नांदेड महापालिकेत खांदेपालट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2018 11:57 PM2018-06-03T23:57:39+5:302018-06-03T23:57:39+5:30

महापालिकेत क्षेत्रीय कार्यालयाचे क्षेत्रीय अधिकारी तसेच रिक्त पदभार कार्यकारी अभियंत्यांना देण्याचे आदेश आयुक्त लहुराज माळी यांनी काढले आहेत.

Khandipalat in Nanded Municipal Corporation | नांदेड महापालिकेत खांदेपालट

नांदेड महापालिकेत खांदेपालट

Next
ठळक मुद्देअटकोरे पुन्हा शिवाजीनगरात, बाशेट्टीच्या खांद्यावर आणखी भार

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : महापालिकेत क्षेत्रीय कार्यालयाचे क्षेत्रीय अधिकारी तसेच रिक्त पदभार कार्यकारी अभियंत्यांना देण्याचे आदेश आयुक्त लहुराज माळी यांनी काढले आहेत. मागील दोन दिवसांत हे आदेश काढण्यात आले आहेत. या आदेशामुळे पुन्हा एकदा महापालिकेतील अधिकाऱ्यांमधील गटबाजीला खतपाणीच मिळाले आहे.
सिडको क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक आयुक्त अविनाश अटकोरे यांची तडकाफडकी बदली करत शिवाजीनगर क्षेत्रीय कार्यालयात त्यांची रवानगी करण्यात आली आहे. त्यांच्या ठिकाणी स्थानिक संस्था कर विभागाचे प्रभारी सहायक आयुक्त पंडित जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मूळ काम सांभाळून जाधव यांना सिडको क्षेत्रीय कार्यालयाचा पदभार देण्यात आला आहे. विशेष म्हणजे, सहा ते आठ महिन्यांपूर्वीच अटकोरे यांना सिडकोचा पदभार देण्यात आला होता. महापालिकेत प्रतिनियुक्तीवर असलेले प्रकाश भीमराव कांबळे हे सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांच्याकडील पदभार शहर अभियंता माधव बाशेटी यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. बाशेटी यांच्याकडे आता जेएनएनयुआरएम, नगरोत्थान, रमाई आवास योजना, पंतप्रधान आवास योजना आदी योजनांचा पदभार सोपविण्यात आला आहे. विशेष म्हणजे, बाशेटी यांच्याकडे स्टेडियमसह अन्य काही विभागाचा मूळ पदभार आहे. प्रकाश कांबळे यांच्या रिक्त पदावर नियुक्ती मिळण्यासाठी महापालिकेतील कार्यकारी अभियंत्यामध्ये रस्सीखेच सुरू होती. वरिष्ठ पातळीवरुन शिफारशी आणल्या जात होत्या. मात्र या सर्व शिफारशींना बाजूला ठेवत आयुक्त माळी यांनी बाशेटी यांनाच झुकते माप दिले आहे. विशेष म्हणजे, या पदासाठी सुनील देशमुख, परवेज कलीम, उपअभियंता प्रकाश कांबळे हेही इच्छुक होते.
---
स्टेडियमचे काम सुरू होईना
श्री गुरूगोविंदसिंघजी स्टेडियमच्या आधुनिकीकरणासाठी ४५ कोटी रुपयांचा निधी केंद्र शासनाने मंजूर केला आहे. अनुदानाचा पहिला टप्पा महापालिकेला चार महिन्यांपूर्वीच प्राप्त झाला आहे. त्यानंतरही स्टेडियमच्या आधुनिकीकरणाच्या कामास अद्यापही प्रारंभ झाला नाही. हे काम पाहणाºया अधिकाºयाकडे आता आणखी नव्या योजेना सोपवल्या आहेत.

 

Web Title: Khandipalat in Nanded Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.