जलसाठा@२५ टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2019 12:39 AM2019-02-11T00:39:04+5:302019-02-11T00:39:47+5:30

जिल्ह्यात असलेल्या १०६ प्रकल्पांत आजघडीला केवळ २५.५४ टक्के जलसाठा उरला असून अनेक गावांत आता पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती सुरू झाली आहे. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आता प्रशासनाची धावपळ सुरू झाली आहे.

25% of water storage in nanded | जलसाठा@२५ टक्के

जलसाठा@२५ टक्के

Next
ठळक मुद्देप्रकल्पांची स्थिती : पाणीटंचाईच्या झळा

नांदेड : जिल्ह्यात असलेल्या १०६ प्रकल्पांत आजघडीला केवळ २५.५४ टक्के जलसाठा उरला असून अनेक गावांत आता पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती सुरू झाली आहे. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आता प्रशासनाची धावपळ सुरू झाली आहे.
जिल्ह्यात असलेल्या १०६ प्रकल्पांत १७३ दलघमी उपयुक्त जलसाठा आहे. त्यामध्ये जिल्ह्यात असलेल्या २ मोठ्या प्रकल्पांपैकी मानार प्रकल्पात ३८.४५ म्हणजेच २७.८२ टक्के आणि विष्णूपुरी प्रकल्पात ३६.०९ म्हणजे ४४.६७ टक्के जलसाठा शिल्लक आहे. मध्यम प्रकल्पांचीही स्थिती बिकटच असून नऊ प्रकल्पांत २६.०६ दलघमी इतका जलसाठा आहे. ही टक्केवारी १८.७४ इतकी आहे. जिल्ह्यात ३ उच्चपातळी बंधारे आहेत. या बंधाऱ्यांची पूर्ण जलक्षमता २१७.१२ दलघमी इतकी असताना आजघडीला केवळ २७.३९ दलघमी जलसाठा आहे. ८८ लघुप्रकल्पांतही २३.३२ टक्के म्हणजे ४५.०७ दलघमी इतका जलसाठा आहे. जिल्ह्यात कोल्हापुरी बंधारे चार असले तरीही या बंधाºयांत एक थेंबही पाणी अडविण्यात प्रशासनाला यश आलेले नाही.
नांदेड पाटबंधारे मंडळांतर्गत १४६ प्रकल्प आहेत. त्यामध्ये हिंगोली जिल्ह्यातील ३० प्रकल्प २७.७४ दलघमी म्हणजेच २.९३ टक्के साठा आहे. येलदरी प्रकल्प कोरडाठाक पडला असून सिद्धेश्वर प्रकल्पात २१.९१ टक्के जलसाठा आहे. परभणी जिल्ह्यातील ९ प्रकल्पांत केवळ ११.०६ दलघमी म्हणजेच, १०.४६ टक्के जलसाठा शिल्लक आहे. यवतमाळ जिल्ह्यातील इसापूर प्रकल्पातून जिल्ह्यातील निम्म्या तालुक्यांना पाणी उपलब्ध होते. या प्रकल्पात ३८.१२ टक्के म्हणजेच ३६७.५६ दलघमी पाणी उपलब्ध आहे. या प्रकल्पातून जिल्ह्याला सध्या पाणीपाळी सुरू आहेत.
नांदेड पाटबंधारे मंडळांतर्गत जलसाठ्याची उपरोक्त स्थिती आहे. मागील वर्षी याचवेळी नांदेड जिल्ह्यात २८.४८ टक्के म्हणजेच, १९२.९६ दलघमी जलसाठा शिल्लक होता. हिंगोली जिल्ह्यात ६९.८३ दलघमी अर्थात ७.३७ टक्के जलसाठा होता. इसापूर प्रकल्पात केवळ ४.८४ टक्के म्हणजेच ४६.६३ दलघमी जलसाठा शिल्लक होता.
यावर्षी इसापूर प्रकल्पात जलसाठा उपलब्ध झाल्याने नांदेड जिल्ह्याला सिंचनासह पिण्यासाठीही इसापूर प्रकल्पातून पाणी उपलब्ध होत आहे. गतवर्षी पाणी न मिळाल्यामुळे जिल्ह्यातील अर्धापूर, भोकर, उमरी आदी भागांत सिंचनासाठी पाणी उपलब्ध झाले नव्हते. त्यामुळे या भागातील रबी हंगाम कोरडा गेला होता. यावर्षी मात्र सदर भागात रबी हंगामातील पिके बहरली आहेत. पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न सुटला आहे.
महापालिकेची पाण्यासाठी धावपळ सुरू
विष्णूपुरी प्रकल्पातून दरमहा ९ ते १२ दलघमी पाणीउपसा सुरू आहे. याच वेगाने पाणीउपसा सुरू राहिल्यास एप्रिलअखेरच प्रकल्प कोरडा होणार असून त्यानंतर मे, जून, जुलै हे तीन महिने कसे काढायचे? याची चिंता केली जात आहे. महापालिकेने आतापासूनच शहरात टंचाई निवारणासाठी उपाययोजना सुरू केल्या आहेत. शहरातील हातपंप तसेच विद्युत बोअर दुरुस्तीचेही आदेश महापालिकेने दिले आहेत. दुसरीकडे इसापूर प्रकल्पातून पर्यायी पाणीपुरवठा योजनेसाठी दुसरी पाळी घेण्याचेही प्रयत्न महापालिकेकडून करण्यात येत आहेत.

Web Title: 25% of water storage in nanded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.