'Welcome to the Lokmat Amazon at your door'; Youthful spontaneous response | ‘लोकमत अ‍ॅमेझॉन आपल्या दारी’; तरुणाईचा उत्स्फूर्त प्रतिसाद
‘लोकमत अ‍ॅमेझॉन आपल्या दारी’; तरुणाईचा उत्स्फूर्त प्रतिसाद

ठळक मुद्देप्रोत्साहनपर बक्षिसांची बरसात

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नव्या युगात खरेदीचा नवा पर्याय सामोर आला आहे. यात हवे ते उत्पादन निवडण्यासाठी आणि दारात रोखीने खरेदीचा आनंद लुटण्यासाठी ‘लोकमत अ‍ॅमेझॉन आपल्या दारी’ या जनजागृती उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. २८ डिसेंबर २०१७ ते १३ जानेवारी २०१८ पर्यंत चालणारा हा उपक्रम शहाराच्या विविध ठिकाणी आयोजित करण्यात येत असून प्रत्येक उपक्रमात लोकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे.
या उपक्रमात ‘अ‍ॅमेझॉन अ‍ॅप’चा वापर करणाऱ्यांवर प्रोत्साहनपर बक्षिसांची बरसात केली जात आहे. अ‍ॅप संबंधित खेळामध्ये विजयी व्यक्तीला तीन हजार रुपये बक्षीस म्हणून कूपन दिले जात आहे. ‘लोकमत अ‍ॅमेझॉन आपल्या दारी जनजागृती’ उपक्रमाला सर्वाधिक प्रतिसाद युवक-युवतींकडून मिळत आहे. त्यांची गर्दी लक्ष वेधून घेत आहे. स्मार्ट फोनवर ‘अ‍ॅमेझॉन अ‍ॅप’ डाऊनलोड केल्यावर विविध प्रकारची १५ कोटींहून अधिक उत्पादने सर्व काही एकाच जागी निवड करण्याची संधी उपलब्ध होत असल्याने नवीन ग्राहकही भारावले आहेत. हसतखेळत ग्राहकांना अ‍ॅप डाऊनलोड करण्याच्या या स्पर्धेत निवेदक आपल्या खास शैलीतून चांगलेच मनोरंजनही करीत आहे. या सोबतच शहरात विविध ठिकाणी ‘अ‍ॅमेझॉनचे उडाण सेंटर’ उपलब्ध असून आॅनलाईन खरेदीत अडचणी असल्यास या ठिकाणी मदत दिली जात आहे.

अ‍ॅमेझॉन अ‍ॅपची वैशिष्ट्ये

कॅश आॅन डिलिव्हरी
तुमच्या आॅर्डर्स द्या आणि आॅर्डर प्राप्त झाल्यानंतर रोख पैसे द्या, यासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क नाही आणि ‘कॅश आॅन डिलिव्हरी’साठी पात्र अशी खूण असलेल्या सर्व उत्पादनांसाठी तुम्ही रोख पैसे द्या.

एक्स्चेंज आॅफर
मोबाईल, टीव्ही, रेफ्रीजरेटर, वॉशिंग मशीन, लॅपटॉप यासारखे आणि इतर अनेक नवे ‘प्रॉडक्ट्स रेंजवर’ सवलतीसाठी आपले जुने प्रोडक्ट्स एक्स्चेंज करा.

सुलभ हप्ते (ईएमआय)
तुम्ही अनेक कार्डस्मधून निवड करून समान मासिक हप्त्यांमध्ये तुमची आॅर्डर ‘पे’ करू शकता.

ग्राहकांचा अभिप्राय
उत्पादनांबद्दल अधिक माहिती घेणे आणि निर्णय सहजपणे घेण्यासाठी हजारो अस्सल अभिप्राय वाचा.

हवे ते एकाच जागी
कोणतीही गोष्ट आणि प्रत्येक गोष्ट निवडीसाठी १५ कोटींहून अधिक उत्पादनांद्वारे तुम्हाला हवे ते सर्व एकाच जागी आहे.

आपली आॅर्डर ‘ट्रॅक’ करा
तुमची आॅर्डर कुठपर्यंत आली आहे, ते नेमके शोधण्यासाठी केवळ अ‍ॅप वापरा.


Web Title: 'Welcome to the Lokmat Amazon at your door'; Youthful spontaneous response
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.