राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्मृतिमंदिराला उपराष्ट्रपतींनी दिली भेट, सुरक्षा यंत्रणांची धावपळ

By ऑनलाइन लोकमत on Fri, November 10, 2017 8:40pm

देशाचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी शुक्रवारी सायंकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्मृतिमंदिराला भेट दिली. यावेळी त्यांनी आद्य सरसंघचालक डॉ.केशव बळीराम हेडगेवार व द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरूजी यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतले. 

नागपूर : देशाचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी शुक्रवारी सायंकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्मृतिमंदिराला भेट दिली. यावेळी त्यांनी आद्य सरसंघचालक डॉ.केशव बळीराम हेडगेवार व द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरूजी यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतले.  संघस्थानाला भेट देणारे ते पहिले उपराष्ट्रपती ठरले. 

‘अ‍ॅग्रोव्हिजन’चा कार्यक्रम आटोपल्यानंतर उपराष्ट्रपतींचा ताफा कार्यक्रमस्थळातून निघाला. मात्र ऐनवेळी विमानतळाऐवजी ताफा स्मृतिमंदिर परिसरात शिरला. यावेळी उपराष्ट्रपतींसोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदामंत्री नितीन गडकरी हेदेखील उपस्थित होते. उपराष्ट्रपतींच्या नियोजित कार्यक्रमात ही भेट नव्हती. त्यामुळे सुरक्षायंत्रणांची धावपळ झाली. अनेक पोलीस अधिकारी तर धावतच स्मृतिमंदिरात पोहोचले. विशेष म्हणजे यावेळी संघाच्या ४५ हून अधिक वयाच्या स्वयंसेवकांचा राष्ट्रीय पातळीवरील तृतीय वर्ष वर्ग सुरू होता. संघस्थानावर सुमारे ८०० स्वयंसेवक जमले असतानाच उपराष्ट्रपती तेथे पोहोचल्याने सर्वांमध्ये उत्सुकता दिसून आली. संघातर्फे सहसरकार्यवाह सुरेश सोनी, तृतीय वर्ष सर्वाधिकारी नानासाहेब जाधव, महानगर सहकार्यवाह रविंद्र बोकारे यांनी उपराष्ट्रपतींचे स्वागत केले. यावेळी सुरेश सोनी यांनी उपराष्ट्रपतींना भारतमातेची प्रतिमा भेट दिली. 

यावेळी राज्याचे उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन तसेच पशुसंवर्धन व दुग्धविकास राज्यमंत्री महादेव जानकर हेदेखील उपस्थित होते.

संबंधित

तीन वर्षे आतंकवाद्यांचा केला दटून सामना
भविष्यातही मलाच संधी : फडणवीस
शिधापत्रिकेवर मिळणार लोह-आयोडिनयुक्त मीठ
राज्यात तीन ठिकाणी हिमॅटोलॉजी सेंटर
प्रामाणिक पत्रकारांना मिळते समाजाचे संरक्षण : एस.एन. विनोद

नागपूर कडून आणखी

निलंबन तुम्ही करता की मी करू?
नागपुरात सिंगापूर लॉटरीच्या नावावर ४.६० लाखाने फसविले
मेळघाटात बालमृत्यूचे तांडव, शेकडो बालक आजारी
मिर्चापूर, अमदाबाद येथे बिबट्याचे दर्शन
प्रफुल्ल कांबळेच्या घातपाताची सखोल चौकशी करा

आणखी वाचा