बाईक-ट्रक धडकेत पित्याचा मृत्यू तर मुलगा गंभीर जखमी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2019 08:29 PM2019-01-11T20:29:12+5:302019-01-11T20:29:45+5:30

यात बाईकवरील पित्याचा जागीच मृत्यू झाला तर मुलगा गंभीर जखमी आहे.

father dies and his son seriously injured in bike-truck accident at loha | बाईक-ट्रक धडकेत पित्याचा मृत्यू तर मुलगा गंभीर जखमी 

बाईक-ट्रक धडकेत पित्याचा मृत्यू तर मुलगा गंभीर जखमी 

Next

लोहा (नांदेड ) : देड-लातुर राष्ट्रीय महामार्गावरील खरबी पाटीनजीक पिता-पुत्र जात असलेल्या बाईकला भरधाव वेगातील ट्रकने जोरदार धडक दिली. यात बाईकवरील पित्याचा जागीच मृत्यू झाला तर मुलगा गंभीर जखमी आहे. ही घटना आज दुपारी १.३० वाजता घडली. 

तालुक्यातील डेरला येथील संभाजी गंगाराम सालकमवाड (वय 60) व रामकिशन संभाजी सालकमवाड (वय 30) हे दोघे पिता-पुत्र बाजार व खाजगी कामानिमित्त सोनखेडला आले होते. यानंतर ते दोघे बाईकवरून  (MH 26 BG 9418) गावाकडे परतत होते. या दरम्यान, खरबी पाटीनजीक नांदेडवरून लातुरकडे भरधाव वेगात जाणा-या मालवाहु ट्रक ( क्र. MH 24 J 8795) त्यांच्या बाईकला जोरदार धडक दिली. यात संभाजी सालकमवाड जागीच ठार झाले तर रामकिशन गंभीर जखमी झाला. त्याच्यावर नांदेडच्या शंकरराव चव्हाण शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनास्थळी सोनखेड पोलिस ठाण्याचे सपोनि बालाजी बंडे, पोलिस नाईक प्रकाश साखरे, पोकाँ. गुरूनाथ कारामुंगे, राजेश मुंडे यांनी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला. 

Web Title: father dies and his son seriously injured in bike-truck accident at loha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.