५१ शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2018 12:39 AM2018-12-15T00:39:05+5:302018-12-15T00:41:22+5:30

आॅनलाईन बदली प्रक्रियेवेळी खोटी माहिती व खोटे दस्तऐवज दाखल करुन अनियमितता केल्या- प्रकरणी जिल्ह्यातील ५१ शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे़ या नोटिसीत आपली एक वार्षिक वेतनवाढ कायमस्वरुपी का बंद करु नये ? तसेच आपली इतरत्र बदली का करु नये ? अशी विचारणा करण्यात आली

51 teachers show cause notice | ५१ शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस

५१ शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस

Next
ठळक मुद्देआॅनलाईन बदलीसाठी खोटी माहिती दिलीवार्षिक वेतनवाढ कायमस्वरुपी बंद करण्याचा इशारा

नांदेड : आॅनलाईन बदली प्रक्रियेवेळी खोटी माहिती व खोटे दस्तऐवज दाखल करुन अनियमितता केल्या- प्रकरणी जिल्ह्यातील ५१ शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे़ या नोटिसीत आपली एक वार्षिक वेतनवाढ कायमस्वरुपी का बंद करु नये ? तसेच आपली इतरत्र बदली का करु नये ? अशी विचारणा करण्यात आली असून या शिक्षकांना याप्रकरणी तीन दिवसांत खुलासा सादर करायचा आहे़
नांदेड जिल्हा परिषदेच्या वतीने यंदा प्रथमच शिक्षकांच्या बदल्या आॅनलाईन पद्धतीने करण्यात आल्या़ या बदली प्रक्रियेदरम्यान काही शिक्षकांनी खोटी माहिती तसेच बनावट दस्तऐवज तयार करुन बदलीमध्ये लाभ उठविल्याचा आरोप होत होता़ या अनुषंगाने बदली प्रक्रियेचा फटका बसलेल्या इतर शिक्षकांनीही जिल्हा परिषदेसमोर आंदोलन केल्यानंतर बदली झालेल्या शिक्षकांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यासाठी जिल्हा परिषदेने तीन सदस्यीय समितीची स्थापना केली होती़ या समितीने दोन दिवसांत आक्षेप असलेल्या शिक्षकांसह तक्रारदारालाही पाचारण करुन सदर प्रकरणी चौकशी केली़ मात्र त्यानंतरही संबंधित शिक्षकांविरुद्ध काहीच कारवाई न झाल्याने दोषी शिक्षकांविरुद्ध तातडीने कारवाई करण्याची मागणी मागील काही दिवसांपासून जोर धरत होती़
या पार्श्वभूमीवर प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी १२ डिसेंबर रोजी आॅनलाईन पद्धतीने बदली झालेल्या ५१ शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे़ या नोटिसीमध्ये म्हटले आहे की, बदली प्रक्रियेवेळी शिक्षकांनी आवेदनपत्रात खरी माहिती भरुन स्वंयघोषित प्रमाणित करणे क्रमप्राप्त होते़ मात्र संगणकीय प्रणालीद्वारे झालेल्या बदल्यामध्ये खोटी माहिती भरुन बदल्या करुन घेतल्याचे निदर्शनास आले आहे़ या अनुषंगाने तसेच अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील चौकशी समितीच्या अहवालाद्वारे आपणास कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे़ नोटीस बजावण्यापूर्वी आपणास सुनावणीसाठी प्रत्यक्ष बोलावून कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली आहे़ मात्र चौकशी समितीच्या अहवालात आपण बदली प्रक्रियेदरम्यान खोटी माहिती व खोट्या कागदपत्रांद्वारे बदली करुन घेतल्याचे निष्पन्न झाले आहे़ त्यामुळे यासंबंधीच्या परिपत्रकातील तरतुदीनुसार आपली एक वार्षिक वेतनवाढ कायमस्वरुपी बंद करुन आपली इतरत्र बदली का करु नये ? याबाबतचा खुलासा तीन दिवसांत सादर करावा अन्यथा नमूद शास्ती कायम करण्यात येईल, असा इशाराही शिक्षणाधिका-यांनी नोटिसीमध्ये दिला आहे़
नोटीस बजावलेल्या शिक्षकांमध्ये सुलभा रत्नपारखी (जि़प़शाळा रहाटी ता़नांदेड), शिवदर्शन लांडगे (जि़प़शाळा नवीन वसाहत बारड ता़मुदखेड), सतीश जानकर (जि़प़शाळा शंकतीर्थ, ता़मुदखेड), सुरेखा कमळू (जि़प़शाळा बेलानगर, ता़नांदेड), सुनीता भुरे (जि़प़शाळा बाभूळगाव ता़नांदेड), वैजनाथ मिसे (लख्खा ता़देगलूर) साईनाथ इडलवार (अंतापूर, ता़देगलूर) फातिमा शेख (तडखेल, ता़देगलूर), गोविंद नल्लावाड (बोंडार, ता़नांदेड), शोभा गंदलवाड (झरी, ता़लोहा), धनराज कानवटे (ब्रंच, ता़मुखेड), शोभा मुंडे (ब्रंच, ता़ मुखेड), गजानन देशमुख (मरळख खु़, ता़नांदेड), अमोल पोलशेटवार (सिद्धनाथ/वाजेगाव ता़नांदेड), रमेश अंनतवार (मडकी, ता़लोहा), सागर जिलकरवार (तलबीड, ता़नायगाव), अर्चना नागठाणे (कृष्णूर ता़नायगाव), सुनीता राठोड (कन्या शाळा नायगाव), प्रमोद जोगदंड (खैरगाव, ता़नायगाव), गीताबाई शिनगिरे (कुंटूर, ता़नायगाव), अनुजा उपलंचवार (शेळगाव छत्री, ता़नायगाव), मनीषा नरसीकर (किन्हाळा, ता़बिलोली), माधव मोरे (होंडाळा, ता़मुखेड), गुरुनाळ हराळे (मेंढला, ता़अर्धापूर), संदीप पाटील (बरडशेवाळा कॅम्प, ता़हदगाव), अपर्णा चाटे (पिंपरणवाडी, ता़ लोहा), राजनंदा मुरडे (वडेपुरी, ता़लोहा), अनुराधा भुरे (वडेपुरी,ता़लोहा), स्मिता कुहाडे (वडेपुरी, ता़लोहा), मोहन कांबळे (रमतापूर, ता़देगलूर), बसवंत कोळनूरकर (प्रा़शा़मुखेड), प्रकाश पवार (प्रा़शा़मुखेड), नीळकंठ भोसले (थुगाव, ता़नांदेड), दीपाली सोनपूरकर (वाडी पुयड, ता़नांदेड), शीला निजवंते (रावणकोळा, ता़मुखेड), अ़अय्युब अग़णी (नई आबादी, ता़अर्धापूर), नसरीन बेगम शेख अजीम (वाजेगाव, ता़नांदेड), नुजहद सुल्ताना अ़हई (गनीमपुरा, ता़नांदेड), अनिता रणभीरकर (कामठा, ता़अर्धापूर), काशीबाई उदगिरे (कामठा, ता़अर्धापूर), विनायक बारहाते (कामठा, ता़अर्धापूर), विद्या चंदापुरे (वसंतनगर, नांदेड), कामाजी डांगे (यमशेटवाडी, ता़अर्धापूर), संगीता कारले (पिंपळगाव, ता़अर्धापूर), अनुप नाईक (कडीमगंज, ता़नांदेड), उषा वरड (हरबळ, ता़लोहा), अंबादास कदम (असर्जन, ता़नांदेड), प्रेमला जाधव (जुन्नी, ता़धर्माबाद), अर्चना चौधरी (नाळेश्वर, ता़नांदेड), रमेश मरखेलकर (ब्राम्हणवाडा, ता़नांदेड) आणि यमुनाबाई बाळासाहेब शिंदे (मंढई सांगवी बु़, ता़ नांदेड) या ५१ शिक्षकांचा समावेश आहे़
शैक्षणिक वर्तुळात खळबळ : शिक्षकांचे धाबे दणाणले
जिल्हा परिषदेच्या वतीने राबविण्यात आलेली आॅनलाईन बदलीप्रक्रिया सातत्याने वादात राहिली़ बदली प्रक्रियेदरम्यान बनावट कागदपत्रांचा मुद्दा पुढे आल्यानंतर ज्या शिक्षकांवर या प्रक्रियेदरम्यान अन्याय झाला त्यांनी आंदोलन केले़ दुसरीकडे समिती स्थापन करुन या सर्व शिक्षकांची चौकशी सुरु होती़ आता जिल्ह्यातील ५१ दोषी शिक्षकांना नोटिसा बजावण्यात आल्याने या शिक्षकांचे धाबे दणाणले आहेत़ या शिक्षकांची बदली रद्द होऊ शकते याबरोबरच एका वार्षिक वेतनवाढीलाही त्यांना मुकावे लागेल़

Web Title: 51 teachers show cause notice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.