मान्सूनच्या प्रतीक्षेत धरणे आटली : प्रशासन चिंतेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2019 10:51 PM2019-06-19T22:51:49+5:302019-06-19T22:52:36+5:30

जून महिन्याचा तिसरा आठवडा सुरु आहे. परंतु मान्सूनचा पत्ता नाही. एकीकडे उन्हामुळे नागरिक त्रस्त झाले आहे. तर दुसरीकडे पाण्याअभावी धरणेही आटली आहेत. नागपूर विभागातील १८ मोठ्या धरणांपैकी तब्बल ६ धरणे कोरडी पडली असून एकूण धरणात केवळ ५ .०२ टक्के इतका साठा शिल्लक आहे. नागपुरात केवळ ३० जूनपर्यंत पुरेल इतकेच पिण्याचे पाणी आहे. तेव्हा येत्या काही दिवसात पाऊस न पडल्यास पिण्याच्या पाण्यासाठी हाहाकार उडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रशासनही चिंतेत पडले आहे.

Waiting for the monsoon dams become dried : Administration worried | मान्सूनच्या प्रतीक्षेत धरणे आटली : प्रशासन चिंतेत

मान्सूनच्या प्रतीक्षेत धरणे आटली : प्रशासन चिंतेत

Next
ठळक मुद्देनागपूर विभागात केवळ पाच टक्के साठा शिल्लक

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जून महिन्याचा तिसरा आठवडा सुरु आहे. परंतु मान्सूनचा पत्ता नाही. एकीकडे उन्हामुळे नागरिक त्रस्त झाले आहे. तर दुसरीकडे पाण्याअभावी धरणेही आटली आहेत. नागपूर विभागातील १८ मोठ्या धरणांपैकी तब्बल ६ धरणे कोरडी पडली असून एकूण धरणात केवळ ५ .०२ टक्के इतका साठा शिल्लक आहे. नागपुरात केवळ ३० जूनपर्यंत पुरेल इतकेच पिण्याचे पाणी आहे. तेव्हा येत्या काही दिवसात पाऊस न पडल्यास पिण्याच्या पाण्यासाठी हाहाकार उडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रशासनही चिंतेत पडले आहे.
नागपूर विभागात एकूण १८ मोठी धरणे आहेत. त्याची एकूण पाणीसाठवण्याची क्षमता ही ३५५३.७७ दलघमी इतकी आहे. त्यात आजच्या तारखेला म्हणजे १९ जून रोजी केवळ १७८.३६ दलघमी म्हणजेच केवळ ५.२ टक्के इतका पाणीसाठा शिल्लक आहे. यापैकी तोतलाडोह, लोअर नांद वणा, गडचिरोलीतील दिना, वर्धा येथील पोथरा, भंडाऱ्यातील गोसेखुर्द आणि बावनथडी ही धरणे पूर्णपणे आटली आहेत. उर्वरित प्रकल्पांपैकी कामठी खेरी येथे २३.९८ टक्के, रामटेकमध्ये ७.५० टक्के, वडगाव १०.४ टक्के, इटियाडोह १६ .२७ टक्के, सिरपूर १८.२६ टक्के, पुजारी टोला ९.९२ टक्के, कालिसरार २२.४६ टक्के, असोलामेंढा २४.३८ टक्के, बोर १०.४१, धांम ०.२४ टक्के, लोअर वर्धा टप्पा १ २.३२ टक्के आणि धापेवाडा बॅरेज टप्पा २ येथे २.४५ टक्के इतका पाणीसाठा शिल्लक आहे. येत्या काही दिवसात पाऊस न आल्यास परिस्थिती आणखी भयावह होण्याची शक्यता आहे.
पाच वर्षातील पाणीसाठा स्थिती
वर्ष         मोठ्या प्रकल्पातील पाणीसाठा (१९ जून रोजी)
२०१९ - १७८.३६ दलघमी
२०१८ - ३८१.४२ दलघमी
२०१७ - २९७.८६ दलघमी
२०१६ - ६४६ दलघमी
२०१५ - ७२० दलघमी
२०१४ - १४५०.८० दलघमी

 

Web Title: Waiting for the monsoon dams become dried : Administration worried

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.