४३१ अंगणवाड्यांत पाण्याचा, २३१ मध्ये शौचालयांचा अभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2019 12:15 AM2019-03-14T00:15:34+5:302019-03-14T00:16:47+5:30

तालुक्यात चौदावा वित्त आयोगाचा निधी येतो़ बहुतांश ग्रामपंचायती या पंचायत क्षेत्र विस्तार कायदा (पेसा) अंतर्गत येतात़, असे असतानाही किनवट पं. स. अंतर्गतच्या ४२९ अंगणवाडी केंद्रांत पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध नाही किंवा नळजोडणी नाही तर २३१ अंगणवाडी केंद्रांना शौचालय नसल्याचे चित्र आहे.

Lack of toilets in 431 anganwadis, 231 | ४३१ अंगणवाड्यांत पाण्याचा, २३१ मध्ये शौचालयांचा अभाव

४३१ अंगणवाड्यांत पाण्याचा, २३१ मध्ये शौचालयांचा अभाव

googlenewsNext
ठळक मुद्देकिनवट तालुक्यातील अंगणवाड्या सोयी-सुविधांपासून वंचित

गोकुळ भवरे।
किनवट : तालुक्यात चौदावा वित्त आयोगाचा निधी येतो़ बहुतांश ग्रामपंचायती या पंचायत क्षेत्र विस्तार कायदा (पेसा) अंतर्गत येतात़, असे असतानाही किनवट पं. स. अंतर्गतच्या ४२९ अंगणवाडी केंद्रांत पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध नाही किंवा नळजोडणी नाही तर २३१ अंगणवाडी केंद्रांना शौचालय नसल्याचे चित्र आहे.
किनवट तालुक्यात १९१ गावे, १०५ वाडी-तांडे असताना तालुक्यात एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प किनवटअंतर्गत एकूण ४५३ अंगणवाडी केंद्र कार्यान्वित असून शून्य ते पाच वर्षे वयोगटातील १८ हजार ५०५ बालके आहेत़ स्वत:च्या इमारती असलेल्या ३४७ अंगणवाडी असून सात अंगणवाड्या या भाड्याच्या इमारतीत भरतात. तर आठ अंगणवाड्या व्हरांड्यात भरतात़ दोन अंगणवाड्या देवळात व चौदा अंगणवाड्या खासगी ठिकाणी भरतात़ तसेच ७५ अंगणवाड्या या समाजमंदिर, शाळा, वाचनालय इत्यादी ठिकाणी भरविल्या जातात. ४२९ अंगणवाड्यांत पिण्याच्या पाण्याची सोय नाही़ नळ कनेक्शन नाही, २३१ अंगणवाड्यांत शौचालय नाही, ४१४ अंगणवाड्यांत पाणी शुद्धीकरण उपलब्ध नाही़ ४४३ अंगणवाड्यांना विद्युत पुरवठा नाही़ दहा अंगणवाड्यांत १० विद्युत पुरवठा दिला आहे़ मात्र मीटरच बसवण्यात आले नसल्याची माहिती आहे़
किनवट प्रकल्पात पंधरा बिट आहेत़ अंगणवाड्यांवर पर्यवेक्षिका नियंत्रण ठेवतात़ तालुक्यात पेसा व चौदावा वित्त आयोगाचा निधी ग्रामपंचायतींना येतो़ अंगणवाडी सारख्या केंद्राकडे ग्रामपंचायती म्हणावे तसे लक्ष देत नाहीत, म्हणूनच की काय अंगणवाड्यात समस्यांचा अभाव आहे़ त्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे़ ज्या कामात नफा त्याच कामावर ग्रामपंचायतीचा भर आहे,असे म्हटल्यास वावगे ठरू नये.


आपण उपरोक्त सुविधा ग्रामपंचायतीने पेसा व चौदावा वित्त आयोग या निधीतून करावे, असे पंचायत समिती कार्यालयाला कळविले आहे -प्रफुल्ल बागल, बालविकास प्रकल्प अधिकारी, किनवट

बालविकास प्रकल्प अधिकारी यांनी सूचवल्याप्रमाणे आपण सर्व ग्रामसेवकांना उपरोक्त कामे पेसा व चौदावा वित्त आयोगाधून करण्याच्या सूचना दिल्या आहेत - पी क़े़ नारवटकर, बीडीओ पंचायत समिती किनवट़

Web Title: Lack of toilets in 431 anganwadis, 231

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.