मतदारयादी पुनरिक्षण कार्यक्रमासाठी बचतगट, सामाजिक संस्थांची मदत घेणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2018 12:58 AM2018-09-23T00:58:14+5:302018-09-23T00:58:26+5:30

जिल्ह्यात सुरु असलेल्या मतदारयादी शुद्धीकरण मोहिमेत बचतगट, सामाजिक संघटना, महाविद्यालयीन युवकांची मदत घेतली जाणार आहे. शाळेतील प्रभातफेरीद्वारे मतदार जनजागृती करावी तसेच वेगवेगळ्या स्पर्धाच्या माध्यमातून मतदारयादी अद्ययावत करण्यासाठी तहसीलदारांसह बीएलओंनी प्रयत्न करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिले.

Electorate will take help groups, social organizations for the re-examination program | मतदारयादी पुनरिक्षण कार्यक्रमासाठी बचतगट, सामाजिक संस्थांची मदत घेणार

मतदारयादी पुनरिक्षण कार्यक्रमासाठी बचतगट, सामाजिक संस्थांची मदत घेणार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : जिल्ह्यात सुरु असलेल्या मतदारयादी शुद्धीकरण मोहिमेत बचतगट, सामाजिक संघटना, महाविद्यालयीन युवकांची मदत घेतली जाणार आहे. शाळेतील प्रभातफेरीद्वारे मतदार जनजागृती करावी तसेच वेगवेगळ्या स्पर्धाच्या माध्यमातून मतदारयादी अद्ययावत करण्यासाठी तहसीलदारांसह बीएलओंनी प्रयत्न करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिले.
शनिवारी नायगाव येथे नायगाव विधानसभा मतदारसंघाअंतर्गत समाविष्ट असलेल्या नायगाव, उमरी व धर्माबाद तालुक्यातील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी अर्थात बीएलओ व पर्यवेक्षिकांची प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत जिल्हाधिकारी डोंगरे यांनी प्रमुख मार्गदर्शन केले.
प्रत्येक निवडणुकीमध्ये मतदारयादीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. सध्या जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीची तयारी प्रशासकीय पातळीवर केली जात आहे. १ सप्टेंबर रोजी प्रारुप मतदारयादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
निवडणुकीमध्ये मतदारयादी, मतदार आणि आता ईव्हीएम तसेच व्हीव्हीपॅट मशीनला महत्त्व आले आहे. कर्मचाऱ्यांनी प्रत्येक निवडणूक नवीन समजून प्रशिक्षण घ्यावे. निवडणूक प्रक्रियेतील बदलही आत्मसात करावे, असा सल्ला दिला.
यावेळी मतदानस्तरीय केंद्रस्तरीय अधिकारी व पर्यवेक्षकांच्या जबाबदाºया, त्यांची कामे याबाबत मतदार नोंदणी अधिकारी तथा धर्माबादचे उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांनी मार्गदर्शन केले. उमरीचे सहायक मतदान अधिकारी तथा तहसीलदार श्रीकांत गायकवाड, नायगावच्या तहसीलदार तथा सहायक मतदान नोंदणी अधिकारी सुरेखा नांदे, धर्माबादच्या तहसीलदार ज्योती चव्हाण यांनीही यावेळी आपापल्या तालुकाअंतर्गत सुरु असलेल्या मतदार नोंदणी विशेष पुनरिक्षण कार्यक्रम व निवडणूक विषयक कामकाजाचा आढावा यावेळी सादर केला.
नायब तहसीलदार सुनील माचेवाड, नायब तहसीलदार शंकर नरावाड, नायब तहसीलदार डी. डी. लोंढे यांची यावेळी उपस्थिती होती. या प्रशिक्षण शिबिरात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, पर्यवेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लोकसभा निवडणुकीपूर्वी नाव नोंदविण्याची शेवटची संधी
जिल्ह्यात १ सप्टेंबरपासून सुरु झालेल्या मतदारयादी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमातंर्गत १ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारुप मतदार यादीवर हरकती, आक्षेप, दावे स्वीकारण्यात येत आहेत. मतदारांना नावनोंदणी, नाव वगळणी, दुरुस्तीही ३१ आॅक्टोबर २०१८ पर्यंत करता येणार आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी मतदारयादी अद्ययावत करण्यासाठी ही शेवटची संधी ठरणार आहे. निवडणूक काळात चुका दर्शविण्यापेक्षा वेळेतच दुरुस्ती करुन घेतली तर निश्चित लाभदायक ठरणार आहे याची सर्व मतदारांना बीएलओंनी जाणीव करुन द्यावी. त्यातून पुढील काळातील वाद टाळता येतील असेही जिल्हाधिका-यांनी सांगितले.

Web Title: Electorate will take help groups, social organizations for the re-examination program

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.