हेर निशांत अग्रवालच्या पत्नीचाही मोबाईल, लॅपटॉप जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2018 09:41 PM2018-10-11T21:41:21+5:302018-10-11T21:42:45+5:30

आयएसआयच्या इशाऱ्यावर ब्राम्होसची हेरगिरी करणाऱ्या निशांत अग्रवाल याची पत्नी क्षितिजा हिचाही मोबाईल तसेच लॅपटॉप एटीएसने जप्त केला आहे. दरम्यान, निशांतला एटीएसने लखनौला नेल्यानंतर क्षितिजाही बुधवारी तिच्या माहेरी भोपाळला निघून गेली आहे. निशांत ज्या घरात राहत होता, त्या उज्ज्वलनगरातील परिसरात आता उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

Wife of Spy Nishant Agarwal mobile phones and laptops seized | हेर निशांत अग्रवालच्या पत्नीचाही मोबाईल, लॅपटॉप जप्त

हेर निशांत अग्रवालच्या पत्नीचाही मोबाईल, लॅपटॉप जप्त

Next
ठळक मुद्देक्षितिजा गेली भोपाळला : शेजाऱ्यांमध्ये उलटसुलट चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आयएसआयच्या इशाऱ्यावर ब्राम्होसची हेरगिरी करणाऱ्या निशांत अग्रवाल याची पत्नी क्षितिजा हिचाही मोबाईल तसेच लॅपटॉप एटीएसने जप्त केला आहे. दरम्यान, निशांतला एटीएसने लखनौला नेल्यानंतर क्षितिजाही बुधवारी तिच्या माहेरी भोपाळला निघून गेली आहे. निशांत ज्या घरात राहत होता, त्या उज्ज्वलनगरातील परिसरात आता उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.
शेजाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार,आकर्षक व्यक्तिमत्त्व असलेला निशांत फारसा कुणाशी मिळत मिसळत नव्हता. तो फटकूनच वागायचा. पकडला जाण्याच्या दोन दिवसांपूर्वी त्याची दुचाकी बंद पडली तेव्हा तो बाजूच्या एका गॅरेजवर बसून होता. शत्रू राष्ट्रातील हेरांना आपली माहिती उघड करून देणाऱ्या निशांतने गॅरेजवाला अथवा आजूबाजूच्यांना मात्र आपल्याबद्दल काही सांगण्याचे कटाक्षाने टाळले होते. त्याला पकडल्यानंतर आज सहज चर्चा करणाºया शेजाºयांकडून ही माहिती उपलब्ध झाली. दरम्यान, आपल्या घरात आयएसआयचा एजंट राहत होता, ही बाब घरमालक मनोहर काळे यांना मानसिक धक्का देणारी ठरली आहे. ते यासंबंधाने वारंवार संपर्क करूनही काही बोलायला तयार नाही. दरम्यान, सोमवारी सकाळी निशांतला एटीएसने अटक केली. त्यानंतर त्याच्या पत्नीचीही तपास अधिकाऱ्यांकडून चौकशी झाली. तिच्या मोबाईलमध्ये आणि फेसबुक प्रोफाईलमध्येही निशांतच्या कथित मैत्रिणी (हनी ट्रॅप लावणाऱ्या)ची प्रोफाईल मिळाल्याने तिचा या प्रकरणात काही संबंध आहे का, याचीही तपास अधिकाऱ्यांनी खात्री करून घेतली. तिचा मोबाईल आणि लॅपटॉपही त्यांनी ताब्यात घेतल्याचे समजते. तिला विशिष्ट सूचना देऊन तपास अधिकाऱ्यांनी बाहेर ठेवले. दरम्यान, लग्नानंतर अवघ्या सहा महिन्यानेच संसाराची निशांतने अशा प्रकारे वाट लावल्याने क्षितिजाला कमालीचा मानसिक धक्का बसला आहे. शेजारी राहणाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे क्षितिजा दोन दिवस आपल्या घरमालकांसोबतही बोलली नाही. बुधवारी ती आपल्या माहेरी भोपाळला निघून गेली.

 

 

Web Title: Wife of Spy Nishant Agarwal mobile phones and laptops seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.