Heavy show in the Malegaon yatra | माळेगाव यात्रेत भरगच्च कार्यक्रम

ठळक मुद्देभित्तीपत्रकाचे विमोचन : १९ डिसेंबर रोजी लावणी महोत्सव तर २० ला कला महोत्सव

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : दक्षिण भारतात प्रसिद्ध असलेल्या श्रीक्षेत्र माळेगाव यात्रेच्या भित्तीपत्रकाचे विमोचन गुरूवारी जि़ प़ कृषी सभापती दत्तात्रय रेड्डी यांच्या हस्ते करण्यात आले़ पाच दिवस दिवस चालणाºया या यात्रेत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे़
महाराष्ट्रासह तेलंगना, आंध्रप्रदेश, कर्नाटक, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, राजस्थान आदी राज्यातील व्यापारी या यात्रेत दाखल होतात़ विविध वैशिष्टे लाभलेल्या या यात्रेला १६ डिसेंबरपासून प्रारंभ होणार आहे़ या यात्रेच्या नियोजनची तयारी जिल्हा परिषदेने पूर्ण केली आहे़ गुरूवारी यात्रेच्या भित्तीपत्रकाचे विमोचन करण्यात आले़ १६ डिसेंबर रोजी श्री खंडेरायाची शासकीय पुजा, पालखी, कृषी प्रदर्शन व विविध स्टॉलचे उद्घाटन व दुग्ध स्पर्धा आयोजित केली आहे़ १७ डिसेंबर रोजी पशु, अश्व, कुक्कुट व श्वान प्रदर्शन, १८ डिसेंबर रोजी कुस्त्यांची दंगल, १९ डिसेंबर रोजी लावणी महोत्सव व पशु प्रदर्शनातील विजेत्यांना बक्षीस वितरण, २० डिसेंबर रोजी पारंपरिक कला महोत्सव व विविध स्पर्धेचे बक्षीस वितरण होणार आहे़
भित्तीपत्रकाच्या विमोचन प्रसंगी प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ़ शरद कुलकर्णी, शिक्षण सभापती माधवराव मिसाळे, समाज कल्याण सभापती शिला निखाते, जि़ प़ सदस्य प्रकाश भोसीकर, लक्ष्मण ठक्करवाड, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी शिवाजी पवार, जिल्हा कृषी अधिकारी पंडीत मोरे आदींची उपस्थिती होती़