चुकार्‍यांअभावी किनवटचे शेतकरी सापडले आर्थिक संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 07:02 PM2018-03-20T19:02:40+5:302018-03-20T19:02:40+5:30

 तूर विक्री करुन सव्वा महिना लोटत असताना शेतकर्‍यांच्या तुरीचे चुकारे चुकते न केल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

In the financial crisis, a coastal farmer was found unable to cheat | चुकार्‍यांअभावी किनवटचे शेतकरी सापडले आर्थिक संकटात

चुकार्‍यांअभावी किनवटचे शेतकरी सापडले आर्थिक संकटात

googlenewsNext

किनवट (नांदेड ) :  तूर विक्री करुन सव्वा महिना लोटत असताना शेतकर्‍यांच्या तुरीचे चुकारे चुकते न केल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. तर आॅनलाईन नोंदणी केलेल्या १ हजार १९१ शेतकर्‍यांची तूर अद्यापही तोलाईच्या प्रतीक्षेतच आहे.

कृषी उत्पन्न बाजार समिती किनवटने नाफेडमार्फत  ७ फेब्रुवारी २०१८ पासून तूर खरेदी सुरु कली. आजपर्यंत १ हजार ३०९  शेतकर्‍यांनी ५ कोटी  ४२ लाख २ हजार ३७५  रुपये किमतीची ९ हजार ९४५.३९  क्विंटल तूर  खरेदी केली. खरेदी केलेली तूर वखार महामंडळाच्या गोदामात साठवून  ठेवण्यात येत आहे. ७ फेब्रुवारी २०१८  रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने नाफेडमार्फत तूर खरेदीचा प्रारंभ झाला. प्रतिक्विंटल ५ हजार ४५० रुपये याप्रमाणे तुरीला भाव मिळू लागल्याने तूर नाफेडच्या  खरेदी केंद्रावर विकणे शेतकर्‍यांनी पसंद केले. २ हजार ५०० शेतकर्‍यांनी तूर खरेदीसाठी आॅनलाईन अर्ज केले. 

दररोज पन्नास, शंभर आॅनलाईन होतच आहेत. तूर ठेवण्यासाठी गोदामाची व्यवस्था नाही. सरकारकडे पैसा नसल्याने तूर खरेदी संथगतीने करण्याच्या तोंडी सूचना दिल्या जात असल्याने शेतकर्‍यांची तूर विक्रीसाठी होणारी संकलन केंद्रावर होणारी गर्दी  व खेटे मारणे पाहता केंद्रचालक कमालीचे गोंधळात पडले आहेत. विक्रीतून मिळणार्‍या रकमेचा घरखर्च, उसनवारीची परतफेड व लेकीबाळीच्या लग्नकार्यासाठी करावी ही अपेक्षाच भंग पडली. किनवटला मोठ्या प्रमाणात तूर विक्री करु पाहणार्‍या शेतकर्‍यांनी आॅनलाईन  अर्ज केले, त्यांच्या  तुरीची तोलाई बाकी असतानाच बिलोली, धार्माबादला खरेदी झालेली तूर किनवट येथील वखर महामंडळाच्या गोदामात आणल्याने नांदेडच्या  गोदाम सोडून तूर किनवटला का आली? असा सवाल आहे. तूर खराब असल्याने नांदेडच्या गोदामचालकाने ती स्वीकारली नसल्याचे कळते,  मग किनवटला ती का स्वीकारली, असा सवाल आहे.  

आठ दिवसांत रक्कम मिळेल
तूर खरेदीनंतर शेतकर्‍यांच्या चुकार्‍याबाबत जिल्हा मार्केटिंग अधिकारी सावंत (मुंबई) यांना वारंवार कळविले आहे. तशी विचारणाही केली आहे. आठ दिवसांत चुकार्‍याची रक्कम मिळेल
- रवी तिरमनवार, सचिव कृषी उत्पन्न बाजार समिती 

आर्थिक कोंडी  झाली
तुरीचे चुकारे मिळाले तर त्या पैशातून सालगडी ठेवावे व इतर खर्च भागवावा, अशी आशा होती. पण तूर विक्री करुन महिना लोटला तरी तुरीचे पैसे  न मिळाल्याने आर्थिक कोंडी झाली
- सुभाष मुंडे, शेतकरी आंदबोरी (चि)

पैसे देण्याची मानसिकता नाही
तूर खरेदी  केल्यानंतर तुरीचे पैसे शेतकर्‍यांना वेळीच म्हणजे सात दिवसांच्या आत मिळायला पाहिजे होते. पण सरकारची वेळीच पैसे देण्याची मानसिकता नाही. चोहीकडून शेतकर्‍यांना वेठीस धरले जात आहे. लग्नसराईचे दिवस अन् हक्काचे पैसे  मिळण्यास विलंब होत असून कोणाकडे न्याय मागावा? 
- अनिल क-हाळे पाटील, सभापती कृउबा समिती किनवट

वेळीच तुरीचे चुकारे  द्यावे

अत्यल्प पावसामुळे कोणत्याच पिकाचे उत्पन्न समाधानकारक नाही. तूर विक्रीपोटीची रक्कम वेळीच हातात मिळेल, दैनंदिन व्यवहार चालविण्यात मदत होईल असे वाटले; पण रक्कम काही हातात पडली नाही. शासनाने वेळीच तुरीचे चुकारे शेतकर्‍यांना द्यावे- गोपाळ पाटील इस्लापूरकर.

Web Title: In the financial crisis, a coastal farmer was found unable to cheat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.