किनवट पालिकेत भाजप झिरो ते हिरो; राष्ट्रवादीला मात देत मिळवली सत्ता

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2017 05:43 PM2017-12-14T17:43:25+5:302017-12-14T17:47:55+5:30

किनवट पालिकेच्या निवडणुकीत नगराध्यक्षासह नगरसेवक पदाच्या ९ जागा जिंकून भारतीय जनता पार्टीने स्पष्ट बहुमत मिळविले़ सत्ताधारी राष्ट्रवादीला मागच्या तुलनेत दोन जागा व सत्ताही गमवावी लागली़ शिवसेनेला भोपळाही फोडता आला नाही़ विसर्जित पालिकेत भाजपाचा एकही नगरसेवक नव्हता, हे विशेष.

BJP jhiro to hero; NCP out of power | किनवट पालिकेत भाजप झिरो ते हिरो; राष्ट्रवादीला मात देत मिळवली सत्ता

किनवट पालिकेत भाजप झिरो ते हिरो; राष्ट्रवादीला मात देत मिळवली सत्ता

googlenewsNext
ठळक मुद्देनगराध्यक्षासह नगरसेवक पदाच्या ९ जागा जिंकून भारतीय जनता पार्टीने स्पष्ट बहुमत मिळविले़ राष्ट्रवादीला मागच्या तुलनेत दोन जागा व सत्ताही गमवावी लागली़ शिवसेनेला भोपळाही फोडता आला नाही़

किनवट ( नांदेड ) : किनवट पालिकेच्या निवडणुकीत नगराध्यक्षासह नगरसेवक पदाच्या ९ जागा जिंकून भारतीय जनता पार्टीने स्पष्ट बहुमत मिळविले़ सत्ताधारी राष्ट्रवादीला मागच्या तुलनेत दोन जागा व सत्ताही गमवावी लागली़ शिवसेनेला भोपळाही फोडता आला नाही. विसर्जित पालिकेत भाजपाचा एकही नगरसेवक नव्हता, हे विशेष़

१३ डिसेंबर रोजी पालिकेसाठी मतदान झाले होते़ १४ डिसेंबर रोजी मतमोजणी झाली़ यात भाजपाने नगराध्यक्ष पदाची निवडणूक जिंकत ९ जागा पटकाविल्या़ राष्ट्रवादी काँग्रेसने ६, काँग्रेसने २ तर एका अपक्षाने बाजी मारली़ भाजपाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आनंद मच्छेवार यांनी काँग्रेसचे शेख चाँदसाब रतनजी यांचा पराभव केला़ मच्छेवार यांना ६ हजार ३५८ तर शेख चाँदसाब यांना ४ हजार ५४७ मते मिळाली़ राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर हबीबोद्दीन चव्हाण यांनी २ हजार ९८१, राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार प्रवीण राठोड यांना २ हजार ७४८, शिवसेनेचे सुनील पाटील यांना केवळ १ हजार ३०२ मते मिळाली. 

नगरसेवक पदासाठी विजयी प्रमुख उमेदवारात भाजपाचे व्यंकटराव नेम्मानीवार, श्रीनिवास नेम्मानीवार, अजय चाडावार, शिवाजी आंधळे, खान इम्रानखान इसा (काँग्रेस), अभय महाजन (काँग्रेस), कैैलास भगत (राष्ट्रवादी) यांचा समावेश आहे़ विद्यमान नगरसेवक शिवसेनेचे सुनील पाटील, सूरज सातुरवार, राष्ट्रवादीच्या प्रियंका राठोड, इंदुताई कनाके, काँग्रेसचे कृष्णा नेम्मानीवार यांना मतदारांनी नाकारले.

Web Title: BJP jhiro to hero; NCP out of power

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.