बिलोली येथे अवैध वाळू वाहतूक करणा-या 31 ट्रकवर कारवाई, 93 जणांवर गुन्हे दाखल करून 5 कोटींचा मुद्देमाल जप्त 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2017 12:57 PM2017-09-21T12:57:34+5:302017-09-21T12:59:03+5:30

मांजरा नदी पात्रातून अवैध वाळू वाहतूक करणा-या 31 ट्रकवर नांदेड पोलीस विभागाच्या विशेष पथकाने पहाटे कारवाई केली.  बिलोली येथील सीमावर्ती भागात झालेल्या या कारवाईत ९३ ट्रक चालक-मालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

31 trucks carrying illegal sand transport in Biloli, 9 suicides and 5 crores of money seized | बिलोली येथे अवैध वाळू वाहतूक करणा-या 31 ट्रकवर कारवाई, 93 जणांवर गुन्हे दाखल करून 5 कोटींचा मुद्देमाल जप्त 

बिलोली येथे अवैध वाळू वाहतूक करणा-या 31 ट्रकवर कारवाई, 93 जणांवर गुन्हे दाखल करून 5 कोटींचा मुद्देमाल जप्त 

googlenewsNext

बिलोली (नांदेड ) :  मांजरा नदी पात्रातून अवैध वाळू वाहतूक करणा-या 31 ट्रकवर नांदेड पोलीस विभागाच्या विशेष पथकाने पहाटे कारवाई केली.  बिलोली येथील सीमावर्ती भागात झालेल्या या कारवाईत ९३ ट्रक चालक-मालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

राज्याच्या सीमावर्ती भाग असलेल्या बिलोलीत मांजरा नदीपात्रातून काही दिवसांपासून नियमित अवैध वाळू वाहतूक होते. आज पहाटे 4 च्या दरम्यान यावर नांदेड येथील विशेष पोलीस पथकाने नदी पात्रात धडक कारवाई करत 31 ट्रक ताब्यात घेतले. यावेळी पोलिसांनी 93  ट्रक चालक - मालकांविरोधात वाळू चोरीचा गुन्ह दाखल केला आहे. तसेच यातून वाळू व ट्रक असा मिळून 5 कोटीचा मुद्देमाल जप्त केला. पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या  विशेष पथकाने ही कारवाई करण्यात आली. यात दंगल नियंत्रण पथकाचाही सहभाग होता.  

Web Title: 31 trucks carrying illegal sand transport in Biloli, 9 suicides and 5 crores of money seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.