नांदेड स्थानकाच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2019 12:28 AM2019-02-16T00:28:49+5:302019-02-16T00:29:17+5:30

काश्मिरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर नांदेड रेल्वेस्थानकातील सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे़ त्याचबरोबर स्थानक व परिसरात डॉग स्कॉडच्या मदतीने वारंवार तपासणी केली जात असून विशेष रेल्वे सुरक्षा बलाची एक तुकडी तैनात करण्यात आली आहे़

Enhanced security system of Nanded station | नांदेड स्थानकाच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ

नांदेड स्थानकाच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ

Next

नांदेड : काश्मिरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर नांदेडरेल्वेस्थानकातील सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे़ त्याचबरोबर स्थानक व परिसरात डॉग स्कॉडच्या मदतीने वारंवार तपासणी केली जात असून विशेष रेल्वे सुरक्षा बलाची एक तुकडी तैनात करण्यात आली आहे़
दहशतवादी कारवायांशी संबंधीत अनेकांना नांदेडातून उचलण्यात आल्याच्या घटना काही वर्षापूर्वी घडलेल्या आहेत़ त्याचबरोबर नांदेड स्थानक उडवून देण्याच्या वारंवार येणाऱ्या धमक्या आणि मेलमुळे काही दिवसांपूर्वी नांदेड रेल्वेस्थानक परिसरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता़ परंतु, तपासाअंती वेडसर व्यक्तीने सदर कृत्य केल्याचे पुढे आले होते़ दरम्यान, काश्मिरमध्ये गुरूवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे नांदेडसह अनेक रेल्वेस्थानकांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली़
नांदेड रेल्वेस्थानकातून देशातील विविध कानाकोप-यात रेल्वे जातात़ त्याचबरोबर नांदेड हे दहशतवादी कारवायासंबंधीत घडामोडीत चर्चेत असते़ त्यामुळे मागील काही दिवसांपासून स्थानकात कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे़ त्यातच काश्मिरमध्ये घडलेल्या घटनेनंतर आणखी वाढ करण्यात आली आहे़ सध्या नांदेड स्थानकात रेल्वे पोलीस ठाण्याचे पाच अधिकारी आणि ४० कर्मचारी कर्तव्यावर आहेत़ त्याचबरोबर रेल्वे सुरक्षा बलाचे जवान आणि नव्याने विशेष रेल्वे सुरक्षा बलाची १०० जणांची तुकडी तैनात करण्यात आली आहे़
नांदेड फलाटावर येणा-या तसेच संशयित हालचाली आढळून आल्यास पोलिसांकडून तत्काळ चौकशी केली जात आहे़ तर डॉग स्कॉडच्या सहाय्याने स्थानक आणि फलाटावर वारंवार तपासणी केली जात आहे़ अनोळखी वस्तू, रेल्वेतील बेवारस वस्तूंचीदेखील काळजीपूर्वक तपासणी केली जात आहे़

Web Title: Enhanced security system of Nanded station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.