धावत्या बसला लागली आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2019 12:34 AM2019-01-20T00:34:13+5:302019-01-20T00:35:00+5:30

नागपूरहून किनवटकडे येणाऱ्या रामटेक आगाराच्या बसने अंबाडी घाटात अचानक पेट घेतल्याने प्रवाशांत एकच तारांबळ उडाली. चालकाने प्रसंगावधान राखत धावती बस रस्त्याच्या बाजूला लावल्यानंतर बसमधून उतरण्यासाठी मोठी झुंबड उडाली. ही घटना १९ जानेवारी रोजी सायंकाळी सव्वासात वाजता घडली.

The fire started running | धावत्या बसला लागली आग

धावत्या बसला लागली आग

Next
ठळक मुद्देचालकाचे प्रसंगावधान : ५० प्रवासी सुखरूप

किनवट : नागपूरहून किनवटकडे येणाऱ्या रामटेक आगाराच्या बसने अंबाडी घाटात अचानक पेट घेतल्याने प्रवाशांत एकच तारांबळ उडाली. चालकाने प्रसंगावधान राखत धावती बस रस्त्याच्या बाजूला लावल्यानंतर बसमधून उतरण्यासाठी मोठी झुंबड उडाली. ही घटना १९ जानेवारी रोजी सायंकाळी सव्वासात वाजता घडली.
रामटेक आगाराची एम. एच. १४ बीटी ४३९९ क्रमांकाची एसटी बस नागपूरहून किनवटकडे येत होती़ कठीण वळणाच्या अंबाडी घाटात सायंकाळी सव्वासात वाजता पिंपळगावकडून घाट चढत असताना कठीण वळणाच्या ठिकाणी धावत्या बसच्या इंजिनजवळ गेअर लिवर जवळ अचानक पेट घेतला तेव्हा चालक अमोल पवार यांनी प्रसंगावधान राखून बस रस्त्याच्या कडेला थांबविली़ त्यावेळी अक्षरश: बसमधील प्रवाशांची खाली उतरण्यासाठी एकच झुंबड उडाली़ अचानक आग लागल्याने सर्व प्रवासी भयभीत झाले होते़
बसमध्ये असलेल्या पाण्याने व मातीने आग आटोक्यात आणण्यासाठी चालक व वाहकांनी प्रयत्न केले़ बस थांबल्यानंतर पन्नास प्रवाशांचा जीव भांड्यात पडला. सर्व प्रवाशांना मागून येणाºया चंद्रपूर किनवट बसमध्ये बसवून किनवटला पाठविण्यात आले, असे बसमधील प्रवासी श्यामराव मुत्यालवार यांनी सांगितले. धावती बस पेटली; पण चालकाच्या प्रसंगावधानाने बसमधील सर्व प्रवासी सुखरूप बाहेर आले.
तालुक्यातील सक्रूनाईकतांडा येथील ३९ प्रवासी हे हैदराबाद तिरुपती आदिलाबाद कृष्णा एक्स्प्रेसने हैदराबाद येथे जाण्यासाठी किनवटला येत होते़ अचानक बसने पेट घेतला तेव्हा प्रवासी गोंधळले, असे बसचालक अमोल पवार यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले़

Web Title: The fire started running

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.