विदर्भ एक्स्प्रेस गोंदियाऐवजी नागपुरातून रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2019 09:13 PM2019-07-03T21:13:30+5:302019-07-03T21:14:35+5:30

पावसामुळे रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक विस्कळीत झाले असून त्याचा फटका प्रवाशांना बसला आहे. बुधवारी गोंदिया-मुंबई विदर्भ एक्स्प्रेस गोंदियाऐवजी नागपुरातून रवाना करण्यात आली. नागपूर-मुंबई दुरांतो एक्स्प्रेस ८.४० ऐवजी रात्री १०.३० वाजता सोडण्यात आली तर ज्ञानेश्वरी एक्स्प्रेस, छत्रपती शिवाजी टर्मिनस-हावडा मेल, शालिमार एक्स्प्रेस आणि हावडा-मुंबई दुरांतो एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या आहेत.

Vidarbha Express departed from Nagpur instead of Gondia | विदर्भ एक्स्प्रेस गोंदियाऐवजी नागपुरातून रवाना

विदर्भ एक्स्प्रेस गोंदियाऐवजी नागपुरातून रवाना

googlenewsNext
ठळक मुद्देचार गाड्या रद्द : पावसामुळे रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक विस्कळीत

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पावसामुळे रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक विस्कळीत झाले असून त्याचा फटका प्रवाशांना बसला आहे. बुधवारी गोंदिया-मुंबई विदर्भ एक्स्प्रेस गोंदियाऐवजी नागपुरातून रवाना करण्यात आली. नागपूर-मुंबई दुरांतो एक्स्प्रेस ८.४० ऐवजी रात्री १०.३० वाजता सोडण्यात आली तर ज्ञानेश्वरी एक्स्प्रेस, छत्रपती शिवाजी टर्मिनस-हावडा मेल, शालिमार एक्स्प्रेस आणि हावडा-मुंबई दुरांतो एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या आहेत.
पावसामुळे मुंबई मार्गावरील बहुतांश रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक विस्कळीत झाले आहे. याचा प्रवाशांना मोठा फटका बसला आहे. दरम्यान रेल्वे प्रशासनाने रेल्वेगाडी क्रमांक १२१०६ गोंदिया-मुंबई विदर्भ एक्स्प्रेस गोंदिया ऐवजी नागपूरवरून रवाना केली. रेल्वेगाडी क्रमांक १२२९० नागपूर-मुंबई दुरांतो एक्स्प्रेस रात्री ८,४० ऐवजी १०.३० वाजता रवाना करण्यात आली तर १२१०१ लोकमान्य टिळक टर्मिनस-हावडा ज्ञानेश्वरी एक्स्प्रेस रद्द, १२८०९ छत्रपती शिवाजी टर्मिनस-हावडा मेल, १८०२९ लोकमान्य टिळक टर्मिनस-शालिमार एक्स्प्रेस आणि १२२६२ हावडा-छत्रपती शिवाजी टर्मिनस दुरांतो एक्स्प्रेस रद्द करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. उशिराने येणाऱ्या रेल्वेगाड्यात १२८१० हावडा-छत्रपती शिवाजी टर्मिनस मुंबई मेल ३.३० तास, १६३६० पाटणा-एर्नाकुलम एक्स्प्रेस १.३० तास, १२१३० हावडा-पुणे आझादहिंद एक्स्प्रेस २ तास, शामता वैष्णोदेवी कटरा-यशवंतपूर स्पेशल ६.३० तास, १२९०६ कोलकाता-पोरबंदर ओखा एक्स्प्रेस १.१५ तास, १२१४६ पुरी-लोकमान्य टिळक टर्मिनस सुपर एक्स्प्रेस १.३० तास, १२८४३ पुरी-अहमदाबाद एक्स्प्रेस १.४५ तास, १२८६० हावडा-छत्रपती शिवाजी टर्मिनस मुंबई गीतांजली एक्स्प्रेस २ तास, १८०३० शालिमार-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस १ तास आणि १२४०९ रायगड-हजरत निजामुद्दीन गोंडवाना एक्स्प्रेस १.२० तास उशिराने धावत आहे. रेल्वेचे वेळापत्रक विस्कळीत झाल्यामुळे प्रवाशांना मोठा फटका बसला असून प्रवाशांना ताटकळत रेल्वेस्थानकावर बसून राहण्याची पाळी आली.

Web Title: Vidarbha Express departed from Nagpur instead of Gondia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.