लोकसभेच्या उमेदवारीवरुन मुख्यमंत्र्यांसमोरच काथ्याकुट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2019 12:25 AM2019-02-23T00:25:29+5:302019-02-23T00:26:07+5:30

काँग्रेसने लोकसभेसाठी आ़अमिता चव्हाण यांच्या नावाची शिफारस केली आहे़ पक्षनेतृत्वाकडे तसा अहवालही पाठविण्यात आला आहे़ तर दुसरीकडे, भाजपामध्ये मात्र अजूनही उमेदवार निवडीवरुन काथ्याकुट सुरुच आहे़

Excerpts from the Chief Minister for the Lok Sabha election | लोकसभेच्या उमेदवारीवरुन मुख्यमंत्र्यांसमोरच काथ्याकुट

लोकसभेच्या उमेदवारीवरुन मुख्यमंत्र्यांसमोरच काथ्याकुट

Next
ठळक मुद्देपदाधिकाऱ्यांनी मॅनेज उमेदवार देवू नका, अशी केली मागणी

नांदेड : काँग्रेसने लोकसभेसाठी आ़अमिता चव्हाण यांच्या नावाची शिफारस केली आहे़ पक्षनेतृत्वाकडे तसा अहवालही पाठविण्यात आला आहे़ तर दुसरीकडे, भाजपामध्ये मात्र अजूनही उमेदवार निवडीवरुन काथ्याकुट सुरुच आहे़ त्याचा प्रत्यय आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही आला़ फडणवीस यांच्यासमोरच लोकसभा उमेदवार हा मॅनेज होणारा देवू नका अशी भाजपाच्या नेत्यांची जाहीरपणे मागणी केली़ त्यावर शेवटी मुख्यमंत्र्यांनीच फक्त कमळ हाच उमेदवार असल्याचे सांगत या चर्चेवर पडदा टाकला़
लोकसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता कधीही लागू शकते़ त्यामुळे सर्वच पक्ष प्रचाराला लागले आहेत़ परंतु, नांदेडात अद्यापही भाजपाचा उमेदवार ठरला नाही़ आ़राम पाटील रातोळीकर, धनाजीराव देशमुख, डॉ़साहेबराव मोरे यांच्यासह अनेकांची नावे चर्चेत आहेत़ परंतु, पक्ष उमेदवारी कोणाला देणार याबाबत कुणीही ठामपणे सांगू शकत नाही़
त्यामुळे उमेदवारीवरुन केवळ चर्चाचर्वण सुरु आहे़ शुक्रवारी भाजपाच्या बुथ कमिटी मेळाव्यात सर्वच पदाधिकाºयांनी उमेदवारीचा विषय आपल्या भाषणात घेतला़ त्यात भाजपाने अनेक कल्याणकारी योजना राबविल्या आहेत़ मागील निवडणुकीत जे आमच्यासोबत नव्हते असे दिग्गज आता व्यासपीठावर आहेत़ यातील प्रत्येकाची ताकद आहे़ त्यामुळे जो उमेदवार पक्ष देईल त्याच्या पाठीशी हे सर्व जण भक्कमपणे उभे राहतील़ तर आ़प्रताप पाटील चिखलीकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे पाहत यावेळी उमेदवार कुणीही द्या पण तो मॅनेज होणारा देवू नका़ वातावरण चांगलं आहे. परंतु, उमेदवारही तसा सक्षम हवा़ काँग्रेस काहीही म्हणत असले तरी लोकसभेचा उमेदवार हे अशोकराव चव्हाण हेच असतील़ मी त्यांच्या शाळेत शिकलो़ त्यामुळे हे मला चांगले माहीत आहे़
माजी खा़भास्करराव पाटील खतगावकर म्हणाले, जिंकणार याबद्दल शंका नाही़ उमेदवार कुणीही द्या़ व्यासपीठावर असलेले कुणीही मॅनेज होणारे नाहीत़ त्यामुळे चिंता करु नका असे सांगितले़ उमेदवारीवरुन चाललेल्या या काथ्याकुटावर फडणवीस म्हणाले, अशोकराव चव्हाण यांची खासियत आहे़ ते असे दाखवितात की सगळेच आपल्यासोबत आहेत़ उगाच एखाद्याला फोन करतात़ त्यामुळे इतरांना वाटते हे मॅनेज आहेत़ असेही ते म्हणाले़ उमेदवारीवरुन चाललेल्या या काथ्याकुटावर उपस्थित बुथप्रमुखांनी टाळ्या वाजविल्या़

Web Title: Excerpts from the Chief Minister for the Lok Sabha election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.