पाटबंधारे विभागाने रब्बी हंगामासाठी पाणी न सोडल्याने माजी आमदाराचे ठिय्या आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क on Fri, November 10, 2017 5:00pm

पूर्ण क्षमतेने भरलेल्या उर्ध्व मानार व विष्णुपुरी प्रकल्पातुन रब्बीसाठी पाणी पाळ्या सोडण्याचे नियोजन अद्याप करण्यात आलेले नाही. यामुळे प्रशासन व स्थानिक लोकप्रतिनिधींचा निषेध करत माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे यांनी नांदेड पाटबंधारे मंडळात आक सकाळी ठिय्या आंदोलन केले.

नांदेड : पूर्ण क्षमतेने भरलेल्या उर्ध्व मानार व विष्णुपुरी प्रकल्पातुन रब्बीसाठी पाणी पाळ्या सोडण्याचे नियोजन अद्याप करण्यात आलेले नाही. यामुळे प्रशासन व स्थानिक लोकप्रतिनिधींचा निषेध करत माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे यांनी नांदेड पाटबंधारे मंडळात आक सकाळी ठिय्या आंदोलन केले. यावेळी त्यांनी अधीक्षक अभियंता एस.के. सब्बीनवार यांना निवेदन देवून दोन दिवसात पाणी सोडण्याची मागणी केली.     

मागील चार वर्षापासून दुष्काळाचा सामना करणार्‍या कंधार व लोहा तालुक्यातील शेतकर्‍यांच्या हातून यंदाही खरीप हंगाम गेल्यामुळे नुकसान झाले आहे. या भागात सरासरीच्या 55 टक्के पाऊस पडला आहे. तर तालुक्यातील लाभ क्षेत्र असलेल्या उर्ध्व मानार व विष्णुपुरी प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत. यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधी व प्रशासनाने 15 ऑक्टोंबर पुर्वी रब्बीच्या पाणी पाळ्याचे नियोजन करून पाणी सोडणे अपेक्षीत होते. मात्र, याबाबत पाटबंधारे कार्यालयाकडून कोणतेही नियोजन करण्यात आले नाही. यामुळे दिलीप धोंडगे यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील शेतकर्‍यांनी 30 ऑक्टोंबर रोजी  आंदोलन करत 5 नोव्हेंबरपर्यंत पाणी सोडण्याची मागणी केली होती.

यावरही पाणी सोडण्यात आले नसल्याने आज माजी आमदार  शंकरअण्णा धोंडगे यांनी सकाळी अकरा वाजता पाटबंधारे विभागाच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. सुरुवातीला त्यांनी अधीक्षक अभियंता एस.के. सब्बीनवार यांना निवेदन दिले यावेळी सब्बीनवार व कार्यकारी अभियंता पत्तेवार यांनी  त्यांच्याशी चर्चा केली. या आंदोलनात राष्ट्रवादी कॉग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष दत्ता पवार, माजी सभापती संजय कर्‍हाळे, जि.प.सदस्य अ‍ॅड. विजय धोंडगे, प्रल्हाद पाटील फाजगे, ज्ञानेश्‍वर चोंडे, विष्णु कल्याणकर, छत्रपती स्वामी, शिवराज पवार आदींचा समावेश आहे.

संबंधित

किसान सभेच्या वतीने ‘जवाब दो’ मोर्चा
एक एकरात ३६ टन टरबूज
गावनिहाय शेतमालाची माहिती
दहा गुंठे मिरचीतून दीड लाखाचे उत्पन्न
खडकाळ माळरानावर  चायना काकडी

नांदेड कडून आणखी

समतेसाठी शिवरायांचे विचार कृतीत आणणे गरजेचे
नांदेडात शिवरायांचा जयघोष ...
धर्माबाद तालुक्यातील सहा गावांत निवडणूक रद्द
नांदेड शहर स्वच्छतेसाठी जुळवाजुळव सुरू
स्त्रीच्या उद्ध्वस्त आयुष्याची ‘सल’

आणखी वाचा