बालकांच्या तपासणीसाठी मुंबईच्या ३८ तज्ज्ञांची टीम नांदेडात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2019 12:50 AM2019-03-29T00:50:22+5:302019-03-29T00:52:19+5:30

मुंबई येथील जय वकील फांउडेशन अँड रिसर्च सेंटर, बी़ जे. वाडिया चिल्ड्रेन्स हॉस्पिटल व येथील राजस्थानी एज्युकेशन सोसायटीतर्फे आर. आर. मालपाणी मतिमंद विद्यालयात आयोजित शिबीरास गुरूवारी प्रारंभ झाला़ या शिबीरात मेंदुचे विकार असणाऱ्या मुला-मुलींच्या तपासणी होणार असून

38 teams of Mumbai team of experts for Nandedat | बालकांच्या तपासणीसाठी मुंबईच्या ३८ तज्ज्ञांची टीम नांदेडात

बालकांच्या तपासणीसाठी मुंबईच्या ३८ तज्ज्ञांची टीम नांदेडात

Next

नांदेड : मुंबई येथील जय वकील फांउडेशन अँड रिसर्च सेंटर, बी़ जे. वाडिया चिल्ड्रेन्स हॉस्पिटल व येथील राजस्थानी एज्युकेशन सोसायटीतर्फे आर. आर. मालपाणी मतिमंद विद्यालयात आयोजित शिबीरास गुरूवारी प्रारंभ झाला़ या शिबीरात मेंदुचे विकार असणाऱ्या मुला-मुलींच्या तपासणी होणार असून त्यासाठी मुंबईतील ३८ तज्ज्ञांची टीम नांदेडात दाखल झाली आहे़
तीन दिवस चालणाऱ्या आरोग्य शिबिरात तपासणी व उपचारासाठी मराठवाडा, विदर्भ, आंध्रप्रदेश, कर्नाटक आदी राज्यातून रुग्णालयात रुग्ण व त्यांच्या समवेत आलेल्या नातेवाईकांची गैरसोयहोऊ नये यासाठी राजस्थानी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष ओमप्रकाश गिल्डा, उपाध्यक्ष रामनारायण काबरा, सचिव प्रकाश मालपाणी, बनारसीदास अग्रवाल, रामलाल बाहेती, जयप्रकाश काबरा, डॉ. लक्ष्मीकांत बजाज आदी पदाधिकारी शिबीर स्थळी पूर्णवेळ उपस्थित होते़
आरोग्य शिबिरातील रूग्णांवर बाल मस्तिष्करोग तज्ञ डॉ. अनैता हेगडे, डॉ. विशाल पटेल, डॉ. निशांत राठोड, डॉ. इरावती पुरंदरे, डॉ. पूजा, डॉ. वृषभ गवळी, डॉ. झभीया खान, फिजिओ थेरपिस्ट आशा चिटणीस, भक्ती श्रॉफ उर्मिला कामत, वंदना, डॉ.तृप्ती निखारगे, सायली परब, वाचा उपचार तज्ज्ञ मोहिनी शाह यांच्यासह ३८ तज्ञ डॉक्टरांची टीम आरोग्य शिबिरात रुग्णांची तपासणी व उपचार करीत आहेत.
आरोग्य शिबीराचे हे नववे वर्ष असून आता पर्यंत झालेल्या १६ आरोग्य शिबीरात ४ हजार ३२९ रूग्णांनी लाभ घेतला आहे. तसेच अनेक अस्थिव्यंग व नेत्र रूग्णांवर मुंबई येथील तज्ञ डॉक्टरांनी शस्त्रक्रिया केली आहे. आरोग्य शिबिरात तपासणी केलेल्या रुग्णांना सहा महिन्यांची म्हणजेच आगामी आरोग्य शिबिरापर्यंतची मोफत औषधी देण्यात येते तसेच आवश्यकतेनुसार रुग्णांना दररोज शाळेतील राजस्थानी एज्युकेशन सोसायटीच्या डॉ. एम. जी. बजाज रिहॅब्लीटेशन सेंटर येथे फिजीओ थेरपीची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.
आरोग्य शिबीर यशस्वीतेसाठी संस्था पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात मूख्याध्यापक नितीन निर्मल, मुख्याध्यापक मुरलीधर पाटील, वसतिगृह अधीक्षक संजय शिंदे, आर. आर. मालपाणी मतिमंद विद्यालय व श्री रामप्रतापमालपाणी मूकबधिर विद्यालयाचे कर्मचारी परिश्रम घेत आहेत.

Web Title: 38 teams of Mumbai team of experts for Nandedat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.