नांदेड जिल्ह्यातील अकरा गावांचा बहिष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2019 12:34 AM2019-04-19T00:34:27+5:302019-04-19T00:35:16+5:30

प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे विकास न झाल्याचा आरोप करून जिल्ह्यातील ११ गावांनी लोकसभा निवडणुकीतील मतदानावर बहिष्कार टाकला़ यात हदगाव तालुक्यातील सर्वाधिक सात गावांचा समावेश होता़

Boycott on voting of eleven villages in Nanded district | नांदेड जिल्ह्यातील अकरा गावांचा बहिष्कार

नांदेड जिल्ह्यातील अकरा गावांचा बहिष्कार

Next

नांदेड : प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे विकास न झाल्याचा आरोप करून जिल्ह्यातील ११ गावांनी लोकसभा निवडणुकीतील मतदानावर बहिष्कार टाकला़ यात हदगाव तालुक्यातील सर्वाधिक सात गावांचा समावेश होता़
देगलूर : तालुक्यातील पुंजरवाडी ग्रामस्थांनी रस्त्याच्या बांधणीसाठी व पिण्याच्या पाण्यासाठी नांदेड लोकसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकला. शहरापासून २३ किलोमीटर अंतरावर असलेल्या पुंजरवाडी गावात २६८ पुरुष तर २२९ महिला मतदार असे एकूण ४९७ मतदार आहेत. मागील अनेक वर्षांपासून लोणी ते पुंजरवाडी कच्चा रस्ता आहे. हा रस्ता डांबरीकरण करण्यात यावा अशी मागणी वारंवार निवेदने देऊन करण्यात आली एवढेच नव्हे तर ग्रामस्थांनी आमरण उपोषणाचा मार्ग ही अवलंबला होता. लहान मुले मुली शाळेत कसे जावावे, पक्का रस्ता नसल्यामुळे गावात अंबुलन्स सुद्धा येत नाहीत त्यामुळे आजारी व्यक्तीस दवाखान्यात बाजावर घालून नेण्याची वेळ सुद्धा आमच्यावर अनेक वेळा आल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. केवळ रस्ता नसल्यामुळे दुसऱ्या गावात जावून विवाह करण्याची वेळ आमच्यावर आली असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. रस्त्यासाठी आ. सुभाष साबणे यांनी पालकमंत्री रामदास कदम यांना भेटण्यासाठी म्हणून गावातील काही युवक नांदेड येथे गेले होते. केवळ निवेदन घेऊन सोपस्कार पूर्ण करण्यात आले. गावात पोहचण्यास युवकांना खूप रात्र झाली होती़
माध्यम प्रतिनिधींनी गाव गाठले परंतु मतदानाच्या दिवशी कुणालाही गावात येवू न देण्याची भूमिका गावकऱ्यांनी घेतली होती. ओळखपत्र दाखवल्यावरच माध्यम प्रतिनिधींना गावात येवून देण्यात आले.
मांजरमवाडीकरांचा बहिष्काराने संताप
नायगाव बाजार : उन्हाची तीव्रता वाढल्याने सकाळच्या वेळी मतदारांनी रांगा लावून मतदान केले असून नव मतदार मात्र उत्स्फूर्तपणे मतदानाला जाताना दिसून येत होते़ विविध मागण्यांसाठी मात्र मांजरमवाडीने मतदानावर बहिष्कार टाकला़
तालुक्यातील घुंगराळा, देगाव, टाकळगाव, हिप्परगा, सोमठाणा, पाटोदा आदी केंद्रांना भेटी दिल्या असता १२ वाजेपर्यंत मतदार रांगा लावून मतदान करीत होते़ यात नवमतदार, महिला, वृद्ध यांची संख्या अधिक होती़ राजगडनगर येथे मतदारांना थांबण्यासाठी म्हणून टेन्ट टाकण्यात आले होत़े़ राष्ट्रवादीचे पांडुरंग गायकवाड, भीमराव झगडे, सुरेश डाकोरे, काँग्रेसचे पालनवार, चोडे हे मतदारांना मतदान करण्याची विनंती करीत होते़ उन्हाची तीव्रता वाढल्याने दुपारच्या वेळी बहुतांश मतदान केंद्रावर शुकशुकाट होता़ सायंकाळी ४़४५ च्या सुमारास पिंपळगाव येथे सरासरी ६० टक्के मतदान झाले़ ५़१० वाजता खैरगाव येथे ७५ टक्के मतदान झाले़ यावेळी काही मतदान मतदानासाठी येताना दिसत होते़ कार्यकर्ते मतदारांना मतदान करण्याची विनंती करत होते़ भाजपाचे श्रावण भिलवंडे, बालाजी बच्चेवार, शिवराज होटाळकर, अवकाश धुप्पेकर आदी मंडळी देखील गावोगाव भेटी देत होते़
तालुक्यातील मांजरमवाडी येथील ग्रामस्थांनी आपल्या विविध मागण्यासाठी मतदानावर बहिष्कार टाकला़ तहसीलदारासह अनेकांनी गावकºयांची भेट घेवून मतदान करण्याची विनंती केली़ पण गावकरी आपल्या मतावर ठामच राहिले़ दरम्यान, मुखेड तालुक्यातील हासनाळ प.मु. ग्रामस्थांनीही मतदानावर बहिष्कार टाकला. प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित मागण्यासंदर्भात ग्रामस्थांनी हे पाऊल उचलले. प्रशासनाने संवाद साधला परंतु यश मिळाले नाही.
मतदारांच्या प्रतीक्षेत केंद्रातील अधिकारी-कर्मचारी
हदगाव : तालुक्यातील मनाठा मंडळातील तरोडा, विठ्ठलवाडी, चोरंबा बु़, चोरंबा खु़, कुसळवाडी व खरबी, केदारगुडा या सात गावातील ग्रामस्थांनी गाव तलावाच्या प्रलंबित मागणीसाठी आज मतदानावर बहिष्कार टाकला़
पळसवाडी तांडा शिवारातून मोठा नाला वाहतो़ हा नाला अडवून तलाव बांधावा ही मागणी या परिसरातील सात गावच्या ग्रामस्थांची आहे़ इसापूर धरणाचे पाणी मनाठा व तामसा मंडळामध्ये नाही़ आजूबाजूला कॅनॉल गेला़ परंतु ही दोन्ही मंडळे पाण्यापासून जाणीवपूर्वक वंचित ठेवण्यात आल्याचा आरोप येथील नागरिकांचा आहे़ या परिसरातील नाल्याचे पाणी अडविल्यास शेतकºयांना सिंचनासाठी मोठी मदत होते़ परंतु या मागणीकडे लोकप्रतिनिधी वारंवार निवेदन देवूनही लक्ष देत नाहीत़ त्यामुळे या गावातील पुढाºयांनी मतदानावरच बहिष्कार टाकला़ काँग्रेसचे माजी आ़ माधवराव पाटील व शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख बाबुराव कदम कोहळीकर यांनी ग्रामस्थांना समजून सांगितले़ परंतु ग्रामस्थांनी त्यांचे म्हणणे ऐकले नाही़
प्रशासनाचे तहसीलदार वंदना निकुंभ, मंडळ अधिकारी सी़पी़ कळणे यांनी या गावांना भेट देवून दीड-दोन तास त्यांच्याशी चर्चाही केली़ परंतु चोरंबा खु़ येथील नागरिक आपल्या भूमिकेवर तटस्थ होते़ तरोडा गावात ३६, खरबीत ३५, कुसळवाडीत ३२ असे मतदान झाले़
या मतदान केंद्रावर आलेले कर्मचारी दिवसभर मतदाराची प्रतीक्षा करत असल्याचे चित्र बघायला मिळाले़
याचवर्षी पहिल्यांदाच मतदान करणाºया अनेक नवमतदारांचा हिरमोड झाला़ गावतलाठी व्यंकटेश कुलकर्णी यांनी तुम्हाला पाच वर्षे मतदान करण्यात येणार नसल्याचे सांगून २३ पैकी १३ मतदान करून घेतले़ चोरंबा खु़ येथील तरुणांनी मशीनला उदबत्ती लावून पूजा केली़ परंतु मशीनचे सील काढण्यासाठीही केंद्रावर कोणी फिरकले नाही़

Web Title: Boycott on voting of eleven villages in Nanded district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.