आयुष्याच्या नावेचे कॅप्टन व्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 12:13 AM2018-02-21T00:13:56+5:302018-02-21T00:15:31+5:30

अबोल असलेल्या समलिंगी संबंधाविषयी भाष्य करणाºया कॅप्टन... कॅप्टन या एका वेगळ्या विषयाच्या नाटकाने नाट्यस्पर्धेत रंगत भरली होती़ स्वत:च्या आयुष्याचे स्वत: कॅप्टन बना, या अथांग समुद्र्रात आपल्या आयुष्याच्या नावेचा कॅप्टन बनून आपणास निर्णय घेता आला पाहिजे, असा एक असा संदेश देणाºयाला नाटकाला रसिकांनी भरभरुन दाद दिली़

 Be the Captain of Life's Name | आयुष्याच्या नावेचे कॅप्टन व्हा

आयुष्याच्या नावेचे कॅप्टन व्हा

googlenewsNext
ठळक मुद्देराज्य हौशी नाट्यस्पर्धा : अबोल असलेल्या समलिंगी संबंधावर भाष्य

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : अबोल असलेल्या समलिंगी संबंधाविषयी भाष्य करणाºया कॅप्टन... कॅप्टन या एका वेगळ्या विषयाच्या नाटकाने नाट्यस्पर्धेत रंगत भरली होती़ स्वत:च्या आयुष्याचे स्वत: कॅप्टन बना, या अथांग समुद्र्रात आपल्या आयुष्याच्या नावेचा कॅप्टन बनून आपणास निर्णय घेता आला पाहिजे, असा एक असा संदेश देणाºयाला नाटकाला रसिकांनी भरभरुन दाद दिली़
महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत दर्जेदार नाटके सादर होत आहेत़ बसनी पंचक्रोशी ग्रंथालय,रत्नागिरीच्या वतीने सोमनाथ सोनवलकर लिखित, मनोहर सुर्वे दिग्दर्शित ‘कॅप्टन... कॅप्टन’ हे नाटक सादर करण्यात आले़
आयुष्य जगण्यासंदर्भात अत्यंत साधे स्वप्न घेऊन जगणारी सानिया (मृणाली डांगे) तिचे लग्न नेव्हीत कॅप्टन असलेल्या विक्रांतशी (निशांत जाधव) होते; पण विक्रांत हा समलिंगी आहे़ हे सानियाला लग्नानंतर कळते आणि विक्रांतलाही त्याची जाणीव होते की, सानियाशी लग्न करून तिला सुख देऊ शकणार नाही; पण तो लग्न करतो ते वडिलांच्या आग्रहास्तव़
या सर्व गोष्टी तो सांगण्याचा प्रयत्न करतो; पण वडिलांचा दबाव आणि समाजाची मानसिकता यामुळे तो स्वत:च्या आणि सानियाच्या आयुष्याशी खेळतो. तो स्वत:च्या आयुष्याच्या नावेचा कॅप्टन बनू शकत नाही. विक्रांतचे कॅप्टनशी (ओंकार पाटील) असलेले समलिंगी संबंध, सानियाशी वागताना त्याची होणारी घुसमट, सानियाला आपला नवरा समलिंगी आहे, हे कळाल्यावर तिच्या मनात निर्माण झालेला भावनांचा कल्लोऴ कॅप्टनची एका बाजूला जहाजाचा कॅप्टन म्हणून असलेली कणखरता आणि दुसºया बाजूला समलिंगी संबंध जपण्याची आक्रमकता या नाटकातून दाखविण्यात आली आहे़
नाटकात कौस्तुभ केळकर, संतोष गार्डी, अमोल जामसुदकर, अजित पाटील, संजय रांगंकर, जयेश शिवलकर, मिथुन पवार, सागर मायंगडे, शुभम शिवलकर, अक्षय शिवगण, प्रथमेश काटकर, साई प्रसादे, स्वानंद मयेकर, समीर बंडबे यांनी भूमिका साकारली.
नाटकाची जमेची बाजू म्हणजे प्रवीण धूमक यांनी साकारलेले नेपथ्य वास्तववादी स्वरूपाचे होते़ दोन मजली इमारत आणि जहाज यांचा डोलारा काही सेकंदात बदलत होता. पार्श्वसंगीत- नंदलाल रेळे तर प्रकाशयोजना- संजय तोडणकर, रंगभूषा- प्रदीप पेडणेकर, वेशभूषा- चेताली पाटील, रंगमंच व्यवस्था- ज्योती मुळे, योगेश मांडवकर, तेजस्विनी शेट्टे यांनी सांभाळली.

Web Title:  Be the Captain of Life's Name

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.