स्थानिक नेत्यांच्या नाराजीचा काँग्रेसला ‘फटका’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2019 12:02 AM2019-05-27T00:02:07+5:302019-05-27T00:04:03+5:30

मालेगाव व परिसर दिवंगत शंकरराव चव्हाण यांच्या काळापासून काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी मालेगाव सर्कल नेत्यांना जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाची व इतर महत्त्वाची पदे दिली. परंतु पदाधिकाऱ्यांनी जनतेशी संपर्क न ठेवल्यामुळे त्याचा फटका चव्हाणांना या निवडणुकीत बसला़

Congress got heat from local leaders | स्थानिक नेत्यांच्या नाराजीचा काँग्रेसला ‘फटका’

स्थानिक नेत्यांच्या नाराजीचा काँग्रेसला ‘फटका’

Next
ठळक मुद्देमालेगाव सर्कल विश्लेषण अनेक महत्त्वाची पदे असतानाही काँग्रेसला मताधिक्य घेण्यात अपयश

शरद वाघमारे।
नांदेड : मालेगाव व परिसर दिवंगत शंकरराव चव्हाण यांच्या काळापासून काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी मालेगाव सर्कल नेत्यांना जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाची व इतर महत्त्वाची पदे दिली. परंतु पदाधिकाऱ्यांनी जनतेशी संपर्क न ठेवल्यामुळे त्याचा फटका चव्हाणांना या निवडणुकीत बसला़ विशेष म्हणजे लोकसभा युवक काँग्रेस अध्यक्ष, बाजार समितीचे सभापती, माजी जि. प. अध्यक्ष, विद्यमान सभापती, जि.प.सदस्य, कारखान्याचे संचालक यांच्या गावात काँग्रेस पिछाडीवर गेली आहे़
पूर्वीचा मुदखेड मतदारसंघ व सध्याच्या भोकर मतदारसंघातील प्रचाराचा नारळ मालेगाव येथून फोडला जायचा. पूर्वी या मतदार संघातून माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांना मोठे मताधिक्य मिळाले. शिवाय मुख्यमंत्री व इतर पदे मिळाले.
त्यांनीही आपला मतदार म्हणून या भागातील पप्पू पाटील कोंढेकर यांना युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्षाचे पद, बी. आर. कदम यांना बाजार समितीचे सभापती, माणिकराव इंगोले यांना जिल्हा परिषदेचे अध्यक्ष यासारखी महत्त्वाची पदे दिली. शिवाय आजघडीला मालेगाव येथील संगीता अटकोरे यांना जि. प. सदस्य, उज्ज्वला इंगोले यांना महिला तालुका काँग्रेस, केशवराव इंगोले यांना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालक, रंगराव इंगोले यांना भाऊराव चव्हाण साखर कारखाना संचालक पद तर कामठा येथील मंगला स्वामी यांच्याकडे पंचायत समितीचे सभापतीपद आहे.
मालेगाव सर्कलमधील काही गावांत महत्त्वाची पदे कार्यकर्त्यांना दिली आहेत. एवढी मोठी पदे असताना लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांना मात्र पदाधिकाऱ्यांच्या गावात समाधानकारक मतदान मिळू शकले नाही.
लोकसभा निवडणुकीत मालेगाव सर्कलमधील मालेगाव, कोंढा, कामठा, गणपूर, देगाव कु, सावरगाव, देळूब, मेंढला, पिंपळगाव महादेव, शेलगाव, दाभड, गणपूर, उमरी, सावरगाव, धामदरी, सांगवी, खडकी ही गावे काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखली जातात़ परंतु स्थानिक पातळीवर नेत्यांनी या निवडणुकीत मात्र मतदारांशी सुसंवाद साधला नसल्याचेच दिसून येत आहे.
काँग्रेसची हक्काची मते भाजप, वंचित आघाडीला
प्रचार व निवडणुकीची जबाबदारी, वर्षानुवर्षे पदे या सर्व बाबी नागरिक व मतदार यांना खटकणाºया होत्या. या भागातील मतदारांना अशोकराव चव्हाण यांचे नेतृत्व मान्य होते. परंतु स्थानिक नेत्यांबद्दलचा असंतोष होता. या जुन्या नेत्यांना बदलून नव्या पिढीच्या कार्यकर्त्यांना काँग्रेस पक्षात संधी असावी अशी अपेक्षा होती. स्थानिक नेत्यांच्या नाराजीमुळेच भाजपा व वंचित बहुजन आघाडीला काँग्रेसची हक्काची मते मिळाली़ त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत स्थानिक पातळीवर बदल करून नव्या पिढीच्या चेहºयाला संधी द्यावी, अशी चर्चा ऐकावयास मिळत आहे.

Web Title: Congress got heat from local leaders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nandedनांदेड