केंद्रीय मंत्री अहीरांनी काढायला लावले बुकेवरील प्लास्टिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2018 03:35 PM2018-06-23T15:35:25+5:302018-06-23T15:44:56+5:30

प्रशासनातर्फे सकाळपासूनच प्लास्टिक बंदीची अंमलबजावणीही सुरू करण्यात आली. केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर हे देखील या बंदीबाबत सकारात्मक व सतर्क असल्याचे पहायला मिळाले.त्यांनी चक्क स्वागताच्या बुकेचे प्लास्टिक आयोजकाला काढायला लावले.

Union minister Ahir brought out plastic cover on the bouquet | केंद्रीय मंत्री अहीरांनी काढायला लावले बुकेवरील प्लास्टिक

केंद्रीय मंत्री अहीरांनी काढायला लावले बुकेवरील प्लास्टिक

Next
ठळक मुद्देराज्यात आजपासून प्लास्टिक बंदी लागू करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : प्रशासनातर्फे सकाळपासूनच प्लास्टिक बंदीची अंमलबजावणीही सुरू करण्यात आली. केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर हे देखील या बंदीबाबत सकारात्मक व सतर्क असल्याचे पहायला मिळाले.त्यांनी चक्क स्वागताच्या बुकेचे प्लास्टिक आयोजकाला काढायला लावले.
दि इन्स्टिट्यूट आॅफ चार्टर्ड अकाउंटंट आॅफ इंडियातर्फे नागपुरात आयोजित दोन दिवसीय आॅल विदर्भ कॉन्क्लेव्हचे शनिवारी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या वेळी आयोजकांनी अहीर यांचे स्वागत करण्यासाठी बुके पुढे केला असता बुकेला लागलेले प्लास्टिक अहीर यांच्या निदर्शनास आले. त्यांनी लगेच याकडे आयोजकांचे लक्ष वेधत राज्यात आजपासूनच प्लास्टिक बंदी लागू झाल्याचे लक्षात आणून दिले. याची दखल घेत आयोजकांनी लगेच बुकेवर लागलेले प्लास्टिक काढून घेतले नंतर अहीर यांचे स्वागत केले. 

Web Title: Union minister Ahir brought out plastic cover on the bouquet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.