नागनदीच्या पाण्यात तरुणाचा मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2018 12:43 AM2018-08-19T00:43:11+5:302018-08-19T00:45:24+5:30

यशोधरानगरातील इंदिरामाता नगरात राहणारे भीमराज अरुण उके (वय २८) यांचा मृतदेह अशोक चौकाजवळ नागनदीच्या पाण्यात आढळला. शनिवारी दुपारी १२ च्या सुमारास ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली.

Youth's body in the water of Naganadi | नागनदीच्या पाण्यात तरुणाचा मृतदेह

नागनदीच्या पाण्यात तरुणाचा मृतदेह

Next
ठळक मुद्देबीएसएनएल इमारतीच्या आवारात गळफास लावून आत्महत्या

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : यशोधरानगरातील इंदिरामाता नगरात राहणारे भीमराज अरुण उके (वय २८) यांचा मृतदेह अशोक चौकाजवळ नागनदीच्या पाण्यात आढळला. शनिवारी दुपारी १२ च्या सुमारास ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली. हा प्रकार आत्महत्येचा, अपघाताचा की घातपाताचा, ते स्पष्ट झाले नाही. हेमराज अर्जुन निमजे (वय २४) यांच्या सूचनेवरून कोतवाली पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.

गळफास लावून आत्महत्या
कळमन्यातील बीएसएनएल इमारतीच्या आवारात एका व्यक्तीने गळफास लावून आत्महत्या केली. राजाराम राधेश्याम सिलोरिया (वय ५३) असे मृताचे नाव आहे. शनिवारी सकाळी ११.३० च्या सुमारास त्याचा झाडाला गळफास लावलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. राजेंद्र राजाराम सिलोरिया (वय २८, रा. गोपालनगर डिप्टीसिग्नल, कळमना) यांच्या तक्रारीवरून कळमना पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.

जखमी वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू
अपघातात गंभीर जखमी झालेल्या वृद्धाचा अखेर उपचारादरम्यान करुण अंत झाला. दीपक प्रकाश वर्मा (वय ६७) असे त्यांचे नाव आहे. ते मानकापुरात गोधनी मार्गावर असलेल्या एमबी टाऊनमध्ये राहत होते.
१२ आॅगस्टच्या दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास वर्मा त्यांच्या दुचाकीने गिट्टीखदानमधील पोलीस तलावाकडून उत्सव लॉनकडे जात होते. रस्त्यावर उभे असलेल्या एमएच ३१/ ईव्ही ८७८५ क्रमांकाच्या वाहनचालकाने अचानक त्याचे दार उघडले. त्यामुळे वर्मा दारावर धडकून दुचाकीसह खाली पडले आणि गंभीर जखमी झाले. त्यांना मानकापूरच्या खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले. पाच दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर अखेर १७ आॅगस्टच्या सकाळी ९.४० वाजता वर्मा यांनी प्राण सोडला. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केल्यानंतर त्यांचा मुलगा शोभित दीपक वर्मा याने दिलेल्या तक्रारीवरून गिट्टीखदान पोलिसांनी दोषी वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. आरोपीचा शोध घेतला जात आहे.

 

Web Title: Youth's body in the water of Naganadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.