विदर्भात उत्स्फूर्त बंद; जाळपोळ  

By लोकमत न्यूज नेटवर्क on Thu, January 04, 2018 3:54am

संपूर्ण विदर्भात तीव्र पडसाद उमटले. जाळपोळ, तोडफोड झाली. चंद्रपुरात आमदार नाना शामकुळे यांच्या कार्यालयाची आंदोलकांनी तोडफोड केली.

नागपूर : संपूर्ण विदर्भात तीव्र पडसाद उमटले. जाळपोळ, तोडफोड झाली. चंद्रपुरात आमदार नाना शामकुळे यांच्या कार्यालयाची आंदोलकांनी तोडफोड केली. अमरावती येथे बंदला हिंसक वळण लागल्याने जमावबंदी आदेश लागू केला. भंडारा, यवतमाळ, वर्धा जिल्ह्यात ठिकठिकाणी रास्ता रोको झाला. दुकाने बंद होती. चंद्रपूर जिल्ह्यात बंद पाळण्यात आला. तळोधी येथे आंदोलनकांनी कापड व्यापाºयाला मारहाण केली. सोनुर्ली येथे मुख्यमंत्र्यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आला. गडचिरोली जिल्ह्यात शाळा व बाजारपेठा व बहुतांश बसफेºयाही बंद होत्या. अमरावती जिल्ह्यात दयार्पूर येथे सात खासगी वाहनांची तोडफोड झाली. गोंदिया जिल्ह्यातील आठ तालुक्यात सभा, रॅली व मोर्चे काढण्यात आले. गोंदिया आणि तिरोडा आगाराच्या ५०० बसफेºया रद्द करण्यात आल्या. बंदला पश्चिम वºहाडात चांगला प्रतिसाद मिळाला. अकोल्यात बहुतांश दुकाने बंद होती. अकोल्यात सिंधी कॅम्प भागात काही दुकांनावर दगडफेक झाली. जिल्ह्यात अनेक ठिकाणी रास्ता रोको झाला. हिंगणी येथे खासगी वाहनांची तोडफोड झाली. बाळापूर येथे बस जाळण्याचा प्रयत्न झाला. वाशिम जिल्ह्यात अनेक ठिकाणी रास्ता रोको झाला. बससेवाही ठप्प होती. बुलडाणा जिल्ह्यात खामगाव येथील नगरपालिकेच्या कार्यालयावर दगडफेक झाली. पोलिसांनी आंदोलकांवर सौम्य लाठीमार करुन परिस्थिती नियंत्रणात आणली.

संबंधित

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी लोणंदमध्ये मोर्चा
Maharashtra Bandh : आंदोलकांकडून वाळूज एमआयडीसीत सुमारे 60 कंपन्यांची तोडफोड
Maharashtra Bandh: ‘महाराष्ट्र बंद’ला अनुचित वळण, पुणे, औरंगाबादेत आंदोलक प्रक्षुब्ध, पोलीस जखमी
विदर्भात बंद शांततेत; चांगला प्रतिसाद
बंदमुळे न्यायालयातील कामकाजही ठप्प

नागपूर कडून आणखी

नागपुरात जन्मदात्रीच्या खुनाचा प्रयत्न : टोकदार वस्तूने केले घाव
नागपुरात प्रियकराच्या धोकेबाजीमुळे प्रेयसीची आत्महत्या
नागपुरात मेयोतील ३०वर डॉक्टरांना डेंग्यू
नागपूरच्या दिशांत वर्माची दिल्लीतील राष्ट्रीय स्पर्धेकरिता निवड
‘मी टू’.. ‘नेव्हर’

आणखी वाचा