कंधार तालुक्यातील १७७ अंगणवाड्या सौरऊर्जेच्या प्रकाशाने उजळणार; एकात्मिक बालविकास सेवा योजनेकडून प्रस्ताव

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2017 11:43 AM2017-11-22T11:43:49+5:302017-11-22T11:45:50+5:30

अंगणवाड्यात लाभार्थी संख्या आहे. स्वत:ची जागा उपलब्ध आहे, परंतु वीजपुरवठा नाही. अशा १७७ अंगणवाड्या अंधारात चाचपडत आहेत. अशा अंगणवाड्यांतील अंधार दूर करुन त्या सौरऊर्जा प्रकाशाने उजळण्यासाठीचा प्रस्ताव पाठविण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे.

The lighting of 177 AWWs in Kandahar taluka will be bright; Proposal from Integrated Child Development Service Scheme | कंधार तालुक्यातील १७७ अंगणवाड्या सौरऊर्जेच्या प्रकाशाने उजळणार; एकात्मिक बालविकास सेवा योजनेकडून प्रस्ताव

कंधार तालुक्यातील १७७ अंगणवाड्या सौरऊर्जेच्या प्रकाशाने उजळणार; एकात्मिक बालविकास सेवा योजनेकडून प्रस्ताव

googlenewsNext
ठळक मुद्देतालुक्यात ३२० अंगणवाड्या व मिनी अंगणवाड्यांना विविध समस्यांचा सामना करावा लागतो.ग्रामीण भागातील भारनियमन व सतत होणारा खंडित वीजपुरवठा ही ज्वलंत भेडसावणारी समस्या आहे. प्रश्नातून सुटका करण्यासाठी वरिष्ठ पातळीवरुन सौरउर्जेच्या माध्यमातून प्रकाश निर्माण करण्यासाठीचे प्रस्ताव मागविण्यात आले.

कंधार (नांदेड ): अंगणवाड्यात लाभार्थी संख्या आहे. स्वत:ची जागा उपलब्ध आहे, परंतु वीजपुरवठा नाही. अशा १७७ अंगणवाड्या अंधारात चाचपडत आहेत. अशा अंगणवाड्यांतील अंधार दूर करुन त्या सौरऊर्जा प्रकाशाने उजळण्यासाठीचा प्रस्ताव पाठविण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे अंगणवाडीत लखलखता प्रकाश येणार असल्याची भावना चिमुकल्यांसह पालक, ग्रामस्थांत निर्माण होऊन प्रतीक्षा लागली आहे.

तालुक्यात ३२० अंगणवाड्या व मिनी अंगणवाड्यांना विविध समस्यांचा सामना करावा लागतो. त्यात ग्रामीण भागातील भारनियमन व सतत होणारा खंडित वीजपुरवठा ही ज्वलंत भेडसावणारी समस्या आहे. अशा बिकट प्रश्नातून सुटका करण्यासाठी वरिष्ठ पातळीवरुन सौरउर्जेच्या माध्यमातून प्रकाश निर्माण करण्यासाठीचे प्रस्ताव मागविण्यात आले. त्यात तालुक्यातून १७७ अंगणवाड्यांचे प्रस्ताव पाठविण्यात आले.

सौरऊर्जासाठीचे प्रस्ताव एकात्मिक बालविकास सेवा योजनेचे प्रकल्प अधिकारी कैैलास बळवंत यांच्या मार्गदर्शनाखाली विस्तार अधिकारी संजय मेडपलवार, पर्यवेक्षिका, कर्मचारी आदींनी तयार केले. आयुक्तांकडून प्रकल्पास मंजुरी मिळाल्यानंतर अंगणवाडी प्रकाशमय होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

सौरउर्जेसाठी शेकापूरच्या दोन अंगणवाड्यांचा प्रस्ताव आहे. तसेच संगमवाडी, तळ्याचीवाडी, फुलवळ येथील २, सोमसवाडी, कंधारेवाडी येथील २, मुंडेवाडी, बहाद्दरपुरा येथील ५, जंगमवाडी, गणपूर तांडा, किवळा तांडा, महादेव तांडा, पानशेवडी येथील २, पानशेवडी तांडा, गुट्टेवाडी, पोखर्णी, सोमठाणा, अंबुलगा येथील ३, ब्रह्मवाडी, टोकवाडी, गऊळ, भोजूची वाडी, घोडज येथील ३, बाभूळगाव २, गंगनबीड, वाखरड, देवला तांडा, फकीरदरवाडी, माथ्याची वाडी, पेठवडज येथील ४,  शिर्शी  (बु), शिर्शी (खु), गोणार येथील २, खंडगाव, जाकापूर, येलूर, मसलगा, नवीन मादाळी, कळका येथील २, नावंद्याची वाडी-२, देवईची वाडी -२,  उस्माननगर-३, शिराढोण-३, शिराढोण तांडा, तेलंगवाडी, भुत्याचीवाडी, लाठ खुर्द, बामणी-२, पांगरा-३, डिग्रस बु. ५, खुड्याची वाडी, भंडेवाडी, दिग्रस खु., गुटूर-३, गुंटूर तांडा, हरबळपट्टी, गांधीनगर, हाडोळी बु. -३, उमरगा, हिप्परगा,  मरशिवणी, नागलगाव, जयरामतांडा, हरिलाल तांडा, चिखली-२, दहीकळंबा -२, गुंडा, लाडका, भूकमारी, बाचोटी-४, बाचोटी तांडा, गोगदरी मिनीसह २, चिंचोली, चौकी धर्मापुरी, बिंडा, पांडवनगर, रुई-२, कल्लाळी-२, सावरगाव-२, मानसिंगवाडी, शेल्लाळी-२, बोरी (बु), कागणेवाडी, मंगनाळी, मंगनाळीवाडी, रहाटी, वरवंट, पानभोसी-३, चिखलभोसी-२, वंजारवाडी, इमामवाडी, नवघरवाडी, गुलाबवाडी, धर्मापुरी, धर्मापुरी तांडा, कोटबाजार-२, मानसपुरी, लालवाडी, बोरी, कुरुळा-३, पोमा तांडा, हणमंतवाडी, वहाद-२, वहाद तांडा, मोहिजा, परांडा, महालिंगी, हटक्याळ, हसूळ, तेलूर, कारतळा, उमरज, उमरज तांडा, पाताळगंगा, बारुळ-२, काटकळंबा-२, कौठावाडी, धानोरा, चौकी महाकाया, शिरुर आणि हळदा  येथील २ अंगणवाडीचे प्रस्ताव आहेत. 
 

Web Title: The lighting of 177 AWWs in Kandahar taluka will be bright; Proposal from Integrated Child Development Service Scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nandedनांदेड