खैरगावकरांची १ कि.मी.पायपीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2019 12:25 AM2019-02-08T00:25:20+5:302019-02-08T00:26:37+5:30

तालुक्यातील खैरगाव (ज़) येथे विहिरी, बोअरचे पाणी संपल्याने अख्ख्या गावाला एक कि़मी़ अंतरावरून पाणी आणावे लागत आहे़ आतापासूनच पाणीटंचाई निर्माण झाल्याने गावकऱ्यांनी टँकरची मागणी केली आहे़

Khairgaonkar's 1 km pypit | खैरगावकरांची १ कि.मी.पायपीट

खैरगावकरांची १ कि.मी.पायपीट

Next
ठळक मुद्देभोकर तालुक्यातील : ६ गावात अधिग्रहणाला मंज़ुरी हिमायतनगरातही पाणीटंचाईचे चटके

हिमायतनगर : तालुक्यातील खैरगाव (ज़) येथे विहिरी, बोअरचे पाणी संपल्याने अख्ख्या गावाला एक कि़मी़ अंतरावरून पाणी आणावे लागत आहे़ आतापासूनच पाणीटंचाई निर्माण झाल्याने गावकऱ्यांनी टँकरची मागणी केली आहे़
पैनगंगा नदीवरील वॉटर सप्लाय बंदच आहे़ सार्वजनिक विहीर व पंचायतच्या बोअरला पाणी नाही़ अख्खे गाव पाण्यासाठी एक कि़मी़ जात असल्याचे विठ्ठलराव गुंफलवाड, बालाजी शिंदे, बाबूराव शिंदे, गणपत शिंदे, गजानन कामरीकर आदींचे म्हणणे आहे़ गावाला टँकर चालू केल्याशिवाय पर्याय नाही़ जनावरांनाही बोअर, विहिरीचे शेतातील पाणी आहे़ तालुक्यातील अनेक गावांत आताच पाणीटंचाई भासत आहे़ तालुक्यातील पाणीटंचाईचा आढावा घेवून पर्यायी व्यवस्था करावी अशी अनेक गावांची मागणी आहे़ सहाय्यक गटविकास अधिकारी मांजरमकर यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले, खैरगाव ज़ येथील अधिग्रहण विहिरीचा प्रस्ताव सरपंचांनी व ग्रामसेवकांनी दिला नाही़ प्रस्ताव देताच अधिग्रहण विहीर, बोअरचे करून तत्काळ पाणीपुरवठा केला जाईल़ संबंधित ग्रामसेवकांना संपर्क करतो असे ते म्हणाले़
पं़स़ सभापती माया दिलीप राठोड म्हणाल्या, खैरगावचे सरपंच यांनी पं़स़ला येवून गटविकास अधिकारी यांना अधिग्रहणाचा प्रस्ताव द्यावा़ किमान या संदर्भात मोबाईलवरूनही त्यांनी संपर्क करणे आवश्यक आहे़ म्हणजे संबंधित ग्रामसेवकांना सूचना करणे योग्य होईल़ त्या संदर्भात गटविकास अधिकारी मांजरमकर यांच्याशी संपर्क करून संबंधित गावचा पाणीप्रश्न सोडविला जाईल असे ते म्हणाल्या़ याबाबत सरपंच विनोद आडे म्हणाले, उपसरपंचाच्या विहिरीचा प्रस्ताव तयार आहे़ विजेचा प्रॉब्लेम आहे़ सिंगल फेजसाठी डीपी नाही़ बोअरचे पाणी विहिरीत सोडायचे आहे़ दोन दिवसात पाणी सुरू होईल़
हदगाव तालुक्यात २५० बोअरची मागणी
हदगाव : हदगाव तालुक्यात २५० बोअरवेल, २५ नवीन विहिरी, ७५ अधिग्रहण तर ६ गावांसाठी गरज भासल्यास टँकरने पाणीपुरवठा करण्याची गरज आहे. यासंदर्भात एक बैठक झाली. बैठकीत प्रत्येक गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक यांना एकत्र बोलावून समस्या जाणून घेण्यात आली. संबंधितांनी केलेल्या मागणीनुसार बोअरवेल, हातपंप, विहिरी वा अधिग्रहण करण्याचे प्रस्ताव दाखल करण्याचे त्यांना आदेशित केले़ गतवर्षी सव्वाकोटी रुपयांचा आराखडा पाणीटंचाईसाठी मंजूर करण्यात आला होता़ अनेक सरपंचांचा सूर बैठकीच्या विरोधातच होता़ मागणी करण्यासाठी बोलावतात, परंतु पुन्हा पंचायत समितीचे कर्मचारी प्रस्ताव घेण्यास त्रास देतात, असेही उपस्थित छोट्या गावातील सरपंचांनी यावेळी सांगितले़ तालुक्यातील ११ गावांमधील पाणीपुरवठा योजना रखडलेल्या आहेत़ त्याचा सातत्याने पाठपुरावा करूनही योजना कार्यान्वित करण्यात आल्या नाहीत व दोषी समितीवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांचे असूनही एकाही समितीवर गुन्हा दाखल करण्यात आला नाही़


भोकर तालुक्यात १७ गावांची अधिग्रहणाची मागणी
भोकर : तालुक्यात झालेले पर्जन्यमान आणि पुरेशा सिंचन क्षेमतेच्या अभावामुळे जानेवारी अखेर पाणी टंचाईच्या झळा तालुका वाशियांना सोसाव्या लागत असून १७ गावांनी अधिग्रहणाची मागणी केली असली तरी ६ गावांमध्ये अधिग्रहण मंजूर करण्यात आले आहे.
उन्हाळा आला की पाणी टंचाई हे सुत्र तालुक्याला नवे नाही. कारण डोंगराळ तालुका त्यातच मोठ्या साठवण क्षमतेचा अभाव व साठवण तलावात वषार्नुवषार्पासून जमा झालेला गाळ यामुळे कायमस्वरूपी पाणी टंचाईचा प्रश्न सुटलेला नाही. यातच दिवसेंदिवस भूजल पातळीत होणारी घट यामुळे पावसाळा संपल्यानंतर लगेच काही महिण्यात पाणी टंचाईला सामोरे जावे लागते. याहीवर्षी पाणी टंचाईवर मात करण्यासाठी तालुक्यातील १७ गावांनी येथील पंचायत समितीकडे अधिग्रहणाचा प्रस्ताव सादर केला आहे. या गावांची तहसील मार्फत स्थळ पाहणी करण्यात येत आहे. आतापर्यंत स्थळ पाहणी केलेल्या ६ गावातील टंचाई निवारणार्थ खाजगी विहीर अथवा विंधन विहीर अधिग्रहण करण्यात आले आहे. यात पोमणाळा, कासारपेठ तांडा, गारगोटवाडी (पां), कोळगाव (खू), डौरवाडी, कांडली आदी गावांना अधिग्रहणाचा आदेश प्राप्त झाला आहे. अधिग्रहणाची मागणी केलेल्या देवठाणा तांडा व रामनगर तांडा येथे डिसेंबरमध्ये केलेल्या स्थळ पाहणी नूसार पाणी उपलब्ध असल्याने तेथील प्रस्ताव नामंजूर करण्यात आले, तरी भविष्यात पाणी टंचाई निर्माण झाली तर ते पुन्हा मागणीचा प्रस्ताव सादर करु शकतात. उर्वरित गावांमधील ४ गावांची स्थळ पाहणी झाली असून ५ गावांची स्थळ पाहणी होणार आहे. स्थळ पाहणी अहवालानुसार या गावांना अधिग्रहणाची मंजूरी मिळेल.

Web Title: Khairgaonkar's 1 km pypit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.