मनाठ्यातील व्यापारी गाळे अद्यापही कुलूपबंद अवस्थेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2019 12:57 AM2019-02-22T00:57:00+5:302019-02-22T00:59:19+5:30

मनाठा ग्रामपंचायत हद्दीतील १० व्यापारी गाळ्यांना दुरुस्तीचे काम करण्याचे निमित्त करून व्यापाऱ्यांना बाहेर काढले़ गाळे अद्यापही न मिळाल्याने व्यापारी हतबल झाले आहेत.

The business colonies in the monastery are still locked | मनाठ्यातील व्यापारी गाळे अद्यापही कुलूपबंद अवस्थेत

मनाठ्यातील व्यापारी गाळे अद्यापही कुलूपबंद अवस्थेत

googlenewsNext
ठळक मुद्देनव्याने केलेल्या कामांचे क्युरिंगही नाहीग्रामपंचायतकडून गाळे ताब्यात देण्यात टाळाटाळ होत असल्याचा आरोप

हदगाव : मनाठा ग्रामपंचायत हद्दीतील १० व्यापारी गाळ्यांना दुरुस्तीचे काम करण्याचे निमित्त करून व्यापाऱ्यांना बाहेर काढले़ गाळे अद्यापही न मिळाल्याने व्यापारी हतबल झाले आहेत.
मनाठा येथे ग्रामपंचायतच्या सदस्यांना कामे वाटून देण्यात आली. कोणाला नाली बांधकाम, कोणाला पाण्याची टाकी बांधकाम तर काहींना अंगणवाडी तर काहींना सिमेंट रस्ता, तर सरपंच व एका सदस्याने घेतले व्यापारी गाळे दुरुस्तीचे काम. गाळे दुरुस्ती करून देतो म्हणून गाळ्यात बस्तान मांडलेल्या व्यापाºयांना बाहेर काढले़ काम पूर्ण होवून आठवडा उलटला, पण व्यापा-यांच्या ताब्यात देण्यास टाळाटाळ केली जात आहे़
याविषयी गंगाराम ठाकूर, विजय वाठोरे, किशनराव वाठोरे, सदानंद सोनाळे या व्यापाºयांनी सरपंच बाईची भेट घेतली व गाळे ताब्यात देण्याची विनंती केली़ परंतु त्यांना सन २०१६-१७-१८ या आर्थिक वर्षाचा किराया ५०० रुपये प्रतिमहा द्यावा, असे सांगण्यात आले़ पूर्वी २५० रुपये प्रतिमहा भाडे होते, तसा करारही असताना अचानक न सांगता भाडे वाढविण्याचे कारण काय? असा प्रश्न व्यापाºयांना पडला़ परंतु मागील थकबाकीतील निम्मी अनामत व एक वर्षाचा पूर्ण भाडे दिल्याशिवाय (थकबाकी) जमा केल्याशिवाय ग्रामपंचायत गाळ्याचे कुलूप काढणार नसल्याचे सरपंच दिशा नरवाडे यांनी व्यापा-यांना सांगितले़

  • व्यापारी गाळ्याचे छत गळत असल्यामुळे त्याची दुरुस्ती करण्यात आली़ व्यापारी गाळ्यातील आतील भागाचा गिलावा, फर्शी बदलण्यात आली़ परंतु या कामावर पाणी टाकणे गरजेचे असताना याकडे दुर्लक्ष केले जात आहे़
  • दुरुस्तीच्या कामाचे निमित्त करुन मनाठा ग्रामपंचायतने १० व्यापा-यांना गाळे रिकामे करण्यास भाग पाडले
  • नियोजित वेळ उलटूनही गाळे ताब्यात न मिळाल्याने व्यापारी झाले हतबल
  • पूर्वीचे गाळेभाडे प्रतिमाह २५० रुपये असताना ग्रामपंचायत ५०० रुपये प्रतिमाह भाडे मागत असल्याने व्यापारी सापडले अडचणीत
  • निम्मी अनामत व एक वर्षांचे पूर्ण भाडे दिल्याशिवाय गाळ्यांचे कुलूप न उघडण्याचा ग्रामपंचायतचा निर्णय

Web Title: The business colonies in the monastery are still locked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.