नागपुरात प्रचारासाठी ८३ हेलिकॉप्टर व ५२ चार्टर्ड विमानांचा उपयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2019 12:38 AM2019-04-10T00:38:25+5:302019-04-10T00:39:18+5:30

लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत जिल्हा आणि तालुका स्तरावर प्रचारासाठी सर्व पक्षांच्या नेत्यांनी हेलिकॉप्टर आणि चार्टर्ड विमानांचा उपयोग केला आहे. २९ मार्च ते ९ एप्रिलदरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर ८३ हेलिकॉप्टर आणि ५२ चार्टर्ड विमाने आली. त्यामुळे विमानतळाचा महसूल वाढला आहे.

Use of 83 helicopters and 52 chartered aircraft for campaigning in Nagpur | नागपुरात प्रचारासाठी ८३ हेलिकॉप्टर व ५२ चार्टर्ड विमानांचा उपयोग

नागपुरात प्रचारासाठी ८३ हेलिकॉप्टर व ५२ चार्टर्ड विमानांचा उपयोग

googlenewsNext
ठळक मुद्देविमानतळाचा वाढला महसूल : नेत्यांचे हेलिकॉप्टरला प्राधान्य

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत जिल्हा आणि तालुका स्तरावर प्रचारासाठी सर्व पक्षांच्या नेत्यांनी हेलिकॉप्टर आणि चार्टर्ड विमानांचा उपयोग केला आहे. २९ मार्च ते ९ एप्रिलदरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर ८३ हेलिकॉप्टर आणि ५२ चार्टर्ड विमाने आली. त्यामुळे विमानतळाचा महसूल वाढला आहे.
मुंबई आणि दिल्ली येथून चार्टर्ड विमानांचे संचालन करणाऱ्या कंपन्यांनी नागपुरात हेलिकॉप्टर आणि चार्टर्ड विमाने तैनात केली होती. निवडणुकीत अनेक पक्षांनी प्रतिसाद दिला. वेळेची बचत आणि जास्तीत जास्त सभांसाठी हेलिकॉप्टरचा जास्त उपयोग करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी, बसपाच्या राष्ट्रीय अध्यक्ष मायावती, भाजपा नेते शाहनवाज हुसेन, एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी हेलिकॉप्टरचा उपयोग केला. नेते विमानाने नागपुरात पोहोचल्यानंतर वर्धा, चंद्रपूर, अमरावती, गोंदिया जिल्ह्यांसह तालुक्यात पोहोचण्यासाठी हेलिकॉप्टरचा उपयोग केला. हेलिकॉप्टरसाठी अडीच ते तीन लाख रुपये खर्च येतो. निवडणुकीत हेलिकॉप्टर आाणि चार्टर्ड विमानांचे संचालन करणाऱ्या कंपन्यांच्या उत्पन्नात वाढ झाली आहे.

Web Title: Use of 83 helicopters and 52 chartered aircraft for campaigning in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.