नांदेडात प्लास्टिक बंदीविरोधात धडक कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2018 12:55 AM2018-06-28T00:55:36+5:302018-06-28T00:55:56+5:30

शहरात प्लास्टिकबंदी निर्णयाची अंमलबजावणी सुरु असून मंगळवारी ४ टन प्लास्टिक जप्त केल्यानंतर बुधवारीही महापालिकेच्या पथकाने जुना मोंढ्यातच आणखी दीड टन प्लास्टिक जप्त केले आहे.

Action taken against Nanded plastic ban | नांदेडात प्लास्टिक बंदीविरोधात धडक कारवाई

नांदेडात प्लास्टिक बंदीविरोधात धडक कारवाई

Next
ठळक मुद्देदोघांविरुद्ध गुन्हे दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : शहरात प्लास्टिकबंदी निर्णयाची अंमलबजावणी सुरु असून मंगळवारी ४ टन प्लास्टिक जप्त केल्यानंतर बुधवारीही महापालिकेच्या पथकाने जुना मोंढ्यातच आणखी दीड टन प्लास्टिक जप्त केले आहे.
२३ जूनपासून राज्यभरात प्लास्टिकबंदी निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आली आहे. त्यानुषंगाने २३ जूनपासून महापालिकेच्या वतीने प्लास्टिक जप्ती मोहीम राबविण्यात येत आहे. प्लास्टिक वापरणाऱ्यांना व्यापा-याकडून दंड वसूल केला जात आहे. मंगळवारी जुना मोंढ्यातून महाराजणा रणजितसिंह मार्केटमध्ये धाड टाकत ४ टन प्लास्टिक अग्रवाल बॅग्स या दुकानातून जप्त करण्यात आल्या. सदर व्यापा-याला २५ हजारांचा दंड ठोठावला. महापालिकेने बुधवारी केलेल्या कारवाईत जुना मोंढा येथील जैन ट्रेडर्स आणि इतर तीन दुकानदारांकडून दीड टन प्लास्टिकचा साठा जप्त करण्यात आला आहे.
आयुक्त लहुराज माळी यांच्यासह सहायक आयुक्त गुलाम सादेक, डॉ. मिर्झा बेग, सहायक आयुक्त शिवाजी डहाळे, गोविंद थेटे, गंगमवार, अतिक अन्सारी, गणेश शिंगे, वसीम तडवी यांनी ही कारवाई केली. जैन ट्रेडर्स, गंगासहाय्य अँड कंपनी, दीप किराणा, मातोश्री किराणा या दुकानदारांना प्रत्येकी ५ हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे. दरम्यान, महापालिकेच्या प्लास्टिकबंदी मोहिमेत अडथळा आणणाºया एका इसमाविरुद्ध भाग्यनगर पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीरबुºहाणनगर येथील शेख अफजलोद्दीन शेख अजिमोद्दीन आणि सईद खान या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ महापालिकेचे पथक कारवाईसाठी गेले असता तेथे त्यांनी प्लास्टिकबंदी पथक प्रमुख तथा सहायक आयुक्त सुधीर इंगोले यांना अपशब्द वापरले. या प्रकाराची व्हिडीओ क्लीप करुन ती सोशल मीडियावर व्हायरल केली. या क्लीपची तपासणी करुन महापालिकेने पथकप्रमुख इंगोले यांच्या तक्रारीवरुन भाग्यनगर ठाण्यात शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
---
दोन क्षेत्रीय कार्यालयांखालीच प्लास्टिकचे गोदाम
महापालिकेच्या वजिराबाद आणि इतवारा क्षेत्रीय कार्यालय जुना मोंढा येथील महाराजा रणजितसिंह मार्केट येथे कार्यरत आहेत. पहिल्या माळ्यावर हे दोन्हीही कार्यालय आहेत. त्याच कार्यालयाखाली अग्रवाल बॅग्स हे प्लास्टिकचे गोदाम होते. त्या गोदामावर मंगळवारी खुद्द आयुक्तांनी कारवाई केली. बुधवारीही जुन्या मोंढ्यातच जैन ट्रेडर्स व अन्य दुकानांतून दीड टन प्लास्टिक जप्त करण्यात आले आहे. त्यामुळे मनपाच्या दोन क्षेत्रीय कार्यालय परिसरातच प्लास्टिकचे गोदाम सापडले आहेत. पहिल्या तीन दिवसांत ही गोदामे मनपाच्या क्षेत्रीय अधिकाºयांना दिसले नाही काय ? हा विषय पुढे आला आहे. विशेष म्हणजे, या गोदामातून लाखो रुपयांचे प्लास्टिक जप्त करण्यात आले आहेत.

Web Title: Action taken against Nanded plastic ban

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.