देशाच्या विकासात महिलांचे आरोग्य महत्त्वाचे : अमृता फडणवीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2019 11:26 PM2019-03-08T23:26:38+5:302019-03-08T23:28:14+5:30

संपूर्ण राष्ट्रीय आरोग्याचा विचार करता महिलांचे आरोग्य या घटकाला त्यामध्ये अनन्य साधारण महत्त्व आहे. हे नाकारून चालणार नाही. या देशातील महिलांचे आरोग्य चांगले राहिले तर त्याचा परिणाम निश्चितपणे देशाच्या सर्वांगीण विकासासाठी होऊ शकेल. अनेक महिला घरच्या जबाबदाऱ्या पार पाडताना स्वत:च्या आरोग्याची काळजी घेत नाहीत. महिला आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. यामुळे अनेक महिला कर्करोगाच्या अ‍ॅडव्हान्स स्टेजमध्ये उपचारासाठी येतात. वेळेपूर्वीच कर्करोग निदान झाल्यास रुग्णासोबतच त्यांचे कुटुंब उद्ध्वस्त होण्यापासून वाचू शकते. यासाठी ‘नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट’ने हाती घेतलेली ‘आयुष्यमती’ योजना ही प्रभावी ठरेल, असे मत अमृता फडणवीस यांनी येथे व्यक्त केले.

Women's health is important in the development of the country: Amrita Fadnavis | देशाच्या विकासात महिलांचे आरोग्य महत्त्वाचे : अमृता फडणवीस

‘आयुष्यमती’ योजनेचा लोकार्पणप्रसंगी मार्गदर्शन करताना सामाजिक कार्यकर्त्या अमृता फडणवीस, मंचावर डॉ. आनंद पाठक, शैलेश जोगळेकर, डॉ. विभा दत्ता व अनिल शर्मा.

Next
ठळक मुद्दे‘नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट’च्या ‘आयुष्यमती’ योजनेचे लोकार्पण

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : संपूर्ण राष्ट्रीय आरोग्याचा विचार करता महिलांचे आरोग्य या घटकाला त्यामध्ये अनन्य साधारण महत्त्व आहे. हे नाकारून चालणार नाही. या देशातील महिलांचे आरोग्य चांगले राहिले तर त्याचा परिणाम निश्चितपणे देशाच्या सर्वांगीण विकासासाठी होऊ शकेल. अनेक महिला घरच्या जबाबदाऱ्या पार पाडताना स्वत:च्या आरोग्याची काळजी घेत नाहीत. महिला आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. यामुळे अनेक महिला कर्करोगाच्या अ‍ॅडव्हान्स स्टेजमध्ये उपचारासाठी येतात. वेळेपूर्वीच कर्करोग निदान झाल्यास रुग्णासोबतच त्यांचे कुटुंब उद्ध्वस्त होण्यापासून वाचू शकते. यासाठी ‘नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट’ने हाती घेतलेली ‘आयुष्यमती’ योजना ही प्रभावी ठरेल, असे मत अमृता फडणवीस यांनी येथे व्यक्त केले.
डॉ. आबाजी थत्ते सेवा आणि संशोधन संस्थेच्यावतीने आऊटर हिंगणा रिंगरोड, जामठा येथील ‘नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट’ येथे जागतिक महिला दिनाच्यानिमित्ताने ‘आयुष्यमती’ योजना व वेब पोर्टलचे लोकार्पण झाले. याप्रसंगी त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. व्यासपीठावर मुख्य अतिथी म्हणून अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या संचालक, मेजर जनरल (निवृत्त) डॉ. विभा दत्ता यांच्यासह नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. आनंद पाठक, मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश जोगळेकर, संयुक्त संचालक (प्रशासन) अनिल शर्मा उपस्थित होते.
फडणवीस म्हणाल्या, कर्करोगाला हरवायचे असेल तर एकत्रित लढ्याची गरज आहे. या रोगाविषयी आपण संवाद साधणे सुरू केल्यास याचा नक्कीच फायदा होईल. सोबतच कर्करोगाविषयी गैरसमजही दूर होतील. कर्करोगाच्या लक्षणांची, त्याच्या आजराची माहिती केवळ शहरातच नव्हे तर गाव-खेड्यांमध्येही पोहचविल्या जात आहे. यासाठी शासन मदत करीत आहेच. ‘नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट’ची ‘आयुष्यमती’ योजनाही यात भरीव मदत करणारी ठरणार आहे. प्रास्ताविक डा. मेधा दीक्षित यांनी केले. संचालन शब्बीर भारमल यांनी तर जोगळेकर यांनी मानले.
डॉ. दत्ता म्हणाल्या, अद्यावत तंत्रज्ञान व उपचार पद्धतीमुळे कर्करोग जीवघेणा आजार राहिलेला नाही. तरीही पहिल्या टप्प्यातच कर्करोगाचे निदान होऊन उपचार झाल्यास त्याची गंभिरता टाळणे आवश्यक आहे. सोबतच कर्करोगाविषयी गैरसमजही दूर करणे गरजेचे आहे. महिलांना आजाराच्या लक्षणांची माहिती नसल्याने व आजार होऊनही त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने विशेषत: कॅन्सरमध्ये त्या ‘अ‍ॅडव्हान्स’ स्टेजला येतात. परिणामी, पुरुषांच्या तुलनेत कर्करोगाने मृत्यूचे प्रमाण महिलांंमध्ये जास्त आहे. यासाठी व्यापक जनजागृती आवश्यक असल्याचेही त्या म्हणाल्या.
२०५० पर्यंत देश ‘कॅन्सर कॅपिटल’ होण्याची भीती
डॉ. पाठक म्हणाले, वाढते वय, अनुवांशिकता, पर्यावरण व अयोग्य जीवनशैली यामुळे कॅन्सर वाढत आहे. याशिवाय, कॅन्सरविषयी अज्ञान, जागृतीचा अभाव, सामाजिक व आर्थिक परिस्थिती, भीती, प्रकृतीकडे दुर्लक्ष यामुळे कॅन्सरच्या वेळीच निदानाकडे दुर्लक्ष होत आहे. असेच राहिल्यास २०५० पर्यंत देश ‘कॅन्सर कॅपिटल’ होण्याची भीती आहे. यामुळे कॅन्सरचे पहिल्या टप्प्यातच निदान होणे व उपचार घेणे आवश्यक आहे. यावेळी त्यांनी स्तन, गर्भाशय, अंडाशय कर्करोगाची माहिती, लक्षणे व उपचाराची माहिती दिली.
‘आयुष्यमती’ योजनेतून दर शनिवारी नि:शुल्क तपासणी
कर्करोगावर यशस्वी उपचारासाठी त्याचे वेळीच निदान होणे आवश्यक आहे. याच उद्देशाने ‘नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट’ने ‘आयुष्यमती’ योजना हाती घेतली आहे. यात या इन्स्टिट्यूटमध्ये दर शनिवारी ४० वर्षांवरील महिलांची मेमोग्राफी, सोनोग्राफी, पॅप्समिअर व गरजेनुसार इतरही तपासण्या नि:शुल्क केल्या जातील. दर आठवड्याला २५ महिलांची तर वर्षाला १५०० महिलांच्या तपासणीचे लक्ष्य आहे. विशेष म्हणजे, या योजनेतून महिलांच्या आरोग्याचा पाठपुरावाही केला जाणार आहे. योजनेच्या माध्यमातून महिलांच्या कर्करोगाची माहिती सामाजिक संस्था व इतरही संघटनांच्या मदतीने घराघरात पोहचविचा आमाचा प्रयत्न आहे, असे शैलेश जोगळेकर यांनी सांगितले.

 

Web Title: Women's health is important in the development of the country: Amrita Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.