श्रवणीय सुरावटींचा ‘ये कहां आ गये हम...’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 12:42 AM2018-06-13T00:42:24+5:302018-06-13T00:42:46+5:30

प्रतिभावान शायर, संगीतकार व पार्श्वगायकांनी अजरामर केलेल्या गीतांचे कठीण आव्हान सहजपणे पेलणाऱ्या नवीन कलावंतांचा ‘ये कहां आ गये हम...’ हा श्रवणीय कार्यक्रम मंगळवारी सायंटिफिक सभागृहात सादर करण्यात आला. या हौशीकलावंतांद्वारे प्रत्येकाच्या मनातील अमीट अशा गीतांच्या सादरीकरणाने मंत्रमुग्ध झालेल्या श्रोत्यांच्या मनातही शीर्षकाच्या ओळींप्रमाणे भावना निर्माण केली.

'Where have we come from' ---- | श्रवणीय सुरावटींचा ‘ये कहां आ गये हम...’

श्रवणीय सुरावटींचा ‘ये कहां आ गये हम...’

Next
ठळक मुद्देहिंदी चित्रपट गीतांचे इंद्रधनुषी सादरीकरण

 लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : प्रतिभावान शायर, संगीतकार व पार्श्वगायकांनी अजरामर केलेल्या गीतांचे कठीण आव्हान सहजपणे पेलणाऱ्या नवीन कलावंतांचा ‘ये कहां आ गये हम...’ हा श्रवणीय कार्यक्रम मंगळवारी सायंटिफिक सभागृहात सादर करण्यात आला. या हौशीकलावंतांद्वारे प्रत्येकाच्या मनातील अमीट अशा गीतांच्या सादरीकरणाने मंत्रमुग्ध झालेल्या श्रोत्यांच्या मनातही शीर्षकाच्या ओळींप्रमाणे भावना निर्माण केली.
कला आराधना व नूपुर संगीततर्फे सायंटिफिक सभागृह येथे हा स्वरमाधुर्य निर्माण करणारा कार्यक्रम मंगळवारी सादर झाला. भावविभोर करणाऱ्या अमीट गीतांचे संगीत संयोजन रचना पाठक-खांडेकर यांचे व निर्मिती संकल्पना मैथिली मगरे यांची होती. श्रोत्यांच्या कानामनावर गारुड असणाऱ्या मधूर स्वरांच्या सुवर्णस्पर्शी गीतांचे सादरीकरण करणाऱ्या नवोदित विद्यार्थी गायकांचे कौतुक करावे अशीच ही अनुभूती होती. लोकप्रिय चित्रपटातील गाजलेल्या २७ गीतांच्या सादरीकरणाने हा कार्यक्रम इंद्रधनुषी अनुभव देणारा ठरला. सूरज मालवीय, डॉ. ममता खांडेकर, मुश्ताक शेख, रचना पाठक-खांडेकर, महेश मगरे, चिन्मय पाठक, बालगायक परितोष मगरे, वैशाली शिरसाठ, करुणा खांडेकर, नंदीनी सयाम, नंदा तायडे, कांचन भालेकर, सायली पवार या गायक कलावंतांनी अतिशय ताकदीने गाणी सादर केली.
सभागृहातील प्रसन्न वातावरणात सामूहिकरीतीने सादर झालेल्या ‘ज्योती कलश छलके...’ या भावगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यानंतर ‘एक अजनबी हसीना से..., पुकारता चला हूं मै..., पल पल दिल के पास..., ओ साथी रे..., जाईये आप कहां जायेंगे..., सोला बरस की बाली उमर को..., परदे मे रहने दो..., आईये मेहरबा..., अफसाना लिख रही हूं..., दिल है छोटासा...’ ही एकाहून एक सरस गीतांनी श्रोत्यांना संमोहित केले. ममता खांडेकर यांनी विविध गायकांची मेलोडी मिक्स करून गायली. मुश्ताक शेख व रचना यांचे शीर्षक गीत आणि ममता यांच्यासोबतचे ‘पन्ना की तमन्ना...’ हे युगलगीत श्रोत्यांच्या पसंतीचे ठरले. रमेश खांडेकर, रचना पाठक-खांडेकर, अशोक ठवरे, आशिष नाईक, विक्रम विझे, राहुल सोंढिया या वाद्यकलावंतांनी सुरेल साथसंगत केली. निवेदन माधवी पांडे यांनी केले.
कार्यक्रमादरम्यान ज्येष्ठ कलावंत मेलोडी मेकर्स आॅर्केस्ट्राचे ओ.पी. सिंह यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ पत्रकार भास्कर लोंढे, अनुराधा लोंढे, सना पंडित, गायिका नलिनी नाग, नगरसेवक अविनाश ठाकरे, संदीप गवई, विशाखा मोहोड, जयश्री वाडीभस्मे आदी मान्यवर उपस्थित होते.

Web Title: 'Where have we come from' ----

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.