समाजातील सर्व घटक भाजपाच्या काळात त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 12:32 AM2018-04-20T00:32:49+5:302018-04-20T00:32:49+5:30

नोटाबंदी, जीएसटी, महागाई, स्त्रीयांवरील वाढते अत्याचार या सर्वांमुळे समाजातील सर्व घटक त्रस्त असून देशात वैचारिक विष पेरण्याचे काम भाजप करीत आहे़ त्यामुळे ‘अच्छे दिन’चे स्वप्न पाहणाऱ्या जनतेला भाजपवालोंसे देश अन् बेटी बचाओं, असे म्हणण्याची वेळ आली, असे प्रतिपादन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष तथा माजी मुख्यमंत्री खा़अशोकराव चव्हाण यांनी केले़

All the elements of the society suffer during the BJP's time | समाजातील सर्व घटक भाजपाच्या काळात त्रस्त

समाजातील सर्व घटक भाजपाच्या काळात त्रस्त

Next
ठळक मुद्देकाँग्रेसच्या जाहीर सभेत अशोकराव चव्हाण यांची जबर टिका

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : नोटाबंदी, जीएसटी, महागाई, स्त्रीयांवरील वाढते अत्याचार या सर्वांमुळे समाजातील सर्व घटक त्रस्त असून देशात वैचारिक विष पेरण्याचे काम भाजप करीत आहे़ त्यामुळे ‘अच्छे दिन’चे स्वप्न पाहणाऱ्या जनतेला भाजपवालोंसे देश अन् बेटी बचाओं, असे म्हणण्याची वेळ आली, असे प्रतिपादन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष तथा माजी मुख्यमंत्री खा़अशोकराव चव्हाण यांनी केले़
नांदेड शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने जुना मोंढा येथे आयोजित जाहीर सभेत खा. चव्हाण बोलत होते. खा. चव्हाण पुढे म्हणाले की, उत्तरप्रदेशातील मेरठ व जम्मू-कश्मीरमधील अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्काराची घटना निषेधार्ह आहे. भाजपच्या काळात मुली व महिला असुरक्षीत असून अत्याचाराच्या घटना ३८ टक्क्यांनी वाढल्या. यावर शासनाचे नियंत्रण नाही. उलट यात भाजप आमदार, पदाधिकारी आरोपी असून त्यांना अटक करण्यास १० ते १५ दिवसांचा वेळ लागतो. एकप्रकारे बलात्काºयांना पाठीशी घालण्याचे काम सरकार करीत असल्याची टिका खा़चव्हाण यांनी केली़ आरएसएसच्या मनावर चालणारे सरकार असून त्यांच्या हालचाली संशयास्पद दिसत आहे़ संविधान बदलण्याचे प्रयत्न सुरू आहेत़ परंतु, काँग्रेस ते कधीही होवू देणार नाही़ सध्या अनेक राज्यातील एटीएममध्ये ठणठणाट असून सर्व नोटा कर्नाटकातील निवडणुकीसाठी भाजपने नेल्याचा आरोप केला़ तसेच नोटा नेल्या नसतील तर त्या कुठे गेल्या याचे उत्तर सरकारने द्यावे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला़
सभेत बोलताना राजस्थान काँग्रेसचे अध्यक्ष सचिन पायलट म्हणाले की, देशात ३० वर्षांनंतर संपूर्ण बहुमत भाजपाला मिळाले. मात्र सरकारने जनतेचा भ्रमनिराश केला. नोटबंदी, जीएसटी आदी निर्णयामुळे सामान्य जनता कोंडीत सापडली. आता निवडणुकीच्या तोंडावर जातीय तेढ निर्माण करण्याचे काम सरकार करीत आहे. यावेळी कॉग्रेसचे राज्य प्रभारी मोहन प्रकाश म्हणाले की, इंदिरा गांधी यांनी त्यांच्या काळात बँकाचे मजबुतीकरण केले. त्यानंतर मनमोहनसिंघ यांनी जगातील बँका दिवाळखोरीत निघाल्या असताना भारतीय अर्थव्यवस्था सक्षम ठेवली, आता मात्र बँकांचा आर्थिक कणा मोडला आहे. आमचाच पैसा आम्हाला मिळत नाही, ज्यांना चौकीदार बनवले तेच आता सोनेवाले सोते रहो, चोरी करनेवाले भागते रहो, असे म्हणत आहेत, असे मोहनप्रकाश म्हणाले. यावेळी माणिकराव ठाकरे, नसीमखान यांचीही भाषणे झाली.

Web Title: All the elements of the society suffer during the BJP's time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.