कंधार : राष्ट्रकुटकालीन ऐतिहासिक जगतुंग समुद्र घाणीच्या गराड्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 12:43 AM2018-04-16T00:43:04+5:302018-04-16T00:43:04+5:30

राष्ट्रकुटकालीन ऐतिहासिक जगतुंग समुद्रात शहराचे अर्धे सांडपाणी येते़ काटेरी झाडे-झुडुपे आदीने घाणीच्या गराड्यात अडकल्याने जगतुंग समुद्र नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.

Kandahar: In the era of the historic Jagatung seashore in the Rashtrakutk period | कंधार : राष्ट्रकुटकालीन ऐतिहासिक जगतुंग समुद्र घाणीच्या गराड्यात

कंधार : राष्ट्रकुटकालीन ऐतिहासिक जगतुंग समुद्र घाणीच्या गराड्यात

googlenewsNext
ठळक मुद्देजलव्यवस्थापनेचा उत्तम नमुना नामशेष होण्याच्या मार्गावर, गाळाने भर घातल्याने खोली झाली कमी

लोकमत न्यूज नेटवर्क
कंधार : राष्ट्रकुटकालीन ऐतिहासिक जगतुंग समुद्रात शहराचे अर्धे सांडपाणी येते़ काटेरी झाडे-झुडुपे आदीने घाणीच्या गराड्यात अडकल्याने जगतुंग समुद्र नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.
राष्ट्रकुटकालीन ऐतिहासिक जगतुंग समुद्राची बांधणी राजा कृष्ण (पहिला) यांनी केली़ तर पुनर्बांधणी कृष्ण (तिसरा) यांनी केली़ समुद्राचे भौगोलिक स्थान १८ बाय १० इंच अंतर अक्षांश आणि १० अंश दक्षिण रेखांश असे आहे़ बांध ९०० मीटर लांबीचा तर रुंदी ६ मीटरची आहे़ या समुद्राला कोणतीही उपनदी मिळत नाही़ तरी लहानसे नाले, माळरानावरचे पावसाळ्यातील येणारे पाणी यामुळे जलसाठा मुबलक असायचा़ यामुळे सुमारे ४० हेक्टर जमीन सिंचनाखाली यायची़ कंधार, नवरंगपुरा, मानसपुरी, बहाद्दरपुरा, कोटबाजार आदी गावांची पाणीपातळी वाढण्यास मदत होते़ गावाला पाणीपुरवठा करण्यास उपयुक्त ठरणारा हा जगतुंग समुद्र आहे़
उत्तम जलव्यवस्थापनाचा हा समुद्र आजही चांगल्या स्थितीत आहे़ कुंड, घाट, जलकुंडातील मोठ्या श्रृंखला, पाणी नियंत्रण करणारे कौशल्यपूर्ण तंत्र वापरून समुद्राची उपयुक्तता सिद्ध करण्यात आली़ परंतु आजघडीला अत्यल्प पर्जन्यमानाने हा जगतुंग समुद्र भरत नाही़ शहरातील अर्ध्या भागाचे गटारांचे पाणी यात येते़ शौचालय, धुणे आदींसाठी याचा वापर केला जातो आहे़ रासायनिक व भौतिक घटकाने पाणी प्रदूषित होत आहे़ त्यात बेशरमी वनस्पती, काटेरी झुडुपे वाढली आहेत़ त्यात भर म्हणजे पाणी वाहत नाही़ त्यामुळे जगतुंग समुद्राला डबक्याचे स्वरूप आले आहे़

पर्यटन विकासासाठी निधी
जगतुंग समुद्रकाठावर पर्यटन विकासासाठी निधी मंजूर झाला़ त्यातून अनेक कामे झाली़ अनेक कामे पूर्ण होणे शिल्लक आहे़ पर्यटनाचा उद्देश सफल होण्यासाठी अप्पर मानार प्रकल्पाचा एक कालवा नवघरवाडीपासून गेला आहे़ तेथून उपकालव्याने जगतुंग समुद्रात पाणी सोडल्यास बारमाही समुद्र भरलेला राहील़
याकडे शासनाचे लक्ष असणे महत्त्वाचे आहे़ माजी खा़भाई डॉ़ केशवराव धोंडगे, अ‍ॅड़ मुक्तेश्वर धोंडगे, माजी जि़प़ सदस्य प्रा़डॉ़ पुरुषोत्तम धोंडगे यांनी मागणी केली़ परिसरातील सरपंच, ग्रामस्थांनी पाठिंबा दिला़ निवेदने, सत्याग्रह झाले, परंतु अद्याप उपकालवा जोडण्यास मुहूर्त लागला नाही़ पर्यटनाचा उद्देश मग कसा सफल होणार? हा प्रश्न आहे़ व्यापक हित डोळ्यासमोर ठेवून तयार केलेला जगतुंग समुद्र हा पाण्याअभावी डबके, घाणीचे केंद्र बनण्याचा धोका आहे़
बारमाही पाण्यासाठी उपकालव्याचे पाणी सोडा
जगतुंग समुद्रकाठावर पर्यटन विकासासाठी निधी मंजूर झाला़ त्यातून अनेक कामे झाली़ अजून काही होणे शिल्लक आहे़ पर्यटनाचा उद्देश सफल होण्यासाठी अप्पर मानार प्रकल्पाचा एक कालवा नवघरवाडीपासून गेला आहे़ तेथून उपकालव्याने जगतुंग समुद्रात पाणी सोडल्यास बारमाही समुद्र भरलेला राहील, परंतु याकडे शासनाचे लक्ष असणे महत्त्वाचे आहे़
माजी खा़भाई डॉ़ केशवराव धोंडगे, अ‍ॅड़ मुक्तेश्वर धोंडगे, माजी जि़प़ सदस्य प्रा़डॉ़ पुरुषोत्तम धोंडगे यांनी मागणी केली़ परिसरातील सरपंच, ग्रामस्थांनी पाठिंबा दिला़ निवेदने, सत्याग्रह झाले, परंतु अद्याप उपकालवा जोडण्यास मुहूर्त लागला नाही़ पर्यटनाचा उद्देश मग कसा सफल होणाऱ हा प्रश्न आहे़ व्यापक हीत डोळ्यासमोर ठेवून तयार केलेला जगतुंग समुद्र हा पाण्याअभावी डबके, घाणीचे केंद्र बनण्याचा धोका आहे़

Web Title: Kandahar: In the era of the historic Jagatung seashore in the Rashtrakutk period

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.