काळात मंजूरी मिळाल्याचे सांगितले होते़ त्यानंतर आता या दोन्ही नेत्यांमध्ये लिंबोटी हा वादाचा विषय ठरणार आहे़
रस्त्याच्या कामाचे श्रेय घेण्याचा चिखलीकरांचा केविलवाणा प्रकार

  • केंद्रीय महामार्गाकडून राष्ट्रीय रस्ते बांधणी कार्यक्रम असतो.हे महामार्ग विविध राज्ये,जिल्हा व तालुक्यातून जात असतात.प्रधानमंत्री, संबंधित मंत्री उद्घाटन करत असताना उथळपणा आमदार करत असल्याचा आरोप धोंडगे यांनी केला.नांदेडचे खासदार व मुखेडचे आमदार हे उद्घाटन करताना दिसत नाहीत. मग श्रेय घेण्याचा केविलवाणा खटाटोप ते करत असल्याचा टोला धोंडगे यांनी लगावला. आपल्या मतदारसंघातील रस्ते सुधारण्याचा सल्ला त्यांनी चिखलीकरांना दिला. मतदारसंघात अवैध धंदे सुरू आहेत.आरोग्यसेवा बेभरवशाची, विविध कार्यालयातील कामकाज ढेपाळले आहे. विकासाच्या पोकळ गप्पा मारणे सुरु आहे़ असा टोलाही धोंडगे यांनी लगाविला़

Web Title: Limbo water to 65 villages now, with talam taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.