नांदेड शहरात नाताळची लगबग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2018 12:10 AM2018-12-25T00:10:00+5:302018-12-25T00:11:55+5:30

नादेड शहर हे आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक या राज्यांच्या सीमेवर असल्यामुळे येथे तेलगु, कन्नडी, हिंदी भाषिक समाजबांधव मोठ्या संख्येने राहतात़ त्यामुळे वजिराबाद येथील मेथॉडिस्ट चर्चमध्ये हिंदी भाषेत प्रार्थना केली जाते़ सध्या नांदेड शहरात विविध भागात लहान, मोठ्या १७ ते १८ चर्चची स्थापना झाली आहे़

Christmas in Nanded city | नांदेड शहरात नाताळची लगबग

नांदेड शहरात नाताळची लगबग

Next

भारत दाढेल ।

नांदेड शहरात ख्रिस्ती समाज बांधव संख्येने अल्प असले तरी हा समाज इतर समाजाशी बंधुभावाने राहत असल्याने तो त्यांच्यात समरस झाला आहे़ ख्रिसमस निमित्ताने वजिराबादच्या मेथॉडिस्ट चर्चच्या वतीने दरवर्षी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते़ नाताळचा हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो़ त्यानिमित्त वजिराबाद चर्चचे मायकेल जगदाळे यांनी मेथॉडिस्ट चर्च व विविध उपक्रमांची माहिती देताना सांगितले, १९६० मध्ये वजिराबाद येथे चर्चची स्थापना झाली़ त्या वेळेस उस्मानशाही मिलमध्ये काही लोक चांगल्या पदावर कामाला होते़ त्यात काही शिक्षक व मजूरसुद्धा होते. त्यांनी चर्चच्या वाढीसाठी हातभार लावला.
शहरात विविध कार्यक्रम
ख्रिसमसनिमित्त मेथॉडिस्ट चर्चच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे़ ख्रिसमसच्या दिवशी २५ डिसेंबर रोजी वजिराबाद येथील चर्चमध्ये सकाळी साडेनऊ वाजता ख्रिसमस बडे दिन की आराधना होणार आहे़ २६ डिसेंबर रोजी सायंकाळी धार्मिक मसिह गीतस्पर्धा, २९ डिसेंबर रोजी संदेश स्पर्धा, ३१ डिसेंबर रोजी सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे़ २८ डिसेंबर रोजी कुसुम सभागृहात सायंकाळी साडेचार ते रात्री ८ वाजेपर्यंत येशु मसिहा के नाम हा कार्यक्रम आयोजित केला आहे़ प्रमुख वक्ते पा़ संजय गायकवाड हे राहणार असून प्रसिद्ध गायक अजय चव्हाण यांचा गीतांचा कार्यक्रम होणार आहे़
दया प्रार्थना भवन
वाडी बु़ येथील उमा, महेश कॉलनी येथील दर्या प्रार्थना भवन हे २०१५ पासून सुरू झाले आहे़ या ठिकाणी पास्टर करण सारकी हे प्रार्थना घेवून उपस्थितांचे प्रबोधन करतात़ नैतिकता व मानवतावादाची शिकवण आपल्या व्याख्यानातून देतात़ सेवानिवृत्त प्राध्यापक बी़ जी़ घोडके यांनी या प्रार्थना भवनची उभारणी करण्यासाठी पुढाकार घेतला़
68 वर्षांची परंपरा
ख्रिस्ती समाजाच्या शहरातील प्रमुख चर्चपैकी वजिराबाद येथील मेथॉडिस्ट चर्चला ६८ वर्षांची पंरपरा आहे़ या चर्चमध्ये समाजातील गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाविषयी मार्गदर्शन केल्या जाते़ दर रविवारी सकाळी प्रार्थना तसेच विविध विषयांवर प्रबोधन केले जाते़ जवळपास दोन हजार समाजबांधव या चर्चमध्ये येतात़ हे चर्च शहरातील सर्वात जुने असल्याने या चर्चच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते़
शांतीनिकतेन
माळटेकडी येथील मिशनरी आॅफ चॅरीटीची शांतीनिकेतन मदर तेरेसा होम ही संस्था वृद्ध, निराधार, अपंगांना मायेचा आधार देणारी आहे़ मागील २५ वर्षांपासून त्यांचे कार्य सुरू आहे़ज्यांना कोणी वाली नाही, अशांना आधार देत शांतीनिकेतन मदर तेरेसा होमने जगण्याची आशा निर्माण केली आहे़ शहरातील काही संस्था, बँक व दानशूर व्यक्ती शांतीनिकेतन या ठिकाणी जाऊन आवश्यक ती मदत करतात़

ख्रिस्ती समाज शांतताप्रिय असल्यामुळे तो आपल्या विविध मागण्यांसाठी संघर्ष करीत नाही़ मोर्चे, धरणे, आंदोलनात तो कुठेही येत नाही़ नांदेड शहरात ख्रिस्ती बांधवांसाठी सुसज्ज असे एकही चर्च नाही़ अथवा कार्यक्रमासाठी हक्काची जागा नाही़ लोकप्रतिनिधींनी ख्रिस्ती बांधवांच्या या मागणीकडे लक्ष द्यावे, अशी मागणी आहे़ - मायकल जगदाळे, ले-लीडर मेथॉडिस्ट चर्च
प्रमुख चर्च
शहरात वजिराबाद येथे मथॉडिस्ट चर्च, विसावानगर येथे रोमन कॅथलीक चर्च, हिंगोलीगेट येथे बेथसैदा, शारदानगर येथे हेब्रोन व उमा महेश कॉलनी येथे दया प्रार्थना भवन हे चर्च आहेत़ वजिराबाद चर्चचे प्रमुख रेव्ह़ सॅम्युअल केनेथ आहेत़ यावर्षी प्रथमच हस्सापूर येथील क्राईस्ट डीवाईन मिनिस्ट्री चर्च मध्ये २५ रोजी सकाळी १० वाजता प्रार्थना आयोजित केल्याचे पास्टर जोसेफ सॅम्युअल राज यांनी सांगितले़


२५ डिसेंबर हा दिवस ख्रिस्ती समाजासाठी अत्यंत आनंदी व उल्हासित करणारा दिवस आहे़ या दिवशी येशू ख्रिस्त जन्माला आला़ ख्रिस्ताने जगाला शांतीचा संदेश दिला़ शेजाऱ्यावर प्रीती करण्यास शिकविले. एवढेच नव्हे, तर आपल्या वैºयावरही प्रीती करा, हा संदेश येशू ख्रिस्ताने दिला़ जे उपाशी असतील त्यांना खायला द्या, उघड्यांना कपडे पांघरा, जे आजारी असतील त्यांची सेवा करा, गरजवंतांसाठी धाऊन जा़ म्हणजे तुमच्यासाठी स्वर्गाचे दार उघडले जाईल, असा संदेश येशूने दिला़ - पास्टर करण डी़ एस़, दया प्रार्थना भवन,

Web Title: Christmas in Nanded city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.