माहूरात वृक्षतोड प्रकरणी वनपरीक्षेत्र अधिकारी, वनपालावर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2018 06:25 PM2018-06-29T18:25:03+5:302018-06-29T18:26:10+5:30

अवैधरित्या परवानगी देवून शासनाच्या ४८ लाख रूपय किमंतीच्या मालमत्तेची नुकसान  व शासनाचा विश्वासघात केल्याने सहाय्यक वनसंरक्षक राजेंद्र नाले  यांच्या तक्रारीवरून माहूर पोलिसांनी २८ जून रोजी फसवणुकीच्या गुन्हा दाखल केला़

In the case of a tree trunk in the desert, forest officer filed a complaint against the forest officer | माहूरात वृक्षतोड प्रकरणी वनपरीक्षेत्र अधिकारी, वनपालावर गुन्हा दाखल

माहूरात वृक्षतोड प्रकरणी वनपरीक्षेत्र अधिकारी, वनपालावर गुन्हा दाखल

Next

श्रीक्षेत्र माहूर ( नांदेड ) : तालुक्यातील मौजे शेखफरीद वझरा येथील सर्वे नं.६ द व ६ छ मधील १२१ सागवान झाडांची वनपरीक्षेत्र अधिकारी ग.ना.जाधव व परीमंडळ अधिकारी एम.एन.देशमुख यांनी अवैधरित्या परवानगी देवून शासनाच्या ४८ लाख रूपय किमंतीच्या मालमत्तेची नुकसान  व शासनाचा विश्वासघात केल्याने सहाय्यक वनसंरक्षक राजेंद्र नाले  यांच्या तक्रारीवरून माहूर पोलिसांनी २८ जून रोजी फसवणुकीच्या गुन्हा दाखल केला़ त्यामुळे वनविभागात खळबळ उडाली आहे़ 

सह्याद्री पर्वताच्या घनदाड सागवानी वृक्षांनी वसलेल्या मौजे शेख फरीद वझरा येथील सर्वे नं.६ द मधील ८१ व ६ छ मधील सुमारे १२१ बहुमुल्य सागवान झाडाना तोड करण्याची परवानगी १३ डिसेंबर २०१७ रोजी दिली होती़ मात्र त्या बाबत वनविभागाकडे प्रथम गुन्हा प्रतीवृत क्रं. १/२०१८ व २/ २०१८ नुसार वन गुन्हा भारतीय व भारतीय वन अधिनियम १९२७ चे कलम २६ (१) फ नुसार दाखल करण्यात आला होता़ त्यामध्ये संबंधित शेतमालक दत्ता नागोबा टेंबरे, देवकाबाई शेकुराव टेंबरे (रा.शेख फरीद वझरा) यांना ते झाडे तोडण्यास निय्यमबाह्य परवानगी देणारे  तत्कालीन वनपरीक्षेत्र अधिकारी ग.ना.जाधव व वनपाल एम.एन.देशमुख यांनी जी परवानगी दिली ती परवानगी नियमबाह्य असल्याचे सहाय्यक वनसंरक्षक किनवट यांच्या तपासात निष्षन झाले़.

वनपरीक्षेत्र अधिकारी व वनपाल हे शासनाचे नोकर असताना शासनाची फसवणूक व विश्वासघात करून अवैधरीत्या वृक्षतोडीस परवानगी दिल्याने शासनाच्या ४८ लाख रुपये वनसंपदेचे नुकसान झाले़ वनपरीक्षेत्र अधिकारी ग.ना.जाधव व वनपाल देशमुख यांच्याविरूध भारतीय दंड विधान १८६० प्रमाणे कायदेशीर कार्यवाई व्हावी म्हणून सहाय्यक वनसंरक्षक राजेंद्र नाले यांच्या तक्रारीवरून २८ जून रोजी गुन्हा दाखल करण्यात आला़  पुढील तपास पोलिस निरीक्षक लक्ष्मण राख यांच्या मार्गदर्शनात पी.ए.आय़ अमोल धावरे, पो.का.धनजय बटेवार हे करीत आहेत़

Web Title: In the case of a tree trunk in the desert, forest officer filed a complaint against the forest officer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.