तुमचे रेस्टॉरंट, फूड स्टॉल हायजेनिक आहे का? नागपुरात करणार मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2018 10:31 AM2018-02-03T10:31:39+5:302018-02-03T10:34:19+5:30

नागरिकांना स्वच्छ वातावरणात खाद्यपदार्थ देणे ही रेस्टॉरंट चालकांची जबाबदारी आहे. मैत्री परिवार ही सामाजिक संस्था रेस्टॉरंट चालकांना ही जबाबदारी समाजावून सांगणार आहे. संस्थेतर्फे शहरात ‘हायजीन नं. १’ ही संकल्पना राबविण्यात येणार असून या माध्यमातून रेस्टॉरंट चालकांना स्वच्छतेचे नामांकनही दिले जाईल.

Is your restaurant, food stall hygienic? we will guide you | तुमचे रेस्टॉरंट, फूड स्टॉल हायजेनिक आहे का? नागपुरात करणार मार्गदर्शन

तुमचे रेस्टॉरंट, फूड स्टॉल हायजेनिक आहे का? नागपुरात करणार मार्गदर्शन

googlenewsNext
ठळक मुद्देमैत्री परिवार संस्था राबविणार संकल्पनाविष्णू मनोहर करणार तपासणी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आपण वेगवेगळ्या हॉटेल, रेस्टॉरंट, खानावळ किंवा फूडस्टॉलवर जेवायला किंवा काही खायला जातो त्यावेळी आपल्या समोरचे सर्व छानच दिसते. मात्र हे पदार्थ जिथे तयार होतात, ते किचन व आसपासची अस्वच्छता व काम करणाऱ्यांची अवस्थाही वाईट असते. नागरिकांना स्वच्छ वातावरणात खाद्यपदार्थ देणे ही रेस्टॉरंट चालकांची जबाबदारी आहे.
मैत्री परिवार ही सामाजिक संस्था रेस्टॉरंट चालकांना ही जबाबदारी समाजावून सांगणार आहे. संस्थेतर्फे शहरात ‘हायजीन नं. १’ ही संकल्पना राबविण्यात येणार असून या माध्यमातून रेस्टॉरंट चालकांना स्वच्छतेचे नामांकनही दिले जाईल, अशी माहिती संस्थेचे प्रा. संजय भेंडे यांनी पत्रपरिषदेत दिली.
वैशाली गांधी यांनी अहमदनगरमध्ये राबविलेली ही संकल्पना यशस्वी ठरली आहे. ही संकल्पना घेऊन मैत्री परिवारतर्फे शहरातील रेस्टॉरंट चालकांना हायजिनीक पद्धत अवलंबण्याचे मार्गदर्शन करणार आहे. प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर हे या अभियानाचे नेतृत्व करणार आहेत. याअंतर्गत संस्थेतर्फे पाच-पाच व्यक्तींचे पथक तयार करून सहा महिने शहरातील रेस्टॉरंट, खानावळी, स्ट्रीट फूड, फूड ट्रॅक आदी लोकांकडे भेटी देऊन त्यांना स्वच्छता पाळण्याबाबत मार्गदर्शन करणार आहेत. या पथकांमध्ये डॉक्टर्स, वकील, सामाजिक कार्यकर्त्यांचा सहभाग असणार आहे. विष्णू मनोहर यांनी सांगितले, या अभियानांतर्गत किचनचा परिसर, तेथील भिंती, फॅन, किचन ओटा, भांड्यांची स्वच्छता, ते ठेवण्याची जागा, भाजीपाल्याची योग्य व्यवस्था, धुण्याच्या व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, पेस्टकंट्रोल आदींसह काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे कपडे, अ‍ॅप्रान, केस, नखे, चप्पल, स्वच्छतेसाठी वापरण्यात येणारे वेगवेगळे कापड अशा सर्व गोष्टींबाबत चांगली व्यवस्था ठेवण्यासाठी मार्गदर्शन केले जाईल. या व्यावसायिकांना अभियानाचे सभासद बनवून वेळोवेळी भेट देऊन मार्गदर्शन केले जाणार आहे. या भेटीदरम्यान संबंधित हॉटेल चालकांनी मार्गदर्शन केल्यानुसार बदल केला का, हे पाहण्यात येईल. ज्यांनी स्वच्छतेसाठी आवश्यक त्या सुधारणा केल्या त्यांना प्रशस्तीपत्र देऊन ‘हायजीन नं. १’चे नामांकन दिले जाईल. व्यावसायिक हे प्रशस्तीपत्र दर्शनी भागात लावेल, जेणेकरून संबंधित रेस्टॉरंटमध्ये स्वच्छता पाळल्या जात असल्याची खात्री येथे येणाºया नागरिकांना मिळेल व ते निर्धोकपणे जेवणाचा आनंद घेतील.
रेस्टॉरंट व्यावसायिक स्वेच्छेने हे सभासदत्व स्वीकारू शकतात. मात्र यामुळे त्यांच्या रेस्टॉरंटमध्ये जेवायला येणाऱ्यास हायजीनिक वातावरण निर्माण होईल असा विश्वास मनोहर यांनी व्यक्त केला. पत्रपरिषदेला प्रमोद पेंडके उपस्थित होते.

Web Title: Is your restaurant, food stall hygienic? we will guide you

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :foodअन्न