कंधारचा भूईकोट किल्ला ठरतोय आकर्षणाचा केंद्रबिंदू; वर्षभरात १ लाख पर्यटकांनी दिली भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2018 06:09 PM2018-01-15T18:09:14+5:302018-01-15T19:03:09+5:30

शहरातील राष्टकुटकालीन भूईकोट किल्ला पर्यटकांसाठी मेजवानी ठरत आहे. २०१७ मध्ये या किल्ल्यास जवळपास १ लाख ३ हजार पर्यटकांनी भेट दिली. यात विद्यार्थी, इतिहास प्रेमी व हौशी पर्यटकांचा समावेश आहे. 

The centerpiece of attraction leads to the fort of Kutch in Kandahar; Over a lakh tourists visited the place during the year | कंधारचा भूईकोट किल्ला ठरतोय आकर्षणाचा केंद्रबिंदू; वर्षभरात १ लाख पर्यटकांनी दिली भेट

कंधारचा भूईकोट किल्ला ठरतोय आकर्षणाचा केंद्रबिंदू; वर्षभरात १ लाख पर्यटकांनी दिली भेट

googlenewsNext

कंधार (नांदेड): शहरातील राष्टकुटकालीन भूईकोट किल्ला पर्यटकांसाठी मेजवानी ठरत आहे. २०१७ मध्ये या किल्ल्यास जवळपास १ लाख ३ हजार पर्यटकांनी भेट दिली. यात विद्यार्थी, इतिहास प्रेमी व हौशी पर्यटकांचा समावेश आहे. 

कंधार शहरास हिंदू, बौद्ध, जैन,व मुस्लिम धार्मिक स्थळांची मोठी देणगी लाभली आहे. यात भूईकोट किल्ला मोठी भर टाकतो. किल्ल्याची रचना व अंतर्गत वास्तू वैशिष्ट्यपूर्ण असल्याने ते पर्यटकांना नेहमी आकर्षणाचा विषय ठरतात.  यामुळेच सन 2016 साली किल्ल्याला 84 हजार 233 पर्यटकांनी भेट दिली तर सन 2017 ही संख्या वाढत जाऊन 1 लाख 3 हजार 345 वर पोहचली. 

किल्ला संवर्धन कामे चालू
राष्ट्रकुटकालीन भुईकोट किल्ला स्थापत्यकलेची अतिशय देखणी वास्तु मानली जाते़ २४ एकरवरील विस्तीर्ण बांधकाम इतिहासप्रेमी व पर्यटकांना भुरळ घालणारे आहे़ तटबंदी, बुरुज व आतील बारादरी, लालमहाल, राणीमहाल, शिशमहाल, बारूदखाना, कैदखाना, जलमहाल, दरबार महल, राजा महाल, राजबाग स्वार, अंबरखाना, प्रवेशद्वार, भुयारी मार्ग आदी किल्ल्यातील बांधकामे, कलाकुसर आदीने वास्तु भक्कम करण्यात आली़ या वास्तुला खंदकाचे संरक्षण कवच देण्यात आले़ ऐतिहासिक वास्तुचा बाराशे वर्षांचा वैभवशाली समृद्ध वारसा नानाविध समस्येने त्रस्त झाला़ २००२ पासून ‘लोकमत’ने वास्तु जतन, डागडुजी, सौंदर्यीकरण, पर्यटकांच्या सोयी सुविधा, झाडाझुडुपांचे समूळ उच्चाटन, लालमहाल पर्यटकांसाठी खुला करणे आदींसाठी सातत्याने पाठपुरावा केला़ 
कोट्यवधींचा निधी मिळत  राहिला़ त्यातून अंतर्गत व बाह्यकामे मोठ्या प्रमाणात झाली़ किल्ल्याअंतर्गत असलेल्या अनेक वास्तुंचे भग्नावशेष हा एक महत्त्वपूर्ण विषय राहिला़ 

किल्ल्यात अनेक राजे, किल्लेदार यांनी उभारलेल्या वास्तुची मोठी पडझड झाली़ त्यामुळे सुशोभिकरणाची गरज महत्त्वाची झाली़ केंद्र सरकार पुरस्कृत योजनेअंतर्गत किल्ला विकासासाठी ५ वर्षांपूर्वी ३ कोटी ४० लाख ७८ हजारांचा निधी केंद्र शासनाने मंजूर केला़ त्यात पर्यटकांचे आगमन व सुविधा केंद्र, सुरक्षा कक्ष व तिकीट घर, प्रसाधनगृह, पादचारी रस्ता, वाहनतळ, फुड प्लाझा, कुंपनभिंत, कारंजे पूल आदी कामाचा त्यात समावेश करण्यात आला़ मोठ्या प्रमाणात झालेल्या कामांमुळे किल्ला विकासाला चालना मिळाली़ तरीही अंतर्गत वास्तुचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले़ किल्ल्यातील वास्तुची पुनर्बांधणी, जलव्यवस्थापन, खंदकात कायम पाणी, पोलीस चौकी, झाडांचे समूळ उच्चाटन हा विषय ऐरणीवर राहत आला़ मूळ वास्तुला आकार देवून पर्यटकांना राष्ट्रकुटकाळातील इतिहासाकडे आकर्षित करण्याचे प्रयत्न गरजेचे झाले़ 

पुनर्बांधकाम सुरू
पूर्वीच्या काळात असलेल्या      २ बाय ४ बाय ६ आकारातील वीट, चुना बांधकाम किल्ल्यांतर्गत भग्नावशेष वास्तुचे बांधकाम करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु     आहे़ लाल मातीची सुरकी, गुळाचे पाणी, बेलफळाचे चिकट पाणी, सिरस, जवस, साळ आदींचे मिश्रण केले जात आहे़ दोन दिवस पाण्यात भिजवून त्याचे घाण्यात एकत्रित करून बांधकामात वापरले जात आहे़ त्यातून बांधकाम मजबूत करण्यावर भर दिला जात आहे़

दगडी बांधकाम
किल्ल्याच्या आतील व बाहेरील तटबंदी व ढासळलेले बुरुजाचे बांधकाम दाणा घडईमधील घडविलेल्या दगडाने केले जात आहे़ तालुक्यातील बोरी बु़ येथील दगडी खाणीचा वापर केला जात आहे़ बुरुज व तटबंदी यांचे दगडीकाम, डागडुजी केली जात आहे़

लाकडी काम
किल्ल्यांतर्गत असलेल्या अनेक वास्तुत जुने माळवद पद्धतीच्या असल्याने त्याची दुरुस्ती व नवीन सागवान, लाकडाचा वापर केला जात आहे़ किल्ला अंतर्गत व बाहेरील बुरुज, तटबंदी, झाडा झुडुपांनी मुख्य बांधकाम खिळखिळे केले जाते़ त्याचे समूळ उच्चाटन केमिकल्सचा वापर करून करण्यात येणार आहे़  त्यामुळे वास्तुची पडझड थांबण्यास मदत मिळणार आहे़ 

सुविधा वाढल्याने पर्यटक वाढतील 
गेल्या काही दिवसांपासून बुरुज व किल्ल्याची अंतर्गत डागडुजी झाल्याने पर्यटकांची संख्या वाढत आहे. यासोबतच किल्ल्याची संपूर्ण स्वच्छता केली, गाईड व माहिती पुस्तिका, सुरक्षा आदी आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या तर पर्यटकांची संख्या वाढेल अशी माहिती माजी आमदार गुरूनाथ कुरूडे यांनी दिली. 

चांगले काम करण्यास भर 
पुरातत्त्व विभागाच्या सूचनेनुसार व कंत्राटदारांच्या मार्गदर्शनाखाली किल्ला जतनाची दुरुस्ती कामे सुरु आहेत. यात बांधकाम, लाकडी काम, वीट - दगडी काम, चांगल्या पद्धतीने केले जात आहे. ते अधिक टिकाऊ असेल यावर भर देण्यात येत आहे.
- सुबोध वाघमारे, अभियंता तथा पर्यवेक्षक़

Web Title: The centerpiece of attraction leads to the fort of Kutch in Kandahar; Over a lakh tourists visited the place during the year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nandedनांदेड