गोदावरी महामहोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2019 12:55 AM2019-02-02T00:55:00+5:302019-02-02T00:55:39+5:30

परंपरागत गोदावरी महामहोत्सवास ३ फेब्रुवारीपासून प्रारंभ होत मानकरी दिंड्यांचा गळाभेट हा मुख्य सोहळा मंगळवार, ५ फेब्रुवारी रोजी होणार आहे़ या महामहोत्सवाच्या तयारीच्या अनुषंगाने विविध मठ, संस्थांची शिखर समिती असलेली गोदावरी महामहोत्सव समिती आणि जिल्हा प्रशासन कामाला लागले आहे़ दरम्यान, विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे नियोजन केले आहे़

Godavari Mahamatotsav | गोदावरी महामहोत्सव

गोदावरी महामहोत्सव

Next
ठळक मुद्देसमितीसह प्रशासनाची तयारी : मंगळवारी मानकरी दिंड्यांची गळाभेट

नांदेड : परंपरागत गोदावरी महामहोत्सवास ३ फेब्रुवारीपासून प्रारंभ होत मानकरी दिंड्यांचा गळाभेट हा मुख्य सोहळा मंगळवार, ५ फेब्रुवारी रोजी होणार आहे़ या महामहोत्सवाच्या तयारीच्या अनुषंगाने विविध मठ, संस्थांची शिखर समिती असलेली गोदावरी महामहोत्सव समिती आणि जिल्हा प्रशासन कामाला लागले आहे़ दरम्यान, विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे नियोजन केले आहे़
गोदावरी महामहोत्सवानिमित्त ३ ते ६ फेब्रुवारी या कलावधीत विविध सांस्कृतिक, धार्मिक, जलप्रदूषण, कृषी यांत्रिकीकरण, कोरडवाहू आंतरपीक फळबाग मॉडेल, नदीजोड, रेल्वे विकास, कृषी उद्योग, टेक्सटाईल पार्क, कौशल्य विकास, दुप्पट कृषी उत्पन्न, फार्मर प्रोड्युसर कंपनी, भाषा बोली लिपी उत्सव आदी विषयांवर शहरात ठिकठिकाणी कार्यक्रम, चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे़ पौष अमावास्या काळात हा महामहोत्सव साजरा करण्यात येतो़ सोमवती पौष अमावास्या ४ फेब्रुवारी रोजी उत्तररात्री २ वाजेनंतर सुरू होवून सायंकाळी ७ वाजेपर्यंत आहे़ स्नानासाठी हा पवित्र काळ आहे़ त्यामुळे ३ फेब्रुवारी रोजी शहराच्या चोहोबाजूने तुकाराम महाराज येळेगावकर दिंडी, भानुदास महाराज दिंडी, नंदी महाराज दिंडी वाकळेवाडी दिंडी तसेच सोनखेड, चुडावा, निळा, वसमत, म्हैसा आदी ठिकाणांहून दिंड्या, जथ्थे, भाविक हजारोंच्या संख्येने दाखल होतील़
महामहोत्सवात ५ फेब्रुवारी रोजी संत दासगणू नावघाटावर मानकरी दिंड्या ह़भ़प़ भागवत महाराज व हभप हरिमहाराज यांचे दर्गासराय येथे स्वागत गळाभेट दर्गाप्रमुख अंगारे शाह करतील़ सकाळी ६ वाजता संत लिंगूअप्पा साळी व अंबाजी हकीम, कल्याणराव समाधी, गंगागोदावरी देवीपूजन होईल़ भाषाभगिनी संगम मराठी, उर्दू, हिंदी, सिंधी, तेलगू, कन्नड, गुजराती बोली भाषा वर्षानिमित्त गोन्डी गोर बंजारा, मारवाडी, कैकाडी, वडारी भाषिक मान्यवर मार्गदर्शन करतील़
दिलीप चव्हाण : मराठी भाषा संकटात
भाषा बोली लिपी ज्ञान तंत्रज्ञान विज्ञानाची राहिली नाही तर ती बोलीभाषा होवून नष्ट होते़ जगात दर आठवड्याला चार भाषा नष्ट होतात़ मराठी भाषा नष्ट होण्याच्या मार्गावर असून वेळीच मराठी भाषा वाचविण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन स्वारातीम विद्यापीठाच्या भाषा संकुल व भाषा बोली व लिपी अध्यासन संशोधन केंद्राचे संचालक डॉ़ दिलीप चव्हाण यांनी केले़ गोदावरी महामहोत्सव समिती आयोजित ‘भाषा बोली व लिपी विकासात प्रकाशक मुद्रक, पत्रकार, साहित्यिक, नाट्य, निबंध, इतिहास, ललितलेखक, वाचनालयाचे योगदान’ या विषयावर आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते़ यावेळी प्रा़डॉ़जगदीश कदम, प्रा़डॉ़भगवान अंजनीकर, प्रा़डॉ़पुष्पा कोकीळ, पंजाब देशमुख, देवदत्त साने, संजय हाटकर, रामकिशन साखरे यांची प्रमुख उपस्थिती होती़ डॉ़दिलीप चव्हाण म्हणाले, कोणतीही भाषा नष्ट होण्यास राजकीय, आर्थिक उपयोगिता धोरण कारणीभूत ठरते़ आयरिस भाषा नष्ट झाली़ परंतु, न्यूझीलंडने आदिवासी मावरी भाषा वाचविल्याचे चव्हाण म्हणाले़ दरम्यान, निर्मलकुमार सूर्यवंशी यांचा ‘भाषारत्न’ पुरस्कार देवून गौरव करण्यात आला़
जिल्हा प्रशासनाला समितीचे साकडे
गोदावरी महामहोत्सवानिमित्त नांदेडात येणाऱ्या विविध दिंड्या, भाविकांची गैरसोय होवू नये म्हणून जिल्हा प्रशासनाने विविध सोयीसुविधा पुरवाव्यात, अशी मागणी गोदावरी महामहोत्सव समितीच्या वतीने करण्यात आली आहे़ येणाºया भक्तांसाठी पिण्याचे पाणी, स्नानासाठी प्रत्येक घाटावर कुंडनिर्मिती करावी, वीज, स्वच्छता आदी सुविधा पुरविण्याची मागणी केली आहे़ यासंदर्भात योग्य त्या उपाययोजना करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी संबंधित विभागांना दिल्या आहेत़

Web Title: Godavari Mahamatotsav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.