गोरठ्यातील साधना केंद्र साधकांसाठी प्रेरणास्त्रोत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2019 12:44 AM2019-04-21T00:44:35+5:302019-04-21T00:46:28+5:30

श्री अनंत आठवले अर्थात ब्रह्मलीन स्वामी वरदानंद भारती यांनी संतकवी श्री दासगणू महाराज यांच्या वस्त्र समाधीची गोरठा येथे प्रतिष्ठापना केली.

Inspiration for sadhana center people in Goratha | गोरठ्यातील साधना केंद्र साधकांसाठी प्रेरणास्त्रोत

गोरठ्यातील साधना केंद्र साधकांसाठी प्रेरणास्त्रोत

googlenewsNext
ठळक मुद्देसंतकवी दासगणू महाराजांनी केले अनेक संतांचे काव्यबद्ध चरित्रलेखनलाखाच्यावर केली काव्यरचना

बी़ व्ही़ चव्हाण ।
उमरी : श्री अनंत आठवले अर्थात ब्रह्मलीन स्वामी वरदानंद भारती यांनी संतकवी श्री दासगणू महाराज यांच्या वस्त्र समाधीची गोरठा येथे प्रतिष्ठापना केली. श्री दासगणू महाराज यांच्या व अन्य संतांच्या जीवनकार्याचा प्रसार व्हावा, त्या निमित्ताने ईश्वर भक्तीचे खरे स्वरुप लोकांसमोर असावे व साधकांसाठी येथे एक साधना केंद्र उभे रहावे, अशी या प्रतिष्ठानच्या उभारणीमागे संकल्पना आहे.
प्रतिष्ठानमध्ये दररोज प्रार्थना, ध्यान, जप, पूजा, आरती, भजन व विष्णूसहस्त्रनामाचा पाठ होतो. या व्यतिरिक्त होणाऱ्या नैमित्तीक कार्यक्रमात प्रवचन, व्याख्यान, कीर्तन यातून भारतीय हिंदू संस्कृती व संवर्धन, राष्टÑभक्ती यावर तज्ज्ञांकडून मार्गदर्शन होत असते. विशेष म्हणजे, अत्यंत शिस्तीचे व वेळेचे पालन होणाºया या प्रतिष्ठानची सर्वत्र ख्याती आहे. मात्र याची कुठेही प्रसिद्धी होऊन यात्रेचे स्वरुप येऊ नये. प्रतिष्ठानमध्ये येणारा प्रत्येक भाविक, साधक केवळ श्रद्धाभावानेच आला पाहिजे. सात्विकतेने त्याचे आचरण केले पाहिजे, हीच त्यामागची भूमिका आहे. आजवर येथे स्वाध्याय परिवाराचे पांडुरंगशास्त्री आठवले, जयंत नारळीकर, आचार्य किशोरजी व्यास, आचार्य धमेंद्रजी, शिर्डी व शेगावचे ट्रस्टी, प्रवीण दीक्षित, धुंडा महाराज देगलूरकर, अनंत महाराज बेलगावकर, प्रसिद्ध गायक अजित कडकडे आदी अनेक मान्यवरांनी येथे भेटी दिल्या. शिर्डी येथील श्री साईबाबांचे शिष्य असलेल्या दासगणू महाराजांनी त्यांच्याच सूचनेनुसार मराठवाड्यात गोरठा येथे येवून वास्तव्य केले.
येथील दानशूर आनंदीबाई गोरठेकर यांनी प्रतिष्ठानला स्वत:ची जागा दिली. यानंतर प्रत्येक धार्मिक कार्यात गोरठेकर परिवाराचा येथे सक्रिय सहभाग असतो. दासगणू महाराज हे शिर्डी संस्थानचे अनेक वर्षे अध्यक्ष होते. शिर्डी साई मंदिरात दररोज होणारे भजन, प्रार्थना व आरत्या आदी रचना दासगणू महाराजांनी केलेल्या आहेत. दासगणू यांनी घालून दिलेल्या परंपरा आजही शिर्डी व शेगाव येथील मंदिरात आहेत. शिर्डी येथे रामनवमी उत्सवाचे तीन दिवसांचे कार्यक्रम म्हणजे दासगणू महाराजांची संकल्पना होय.
सुरुवातीला दासगणू महाराज नंतर अनंत महाराज आठवले, मनू महाराज कोकलेगावकर, आता चौथ्या पिढीतील विक्रम नांदेडकर तिन्ही दिवस शिर्डी येथील धार्मिक कार्यक्रमात सहभागी असतात. सध्या शिर्डीच्या साई मंदिरात रामनवमीच्या दिवशी काल्याचे कीर्तन विक्रम नांदेडकर हे करतात. आजही ही धार्मिक परंपरा कायम आहे.
महाराष्टतील संत साहित्याचा विचार केला तर महिपतींच्या नंतर संतकवी दासगणू महाराजांनी अनेक संतांचे काव्यबद्ध चरित्रलेखन केले आहे. संतकथामृत, भक्तीलीलामृत आणि भक्ती सारामृत या तीन ग्रंथामध्ये यांचे संकलन केले आहे.
काव्यनिर्मिती म्हणजे दासगणूंच्या जीवनातील एक चमत्कार होय. केवळ चौथीपर्यंत शिक्षण घेतलेल्या दासगणू महाराज यांनी लाखाच्यावर काव्यरचना केली. श्री गजानन महाराजांच्या ‘गजानन विजय’ या ग्रंथाने तर अनेक भाविकांच्या हृदयात अढळस्थान मिळविले.
साहित्य उपलब्ध
महाराष्टतील संत साहित्याचा विचार केला तर महिपतींच्या नंतर संतकवी दासगणू महाराजांनी अनेक संतांचे काव्यबद्ध चरित्रलेखन केले आहे.संतकथामृत, भक्तीलीलामृत आणि भक्ती सारामृत या तीन ग्रंथांमध्ये यांचे संकलन केले आहे. काव्यनिर्मिती म्हणजे दासगणूंच्या जीवनातील एक चमत्कार होय.केवळ चौथीपर्यंत शिक्षण घेतलेल्या दासगणू महाराज यांनी लाखाच्यावर काव्यरचना केली.श्री गजानन महाराजांच्या ‘गजानन विजय’ या ग्रंथाने तर अनेक भाविकांच्या हृदयात अढळस्थान मिळविले. दासगणूंचे शिष्य ब्रह्मलीन स्वामी वरदानंद भारती पूर्वाश्रमीचे प्राचार्य अनंत दामोदर आठवले यांचेही व्यापक असे साहित्य आज उपलब्ध आहे.

Web Title: Inspiration for sadhana center people in Goratha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.