बिलोलीत पुढाऱ्यांकडून मतदारांची मनधरणी सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2019 12:32 AM2019-03-21T00:32:03+5:302019-03-21T00:33:00+5:30

२०१९ मध्ये होऊ घातलेल्या लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकांचे वारे बिलोली तालुक्यातही वाहू लागले आहे. प्रमुख पक्षांच्या नेत्यांकडून मते खेचण्यासाठी मोर्चेबांधणी करण्यात येत आहे.

Biloli leaders started voting for voters | बिलोलीत पुढाऱ्यांकडून मतदारांची मनधरणी सुरु

बिलोलीत पुढाऱ्यांकडून मतदारांची मनधरणी सुरु

Next
ठळक मुद्देलोकसभा रणधुमाळी सर्वपक्षीय कार्यकर्ते सक्रिय झाले प्रचारासाठी

शेख इलीयास।
बिलोली : २०१९ मध्ये होऊ घातलेल्या लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकांचे वारे बिलोली तालुक्यातही वाहू लागले आहे. प्रमुख पक्षांच्या नेत्यांकडून मते खेचण्यासाठी मोर्चेबांधणी करण्यात येत आहे. कोणत्या भागात कोणत्या समस्या आहेत, त्या शोधून त्यांची सोडवणूक, निराकरण करण्याची ग्वाही नेत्यांकडून दिली जात आहे. दरम्यान, प्रमुख पक्षांचे उमेदवार जाहीर झाल्यानंतरच खऱ्या अर्थाने प्रचारात रंगत येणार आहे.
आगामी काळात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुका जसजशा जवळ येऊ लागल्या तसतसे काँग्रेस, शिवसेना व वंचित बहुजन आघाडीचे नेतेमंडळी कार्यक्रमाचे औचित्य साधत स्वत: जनतेसमोर येण्याचा प्रयत्न करत आहेत. विधानसभेच्या दृष्टीने अनेक नेते मंडळींनी आतापासूनच कंबर कसली आहे. भाजपाला फसव्या योजनांचा परिणाम यंदा भोगावा लागणार आहे. बिलोली तालुक्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांना मानणारा मोठा वर्ग आहे.
त्याप्रमाणेच भाजपा प्रदेश उपाध्यक्ष भास्करराव पाटील खतगावकर यांचेही या तालुक्यात कार्यकर्त्यांचे चांगले नेटवर्क आहे. नायगाव-उमरी-धर्माबाद विधानसभा मतदारसंघावर डॉ.मीनल खतगावकर यांनी लक्ष केंद्रित केले आहे. त्या तुलनेत लोकसभेच्या अनुषंगाने अद्यापही भाजपाकडून जोर लावल्याचे दिसत नाही. त्या तुलनेत काँग्रेस लोकसभेसाठी कामाला लागल्याचे दिसते.
बिलोली तालुक्यातील पंचायत समिती, कुंडलवाडी नगरपरिषद, कृषी उत्पन्न बाजार समिती या भाजपाच्या ताब्यात आहेत. तर बिलोली नगरपालिकेवर काँग्रेसची सत्ता आहे. बिलोली तालुक्यात शिवसेनेची स्थिती फारशी मजबूत नसताना भाजपा प्रदेश उपाध्यक्ष भास्करराव पा.खतगावकर व जि. प. सदस्य लक्ष्मण ठक्करवाड यांच्या राजकीय तडजोडीतून शिवसेनेचे आ.सुभाष साबणे विजयी झाले़ मात्र, राज्यात तसेच केंद्रात सेना-भाजपाची सत्ता असतानाही तालुक्यात मोठी विकासकामे झाल्याचे दिसत नाही. याचा फायदा काँग्रेस कशी उचलते ते पहावे लागणार आहे. आगामी विधानसभेची लढत ही शिवसेनेचे आ.सुभाष साबणे व काँग्रेसचे माजी आमदार रावसाहेब अंतापूरकर यांच्यातच होण्याचे संकेत मिळत असल्याने हे दोन्ही नेते लोकसभेला आपल्याच पक्षाला मतदान मिळावे यासाठी आग्रही असतील. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत या दोघांचाही कस लागलेला दिसेल. एकूणच उमेदवारांची नावे जाहीर झाल्यानंतर तालुक्यात प्रचाराला वेग आलेला दिसेल. यासाठीची ही रणनीती आखली जात आहे.

Web Title: Biloli leaders started voting for voters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.