नांदेड जिल्ह्यात ‘सेटलमेंट’ला शेतकऱ्यांचा ठेंगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2018 01:05 AM2018-06-24T01:05:39+5:302018-06-24T01:08:03+5:30

राज्य शासनाकडून छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दीड लाखांपर्यंतची कर्जमाफी देण्यात आली़ मागील वर्षभरापासून कर्जमाफीचे भिजत घोंगडे सुरू आहे़ दरम्यान, दीड लाखांवर कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ओटीएस वनटाईम सेटलमेंट ही योजना आणली़ परंतु, भविष्यात सरसकट कर्जमाफी मिळेल या आशेने शेतकऱ्यांनी सेटलमेंट योजनेकडे पाठ फिरविल्याचे चित्र जिल्ह्यात आहे़

Farmers scam 'Settlement' in Nanded district | नांदेड जिल्ह्यात ‘सेटलमेंट’ला शेतकऱ्यांचा ठेंगा

नांदेड जिल्ह्यात ‘सेटलमेंट’ला शेतकऱ्यांचा ठेंगा

Next
ठळक मुद्देकर्जमाफी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : राज्य शासनाकडून छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दीड लाखांपर्यंतची कर्जमाफी देण्यात आली़ मागील वर्षभरापासून कर्जमाफीचे भिजत घोंगडे सुरू आहे़ दरम्यान, दीड लाखांवर कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ओटीएस वनटाईम सेटलमेंट ही योजना आणली़ परंतु, भविष्यात सरसकट कर्जमाफी मिळेल या आशेने शेतकऱ्यांनी सेटलमेंट योजनेकडे पाठ फिरविल्याचे चित्र जिल्ह्यात आहे़
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत शेतक-यांना कर्जमाफी देण्यात आली़ आॅनलाईन अर्ज आणि विविध नियमांमुळे सदर योजनेचा लाभ मिळविण्यासाठी शेतक-यांना अडचणीचा सामना करावा लागला़ परंतु, कर्जमाफी झाल्याचा तसेच किती रक्कम झाली आदी सविस्तर माहिती वैयक्तिक मिळू लागल्याने शेतक-यांनी पारदर्शक कर्जमाफीबदल समाधान व्यक्त केले़
येणा-या काळात सरसकट कर्जमाफी होईल, अशी अपेक्षा आजही शेतक-यांना आहे़ त्यामुळेच वनटाईम सेटलमेंट योजनेकडे शेतकरी पाठ फिरवित आहेत़ दरम्यान, जिल्ह्यात १ लाख ३५ हजार शेतक-यांच्या खात्यावर ६९३ कोटी ९८ लाख रूपये जमा केले आहेत़ तर दीड लाखांवर कर्ज असणाऱ्या शेतक-यांची संख्या २५ हजारांवर असून आजपर्यंत यातील मोजक्याच शेतक-यांनी ओटीएसचा लाभ घेतला आहे़ जवळपास २५ हजार ५९६ शेतक-यांकडे दीड लाखांपेक्षा अधिक असलेली रक्कम २२७ कोटी ८५ लाख रूपये आहे़
आजपर्यंत किती शेतक-यांनी वनटाईम सेटलमेंट केली याचा आकडा जिल्हा अग्रणी बँकेकडे उपलब्ध नाही़ ओटीएससाठी शेतकऱ्यांप्रमाणेच बँकांदेखील उदासीन असल्याचे चित्र आहे़
---
बळीराजाला सरसकट कर्जमाफीची अपेक्षा़़़
एसबीआय बँकेच्या विविध शाखांमध्ये दीड लाखांपेक्षा अधिक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांचे मेळावे घेवून त्यांना ओटीएस योजनेतून दीड लाखांपेक्षा अधिक रक्कम भरून कर्जमाफीतील दीड लाख रूपयांचा लाभ घेण्यासाठी प्रोत्साहित केले़ एसबीआयच्या २१ हजार ६४३ शेतकऱ्यांपैकी केवळ ३१० शेतकऱ्यांनी दीड लाखांवरील रक्कम भरून कर्जमाफीचा लाभ घेतला आहे़ शेतकऱ्यांनी ३़९१ कोटी रूपये जमा केले़ शेतकरी अधूनमधून बँकांमध्ये चकरा मारून कर्जमाफीची माहिती घेत आहेत़ तर येणाऱ्यां लोकसभा, विधानसभा निवडणुकांपूर्वी सरसकट कर्जमाफी दिली जाईल, अशी अपेक्षा बहुतांश शेतकऱ्यांना असल्याने सेटलमेंटकडे शेतकरी दुर्लक्ष करीत आहेत़
---
शेतकऱ्यांना आवाहन
शासनाच्या वतीने वनटाईम सेटलमेंटसाठी वेळोवेळी मुदतवाढ दिली आहे़ येत्या ३० जूनपर्यंत शेतकऱ्यांना वनटाईम सेटलमेंट योजनेचा लाभ घेता येईल़ त्यामुळे शेतकऱ्यांनी सदर योजनेच्या माध्यमातून दीड लाखांवरील रक्कम भरून दीड लाख रूपये कर्जमाफीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक प्रवीण फडणीस यांनी केले आहे़

Web Title: Farmers scam 'Settlement' in Nanded district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.