गाड्या गहाण ठेवण्यासाठी पोहचले युवक काँग्रेसचे कार्यकर्ते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2018 10:08 PM2018-09-20T22:08:49+5:302018-09-20T22:28:58+5:30

पेट्रोल व डिझेलचे दर सतत वाढत असल्याच्या विरोधात शहर युवक काँग्रेसच्या कार्यक र्त्यांनी गुरुवारी आगळवेगळे आंदोलन केले. कागदपत्रासह आपल्या दुचाकी घेऊ न सराफा बाजारात पोहचले. पेट्रोलचे भाव भडकल्याने गाड्या चालविणे शक्य नसल्याने या गाड्या गहाण ठेवण्याची मागणी केली.

Youth Congress activists arriving to mortgage vehicles | गाड्या गहाण ठेवण्यासाठी पोहचले युवक काँग्रेसचे कार्यकर्ते

गाड्या गहाण ठेवण्यासाठी पोहचले युवक काँग्रेसचे कार्यकर्ते

googlenewsNext
ठळक मुद्देपेट्रोल दरवाढीच्या विरोधात नागपुरात असेही आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पेट्रोल व डिझेलचे दर सतत वाढत असल्याच्या विरोधात शहर युवक काँग्रेसच्या कार्यक र्त्यांनी गुरुवारी आगळवेगळे आंदोलन केले. कागदपत्रासह आपल्या दुचाकी घेऊ न सराफा बाजारात पोहचले. पेट्रोलचे भाव भडकल्याने गाड्या चालविणे शक्य नसल्याने या गाड्या गहाण ठेवण्याची मागणी केली.
युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष तौसिफ खान यांच्या मार्गदर्शनात पूर्व नागपूरचे अध्यक्ष अक्षय घाटोल, शहर महासचिव अजहर शेख यांच्या नेतृत्वात पेट्रोल व डिझेल दरवाढी विरोधात आंदोलन करण्यात आले. पेट्रोलचे भाव भडकलेले असल्याने वाहने विकली जात नाही. त्यामुळे गाड्या गहाण ठेण्यासाठी आल्याचे कार्यक र्त्यांनी सांगितले.
पेट्रोलचे दर कमी न केल्यास या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा युवक काँग्रेसने दिला आहे. आंदोलनात फजल उर रहमान कुरैशी, नवेद शेख,वसीम शेख, मोहम्मद फैजान, शाहनवाज शेख, शोएब अन्सारी, दुर्गेश हिंगणेकर, वरुण पुरोहित, निखिल बालकोटे, राहुल मोहोड, शेख तौसीफ, नितीन जुमडे, मोहम्मद खिजर, शाहबाज खान चिश्ती आदींचा समावेश होता.

Web Title: Youth Congress activists arriving to mortgage vehicles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.