दुष्काळग्रस्त महाराष्ट्रात रस्त्यांसह मिळू लागले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2019 10:24 PM2019-07-11T22:24:46+5:302019-07-11T22:25:45+5:30

केंद्रीय भूपृष्ठ रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी राज्य महामार्गाच्या बांधकामासोबतच परिसरात जलसंधारणाची कामे करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला होता. त्या निर्णयाचे फलित आता दिसू लागले आहे. दुष्काळग्रस्त महाराष्ट्रात महामार्गांसह पाणीही उपलब्ध होऊ लागले आहे.

Water is available with roads in drought-hit Maharashtra | दुष्काळग्रस्त महाराष्ट्रात रस्त्यांसह मिळू लागले पाणी

दुष्काळग्रस्त महाराष्ट्रात रस्त्यांसह मिळू लागले पाणी

Next
ठळक मुद्देराज्य महामार्गासह जलसंधारणाची कामे : गडकरींच्या निर्णयाचे फलित

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : केंद्रीय भूपृष्ठ रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी राज्य महामार्गाच्या बांधकामासोबतच परिसरात जलसंधारणाची कामे करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला होता. त्या निर्णयाचे फलित आता दिसू लागले आहे. दुष्काळग्रस्त महाराष्ट्रात महामार्गांसहपाणीही उपलब्ध होऊ लागले आहे.
महाराष्ट्रातील अनेक भाग आजही दुष्काळग्रस्त आहेत. शेतकरी आत्महत्या होताहेत. या गंभीर समस्येची जाण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनाही आहे. या समस्येतून मार्ग काढण्यासाठी त्यांनी ‘महामार्गाचे रुंदीकरण करतांना परिसरातील नदी-तलावांचे खोलीकरण करण्याचा एक ऐतिहासिक निर्णय घेतला. राज्य महामार्ग बांधत असताना मोठ्या प्रमाणावर मातीची गरज असते. ही माती बाहेरून बोलावली जाते. त्यावर कोट्यवधी रुपये खर्च येतो. अशा परिस्थितीत रस्ता रुंदीकरण करताना जवळपासच्या नदी-तलावांमधील गाळाचा वापर करण्यास गडकरी यांनी मंजुरी दिली. यातून दोन फायदे होत आहेत. एक तर नदी-तलावातील गाळ काढून या मातीची गरज भागवल्यास रस्ता बांधकामास मदत होते. यामुळे कोट्यवधी रुपयांची बचत होईल आणि नदी तलावांचे खोलीकरण होऊन ते पुनर्जीवित होत आहेत. यातून जलसंधारणाचे कामही होत आहे.
महाराष्ट्रातील बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव हा परिसरही शेतकरी आत्महत्याग्रस्त म्हणून ओळखला जातो. गडकरींच्या निर्णयानंतर या परिसरातील नदी, नाले आणि तलावांना पुनर्जीवित करण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. येथील राज्य महामार्गाच्या बांधकामाला मंजुरी मिळालेली आहे. त्यामुळे खामगावमध्ये अनेक सकारात्मक बदलांनी गती पकडली आहे. यापूर्वी या भागात पाणी साठवण्याची क्षमता खूप कमी होती. त्यामुळे भरपूर पाऊस होऊनही नदी, नाले, तलाव आणि बांधांमधील पाणी पुन्हा वाहून जात होते. परंतु यावेळी जलस्रोतांवर बांध बांधल्यामुळे आणि नदी-नाले व तलावातील गाळ काढल्यामुळे वाहून जाणारे पाणी नदी-नाले व तलावांमध्ये थांबले आहे. येथील लोकांचे म्हणणे आहे की, गेल्या ३० वर्षानंतर येथील नदी-नाले व तलावांमध्ये इतके पाणी असल्याचे पाहायला मिळाले आहे.
असे बदलले चित्र
बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव विधानसभा क्षेत्रात राष्ट्रीय महामार्ग सुधाराचे चार प्रकल्प प्रगतिपथावर आहेत. या प्रकल्पांसाठी लागणाऱ्या मातीसाठी २७ तलाव आणि १२ नदींमधील गाळ काढण्यात आला आहे. एकूण ३०,७५,००० घनमीटर माती काढण्यात आली. यामुळे या नदी-तलवातील पाणी साठवण्याची क्षमता वाढून ती ३०७५ टीसीएम पर्यंत पोहोचली आहे. यामुळे परिसरातील ५२ गावे आणि ३८ पाणीपुरवठा योजनेलाही याचा लाभ झाला आहे. तसेच आतापर्यंत १५,००० विहिरीसुद्धा पुन्हा पाण्याने भरल्या आहेत.
 

Web Title: Water is available with roads in drought-hit Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.