वेगळ्या विदर्भासाठी वीरा लढणार स्वबळावर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2018 10:12 PM2018-09-24T22:12:53+5:302018-09-24T22:14:23+5:30

विदर्भ राज्य आघाडीसाठी पुढील वर्ष महत्त्वाचे आहे. विशेष म्हणजे देशात लोकसभेच्या निवडणुका आहेत. परंतु, स्वतंत्र विदर्भाचे आमिष दाखवून विजयी झालेल्या भाजपने या मुद्याला बगल दिली आहे. शिवसेनेचा पूर्वीपासूनच विरोध आहे. राष्ट्रवादी व काँग्रेस पश्चिम महाराष्ट्रातील पक्ष असून त्यांच्याकडून अपेक्षा करणे कठीण आहे. रिपब्लिकन पक्ष विदर्भाबाबत प्रामाणिक आहे. परंतु, ते स्वत:ची ताकद ओळखण्यात अपयशी ठरले असून युती व आघाडीत विभागले आहे. त्यामुळे येत्या निवडणुका स्वबळावर लढणार, असे विदर्भ राज्य आघाडीचे संस्थापक अध्यक्ष माजी महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी सोमवारी येथे जाहीर केले.

Veera will fight for a separate Vidarbha on its own | वेगळ्या विदर्भासाठी वीरा लढणार स्वबळावर 

वेगळ्या विदर्भासाठी वीरा लढणार स्वबळावर 

Next
ठळक मुद्देतृतीय वर्धापन दिन : माजी महाधिवक्ता श्रीहरी अणे यांची घोषणा

लोकमत न्यूज नेटवर्क 
नागपूर : विदर्भ राज्य आघाडीसाठी पुढील वर्ष महत्त्वाचे आहे. विशेष म्हणजे देशात लोकसभेच्या निवडणुका आहेत. परंतु, स्वतंत्र विदर्भाचे आमिष दाखवून विजयी झालेल्या भाजपने या मुद्याला बगल दिली आहे. शिवसेनेचा पूर्वीपासूनच विरोध आहे. राष्ट्रवादी व काँग्रेस पश्चिम महाराष्ट्रातील पक्ष असून त्यांच्याकडून अपेक्षा करणे कठीण आहे. रिपब्लिकन पक्ष विदर्भाबाबत प्रामाणिक आहे. परंतु, ते स्वत:ची ताकद ओळखण्यात अपयशी ठरले असून युती व आघाडीत विभागले आहे. त्यामुळे येत्या निवडणुका स्वबळावर लढणार, असे विदर्भ राज्य आघाडीचे संस्थापक अध्यक्ष माजी महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी सोमवारी येथे जाहीर केले.
विदर्भ राज्य आघाडीचा तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्ताने सोमवारी सिव्हिल लाईन्स येथील डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित कार्यक्रमात त्यांनी आगामी निवडमुकीमध्ये पक्षाची भूमिका जाहीर केली. यावेळी व्यासपीठावर कार्याध्यक्ष नीरज खांदेवाले, स्वप्नजीत संन्याल, श्रीकांत तराळ, अनिल जवादे, राजू विधाते, एनडीएफबीपीचे सदस्य (बोडोलॅण्ड) लॉरेन्स इसलारी, चिला बसमुतातारी व डॉमॅनिक इसलॅक्मी, पवन सहारे, संदीप रामटेके, सुरेंद्र पारधी, अमोल बोरखेडे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
अ‍ॅड. श्रीहरी अणे म्हणाले की, लोकसभा निवडणुकीपूर्वी विदर्भ राज्य देईल, असे स्वप्न काहींकडून दाखविले जात आहे. मात्र ते शक्य नाही. कारण स्वतंत्र राज्याचे प्रारूप संसदेत वर्षभरापूर्वी मांडावे लागते. आता निवडणुकीला वर्षही शिल्लक नाही. त्यामुळे केवळ थापा देण्याचे उद्योग असल्याचे त्यांनी सांगितले. २०१४ मध्ये विदर्भाच्या नावाने गळे काढणारे आता त्या विषयावर बोलतसुद्धा नाही. त्यांना येत्या निवडणुकीत जागा दाखवून देऊ, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. स्वतंत्र विदर्भासाठी आपण अनेक पिढ्या खर्ची घातल्या आहेत. आता भावी पिढीच्या भविष्याची चिंता करावी. त्यांच्या हातात नेतृत्व देऊन नवीन राज्यकर्ते घडवू. पर्याय उभा करू. त्यासाठी गावोगावी विदर्भाचा नारा तेज करून उद्याचा आमदार-खासदार आपण घडवू, सुरुवातीला आपल्याला अपयशही येईल. पण खचून जाऊ नका, असा सल्लाही त्यांनी कार्यकर्त्याना दिला. प्रास्ताविक नीरज खांदेवाले यांनी केले.

श्रीहरी अणे यांनी नागपुरातून लढावे
दरम्यान वीराचे नागपूर शहर अध्यक्ष कमलेश भगतकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना अ‍ॅड. श्रीहरी अणे यांनी नागपुरातून लोकसभेची निवडणूक लढवावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.

Web Title: Veera will fight for a separate Vidarbha on its own

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.