मानव विकासचे ८२८ आरोग्य शिबिरे होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2019 12:16 AM2019-05-13T00:16:46+5:302019-05-13T00:17:29+5:30

मानव विकासच्या वतीने गर्भवती महिला व स्तनदा मातांची तज्ज्ञ महिला डॉक्टरकडून आरोग्य तपासणी करण्यासाठी २०१९- २० या वर्षात ८२८ आरोग्य शिबिरांचे आयोजन केले आहे़ गतवर्षी ८२० आरोग्य शिबिरे घेतले होते़ यावर्षीचे एप्रिलपासून शिबीरे होत आहेत.

828 health camps of human development will take place | मानव विकासचे ८२८ आरोग्य शिबिरे होणार

मानव विकासचे ८२८ आरोग्य शिबिरे होणार

Next
ठळक मुद्देवर्षभर उपक्रम : गरोदर व स्तनदा मातांच्या आरोग्याची तपासणी

नांदेड : मानव विकासच्या वतीने गर्भवती महिला व स्तनदा मातांची तज्ज्ञ महिला डॉक्टरकडून आरोग्य तपासणी करण्यासाठी २०१९- २० या वर्षात ८२८ आरोग्य शिबिरांचे आयोजन केले आहे़ गतवर्षी ८२० आरोग्य शिबिरे घेतले होते़ यावर्षीचे एप्रिलपासून शिबीरे होत आहेत.
ग्रामीण व नागरी भागातील गरोदर व स्तनदा माता व बालके आरोग्य सेवेपासून वंचित राहू नये, यासाठी आरोग्य विभाग व जिल्हा प्रशासनाने काळजी घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांनी दिले आहेत़यावर्षी एप्रिल महिन्यापासून शिबिरांचे आयोजन केले आहे़ लोहा तालुक्यातील माळाकोळी येथे प्रा.आ. केंद्र येथे दरमहा दुसरा व तिसरा बुधवार, सोनखेड येथे तिसरा व चौथा मंगळवार, पेनूर येथे तिसरा सोमवार व तिसरा मंगळवार, कलंबर येथे पहिला व तिसरा मंगळवार कापशी येथे पहिला व दुसरा शुक्रवार, देगलूर प्रा.आ. केंद्र येथे दरमहा शहापूर येथे पहिला व तिसरा शुक्रवार, हणेगाव येथे पहिला व तिसरा मंगळवार मरखेल येथे दुसरा व चौथा मंगळवार, बिलोली प्रा.आ. केंद्र येथे दरमहा शंकरनगर येथे तिसरा व चौथा शुक्रवार, लोहगाव येथे पाहिला व चौथा मंगळवार, सगरोळी येथे पहिला व दुसरा मंगळवार, कुंडलवाडी येथे पहिला व तिसरा सोमवार, खतगाव येथे पहिला व तिसरा बुधवार. धर्माबाद प्रा.आ. केंद्र येथे दरमहा करखेली येथे चौथा सोमवार चौथा मंगळवार, उमरी तालुक्यात प्रा.आ. केंद्र येथे दरमहा सिंधी पहिला व तिसऱ्या शुक्रवारी शिबीर होणार आहे.
६८ हजार ३८७ आरोग्य तपासण्या केल्या
२०१९- २० या वर्षासाठी वेळापत्रकाप्रमाणे मानव विकास आरोग्य शिबिरे घेण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत़ मागील वर्षी आरोग्य शिबिरांसाठी १ कोटी ४८ लक्ष निधी उपलब्ध करून देण्यात आला होता़ त्यापैकी १ कोटी ४१ लाख रूपयांचा निधी खर्च करण्यात आला़ या वर्षात ३९ हजार ६७४ गरोदर माता, १४ हजार ४०४ स्तनदा माता व १४ हजार ३०९ बालके असे एकूण ६८ हजार ३८७ आरोग्य तपासण्या करण्यात आल्या़

Web Title: 828 health camps of human development will take place

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.