‘नो पार्किंग’ मधील वाहने उचला पण जरा नियमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 07:19 PM2018-06-20T19:19:48+5:302018-06-20T19:20:17+5:30

शहरातील व्यापारीपेठांमध्ये वाहनांच्या पार्किंगच्या जागी व्यावसायिकांचे अतिक्रमण झाले आहे. त्यामुळे कामानिमित्त काही वेळासाठी दुचाकीस्वार रस्त्याच्या कडेला वाहनाची पार्किंग करतो. या काही मिनिटांच्या अवधीतच वाहतूक पोलिसांचा टेम्पो येऊन दुचाकी घेऊन जातो. उगाच त्या दुचाकीस्वाराच्या खिशाला २५० ते ३०० रुपयांचा भुर्दंड बसतो. त्यातच रस्त्यावर उभी असलेली वाहने उचलेगिरी करणारे रोजंदारी कामगार वाहनचालकांशी दादागिरी करतात. हा प्रकार अनेकांच्या बाबतीत दररोज घडताना दिसतो. वाहनांची उचलेगिरी करतानाही काही नियम आहेत. परंतु या नियमांची पायमल्ली होताना दिसते.

Vehicles in 'no parking' lift up but in the rules | ‘नो पार्किंग’ मधील वाहने उचला पण जरा नियमात

‘नो पार्किंग’ मधील वाहने उचला पण जरा नियमात

googlenewsNext
ठळक मुद्देचालकांशी दादागिरी कशाला : रस्त्यावर अतिक्रमण, लोक वाहने ठेवणार कुठे?

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरातील व्यापारीपेठांमध्ये वाहनांच्या पार्किंगच्या जागी व्यावसायिकांचे अतिक्रमण झाले आहे. त्यामुळे कामानिमित्त काही वेळासाठी दुचाकीस्वार रस्त्याच्या कडेला वाहनाची पार्किंग करतो. या काही मिनिटांच्या अवधीतच वाहतूक पोलिसांचा टेम्पो येऊन दुचाकी घेऊन जातो. उगाच त्या दुचाकीस्वाराच्या खिशाला २५० ते ३०० रुपयांचा भुर्दंड बसतो. त्यातच रस्त्यावर उभी असलेली वाहने उचलेगिरी करणारे रोजंदारी कामगार वाहनचालकांशी दादागिरी करतात. हा प्रकार अनेकांच्या बाबतीत दररोज घडताना दिसतो. वाहनांची उचलेगिरी करतानाही काही नियम आहेत. परंतु या नियमांची पायमल्ली होताना दिसते.
शहरातील बाजारपेठांमधील रस्त्यावर अतिक्रमण वाढले आहे. काही बाजारपेठ परिसरात पार्किंगची व्यवस्था नाही. काही ठिकाणी दुचाकी पार्किंगची व्यवस्था आहे. पण दोन-पाच मिनिटांच्या कामासाठी दुचाकीस्वाराला १० रुपये देणे परवडणारे नाही. रस्त्यालगत असलेल्या वाहनांच्या पार्किंगच्या जागेत व्यावसायिक बसलेले असतात. त्यामुळे नाईलाजास्तव रस्त्यावर वाहन पार्क केले जाते. वाहतूक पोलीस विभागाने महसूल गोळा करण्याच्या नावाखाली शहरातील वाहने उचलण्याची मोहीमच राबविली आहे. शहरातील मीठानिम, एमआयडीसी, इंदोरा, दोसरभवन, अजनी या वाहतूक विभागातील पथकाकडून दररोज शेकडो वाहने उचलली जातात. बरेचदा वाहने उचलताना वाहन चालकांशी उचलणाऱ्या मजुरांच्या खटापटीही उडतात. दुचाकी चालकासोबत दादागिरी करण्यात येते. या सर्व प्रकाराला वाहतूक पोलिसांची मूकसंमती असते. गाडी उचलताना नागरिकांशी झालेल्या झटापटीचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहे. मुळात वाहने उचलण्यासंदर्भातसुद्धा काही नियम आहेत. पण या नियमांचे पालन वाहतूक पोलीस स्वत:च करताना दिसत नाही.
 वाहन उचलण्यापूर्वी
सार्वजनिक ठिकाणी वाहतुकीला अडथळा निर्माण झाल्यास वाहने उचलावी.
वाहने उचलण्यापूर्वी पोलिसांकडून स्पीकरवर दोन वेळा सूचना देणे गरजेचे आहे.
उचललेल्या वाहनाच्या जागेवर खडूने गोल करून, त्यावर चौफुली मारावी.
उचललेल्या गाडीचे कोणतेही नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी ठेकेदाराची आहे. परंतु गाडीचे नुकसान झाल्यास कुणीही जबाबदारी घेत नाही.
 वाहने उचलणाऱ्याची चारित्र्य पडताळणी नाही
वाहतूक पोलिसांनी वाहने उचलण्याचा वर्षभराचा ठेका एका ठेकेदाराला दिला आहे. हा ठेकेदार २५० ते ३०० रुपये रोजीवर वाहतूक विभागाला माणसे पुरवितो. परंतु या माणसांची चारित्र्य पडताळणी केली जात नाही. या माणसांना दिलेल्या टार्गेटपेक्षा अधिक वाहने उचलल्यास ठेकेदाराकडूनत्यांना बक्षीसही दिले जात असल्याची माहिती आहे. हे बक्षीस मिळविण्याच्या उद्देशातून वाहनाची उचलेगिरी करणारी ही माणसे नियमांचेही पालन करीत नाही. उलट दादागिरीवर उतरतात.
 वाहनांच्या डिक्कीतील साहित्याची जबाबदारी कुणाची ?
वाहतूक पोलिसांनी उचलून नेलेल्या गाडीच्या डिक्कीतील साहित्य हरविल्याचे अनेकांच्या बाबतीत घडले आहे. महिलांच्या दुचाकी वाहनातील डिक्कीत तर अनेक मौल्यवान वस्तू असतात. सूत्रांच्या सांगण्यानुसार हे उचलेगिरी करणारे टपूनच असतात. वाहतूक पोलीस मात्र याची जबाबदारी घेत नाही.

 

Web Title: Vehicles in 'no parking' lift up but in the rules

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.